रायगड यात्रा दर्शन माहिती : Page 9 of 20

काही उत्सवानिमित्त प्रचंड होळी पेटवण्यात येत असे. तमाशेवाले, पोवाडेवाले शाहीर, गारुडी, भराडी, लळीताची सोंगे, इत्यादि कार्यक्रम या मैदानावर साजरे होत असत आणि शिवाजी महाराज स्वता जनतेबरोबर खेळीमेळीने येऊन कलावंतांचा भरपूर देणग्यानी येथे सत्कार करीत असत. नगारखाना. राजदरबाराचे नि बालेकिल्ल्याचे हे विशाल चिरेबंदी महाद्वार आजहि आपल्या गतवैभवाच्या कहाण्या सांगण्यासाठी ताठ उभे आहे. ही नगारखान्याची दर्शनी इमारत 50 फूट उंच नि 30 फूट रुंदीची आहे. उजव्या डाव्या बाजूला पुरुषभर उंचीच्या देवड्या आहेत. डाव्या देवडीवरून नगारखान्याच्या शिखरावर जाण्यासाठी दोन भिंतीमध्ये 29 पाय-यांचा एक दगडी जिना आहे. तेथे दिवसाहि गडद अंधार असतो. टॅर्चशिवाय पुढे पाऊल टाकताच येत नाही. गडबडीत आम्ही कुमारसेन समर्थाशिवाय, कोणीहि टॅर्च आणली नव्हती आणि जिन्याच्या तोंडाशी फलटण जाताच अहो, टॅर्च लावा, टॅर्च लावा असा ओरडा मात्र बिनचूक केला. समर्थानी टॅर्च प्रकाश फेकला, पण तो आढळला मिणमिणता ! मग काय ! तेवढ्यात उजेडात आंधळ्याची माळका एकमेकांचे हात धरून चालली रेटीत पुढे. सबंध गडावरची ही अतिशय उंचीची जागा. येथून चौफेर फार दूरवरचा प्रदेश खासा न्याहाळता येतो. महाड, माणगाव, निजामपूर, बिरवाडी इत्यादि गावे नि खोरी तर दिसतातच, पण पूर्वेकडचा जिब्राल्टर म्हणून पाश्र्चात्यानी जगभर ख्यातनाम केलेल्या रायगिरीचे संरक्षण करण्यासाठी चौफेर खडा पहारा देणारे सिंहगड, तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड हे किल्लेही येथून दिसतात. गडाधिराज रायगिरीचे हे जागते इमानी पहारेकरी, चहूकडून घोंगावत येणा-या वायुलहरीतून गतवैभवाच्या कितीतरी स्फूर्तिदायक कहाण्या आमच्या कानांत ओरडून सांगत होते. पण आज त्यांचा काय उपयोग ? काय ? उपयोग नाही ? असे कसे होईल ? काळ बदलला तरी शिवरायाने बनवलेली म-हाठ्यांची स्वांतंत्र्यप्रेमी पिण्डप्रवृत्ति बदललेली नाही. त्यांचा मानधनप्रभुपणा अजूनहि ताठर आहे.

चालू लोकशाही जमान्यातहि स्वत्वासाठी म-हाठा आपल्या सर्वस्वाचीहि पर्वा करणारा नव्हे. महाराजांच्या राजाभिषेकाला उल्लेखून दोन संस्कृत श्र्लोक नगारखान्याच्या दरवाजावर खोदलेले आहेत. पलीकडे खाली कुशावर्त तळे असून गडाचे क्षीगोंदे टोके आहे. तेथे श्रीमंत पोतनीस कारखानीस वगैरे महाराजांच्या विश्र्वासू मुत्सद्दी मंडळींच्या वाड्यांचे पडके अवशेष दिसतात. * आजवर पुष्कळांच्या लिहिण्या बोलण्यात येणारा ' राज्याभिषेक ' शब्द ' राजाभिषेक ' असाच पाहिजे. अभिषेक ' राजा' ला होत असतो. ' राज्या' ला नव्हे. - ठाकरे. कुशावर्त तीर्थाचे पाणी सध्या अगदी खराब असले तरी पूर्वी चांगले होते. याच्या पलीकडे कळबा कवजीच्या वाड्याच्या खूणा आढळतात. राजदरबार. नगारखाण्याच्या कमानीतून आत नजर जाताच राजदरबाराचे विस्तीर्ण प्रांगण लागते. समोर 200 फूट अंतरावर मध्यवर्ति उंचवट्यावर श्रीशिवरायाच्या सिंहासनाचा दगडी चबुतरा नजरेला पडताच वळते अंजुलि नकळत बघुनि तयालार्गी अशी अवस्था होते. आपल्या भोवती फिरून राजदरबाराचा तो उजाड नि उध्वस्त प्रदेश पहाताच मनश्र्वक्षूंपुढे हजार लाख कोटी जुन्या ऐतिहासिक घटनांचा चित्रपट बिजली वेगाने सरसरत जातो. मनोभावनांचे ते स्नेहाळ तुफान शब्दातीत आहे. आज चारी बाजूंच्या भिंती ताठ उभ्या आहेत. प्रांगणाच्या दोन बाजूना लांबच लांब चढत्या चौथ-याच्या बैठकी दिसतात. एका बाजूला इंग्रेज-फेंच-पोर्तुगीजडचादिकांचे वकील प्रतिनिधि परिवारासह बसले असतील. दुस-या बाजूला स्वराज्याचे मुत्सद्दी सरदार दरकदार सेनापती लढवय्ये दरबारी यांची बैठक असेल. प्रांगणाची लांबी 200 फूट नि रुंदी 150 फूट असावी. मधल्या सरासरी औरसचौरस हजारफुटी मोकळ्या जागेत गायक, शाहीर, कलावंत, नर्तकी नि इतरेजनांची सोय असावी. सिंहासनाची पूर्वाभिमूख बाजू चिरेबंदी जोत्याची कंबरभर उंचीवर असून, एका बाजूला प्रधानमंडळ आणि दुस-या बाजूला राणीवसातील महिला वर्गाची बैठक होती. सिंहासनाचा चबुतरा पूर्वी सोन्याच्या पत्र्याने मढवलेला आणि दुस-या बाजूला राणीवसातील महिला वर्गाची बैठक होती. सिंहासनाचा चबुतरा पूर्वी सोन्याच्या पत्र्याने मढवलेला आणि हिरे-माणकादि रत्नानी जडवलेला असल्याची मुंबईचा आंग्रेज वकील ऑकझिंडन याची साक्ष आहे की त्यावर बसून नगारखान्याच्या महाव्दारातून समोर नजर जाताच दूरचा तोरणा किल्ला स्पष्ट दिसावा. ज्या गडावर हिंदवी स्वराज्याच्या मुहूर्ताचा भगवा झेण्डा महाराजानी