रायगड यात्रा दर्शन माहिती : Page 10 of 20

प्रथम फडकावला, तो तोरणा किल्ला आपल्या सिंहासनावरून सरळ सहज नजरेत यावा, ही महाराजांची योजना किती वाखाणावी बरे ! शिवशाही मायक्रोफोनचा चमत्कार. कमीत कमी 20-25 हजार सभाजन सामावतील अशा या राजदरबारावर आज फक्त आकाशाचेच छत आहे. ( पूर्वीही तो असाच उघडा असावासे वाटते. फक्त दरबारानिमित्त शामियाने उभारण्यात येत असतील. ) सिंहासनाजवळ उभे राहून सहज आपण काही बोललो तर 200 फूट अंतरावरच्या नगारखान्यापर्यन्त आणि डाव्या उजव्या बाजूच्या भिंतीपर्यन्त आपले बोलणे सहज नि स्पष्ट ऐकू जाते. चमत्कार आम्ही प्रत्यक्ष करून पाहिल्यावर आश्र्चर्याला सीमाच उरली नाही.

विजापूरच्या गोलघुमटात 82 फूट अंतरावर समोरासमोर असणा-या माणसाना एकमेकांचे कुजबुजणेहि स्पष्ट ऐकू येते, अनुभव मी घेतलेला होता. पण उघड्या जागेवरचा हा सहज-ध्वनि प्रेक्षणाचा रायगडी प्रयोग पाहिल्यावर साऊण्ड ऑकॉस्टिक साधण्याइतके स्थापत्यशास्त्र शिवकालीहि चांगलेच अवगत होते, असे कबूल केल्याशिवाय नाही. राज्यकारभाराचे सेक्रेटरियट. दरबार हॉलच्या मागेच प्रधान-मंडळाच्या कचे-याचे प्रमाणबद्ध आखलेले चिंरेबंदी चौथरे आढळतात. मध्यावर पंतप्रधानाची कचेरी आणि सभोवार इतर कारभा-यांच्या नि त्यांच्या फडांच्या कचे-या पंतप्रधानाच्या मागणीप्रमाणे हवी ती माहिती पुरवण्यासाठी चटक कोणत्याहि कचेरीतल्या कामदाराला सहज येता जाता यावे, अशी सेक्रेटरियटची मांडणी आधुनिकहि इंजणेरानी अभ्यासण्यासारखी आहे. गुप्त मसलखाने नि भुयारे. सहसा कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा चार पाच जागी गुप्त मसलतखान्यांचे चिंरेबंद कमाणीचे भूमिगत दरवाजे आहेत. पाय-या उतरून आत खाली गेले की उजव्या किंवा डाव्या बाजूला भरपूर उजेड असलेली तळघरे आहेत. एक तळघर तर सिंहासनाच्या अगदी जवळ उजव्या बाजूला आहे. सिंहासनावरून सहज उठले असता चटकन गुप्त व्हयला ही सोय दिसते. दक्षिणेकडे खोलगट सपाटीवर प्रधानांचे बंगले होते. तेथूनहि सेक्रेटरियटला चटकन येता जाता येण्यासारखे भुयारांये गुप्त मार्ग आहेत. तसे म्हटले तर सबंध रायगडच जागोजाग जमिनीखालून पोखरलेला आढळतो. पळवाटा, गुप्त कोठारे, मसलतखाने, आरोपीकडून कबुली जबाब काढण्याचे तुरूंग, क्षणार्धात भूमिगत होउन गडावरून बाहेर निसटण्याचे मार्ग नि जागा, अंधारकोठड्या ठिकठिकाणी असल्याचे दिसते. हे बहुतेक मार्ग नि जागा आता कोंदाटलेल्या आहेत. त्यांचे आवक जावक मार्ग हुडकून काढणे धाडसाचे नि जिकिरीचे काम आहे. एक धोक्याची सूचना मात्र देणे अगत्याचे आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडच्या पठारावर काही ठिकाणी खोल भुयारांची तोंडे उघडी पडलेली आहेत. काठी ठोकीत नीट पायांकडे पाहून चालले पाहिजे. नजर चुकून कोठे कसा पाय भसकन आत जाईल नि माणूस 20-25 फूट खाली अंधा-या भुयारात गडप होईल याचा नेम नाही. बालेकिल्ला. गंगासागराच्या दक्षिणेला दोम मनोरे आहेत. आजच्या मोडक्या तोडक्या अवस्थेत त्यांची उंची 40 फूट आहे. पूर्वी हे पाच मजल्यांचे होते. आज फक्त दोनच मजले उरले आहेत. याना 12 पैलू असून वरील तीन मजले इंग्रजांनी तोफानी उडवून दिले. प्रत्येकात अडीच फूट रूंदीची नि पुरूषभर उंचीच्या एकेक कमानदार खिडकी आहे. या खिडक्यांत बसून गंगासागरावरील शीतल वायुलहरींचा आस्वाद आणि गडाच्या बाहेरील मनोरम निसर्गाच्या निरीक्षणाचा आंनद मनमुराद लुटता येतो. मजल्याच्या तक्तपोशीचे काम घुमटदार आहे तरी वरच्या मजल्याची जमीन सपाटच आहे , हा या बांधणीचा विशेष पहाण्यासारखा आहे. येथून पश्चिमेला 31 पाय-या आहेत. त्या उतरून गेल्यावर पालखी दरवाजा लागतो.किल्ल्यात येणा-या जाणा-या राजवंशी स्त्रीपुरुषांच्या पालख्या या दरवाजातून जात येत असत. इतरेजनाना अर्थात हा मार्ग बंद. बालेकिल्ल्याची लांबी 900 फूट नि रुंदी 450 फूट.

आत इमारतींच्या शिलकी चौथ-यांच्या दोन रांगा लागतात. उजवीकडच्या राण्यांच्या महालांच्या नि डावीकडच्या नोकरचाकरांच्या खोल्यांच्या. इमारती 7 असून त्यांचे सात स्वतंत्र दरवाजे आहेत. दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडल्यावर गडाचे एक टोक आहे. येथे उघड्या मैदानावर संध्याकाळी राजस्त्रिया मोकळ्या हवेवर करायला जात असत. महालाच्या शेजारी बेपत्ता शौचकूप आहेत. त्यांच्या कमोदपात्रांची घडणी वर्तमान काळाच्या विलायती पात्रांइतकीच किंबहुना त्याहूनहि विशेष सोयीची म्हटल्यास चालेल. कसलीहि खटपट न करता सगळी घाण थेट किल्ल्याबाहेर