रायगड यात्रा दर्शन माहिती : Page 4 of 20

मूळच तो कोठेही नसावा. चीत दरवाजा नि खूप लढा सुमारे 500 फूट वर चढल्यानंतर चीत दरवाजा ( खिंडीसारखे एक नुसते वळण ) लागतो. रायगड कमिटीने येथे 'चित दरवाजा' अशी पाटी ठोकलेली आहे. येथे चित शब्दाचा संबधच काय मुळी ? ते वळणच असे आहे की येईल त्याला चारीमुंडे 'चीत ' करता येईल. चित शब्द चूक आहे. येथून पुढे एका उंच टेकाडावर कमिटीने मोठा पत्र्याचा बोर्ड लावून त्यावर रायगडाच्या अखेरीचा संक्षिप्त इतिहास लिहून ठेवलेला आहे. येथूनच पुढे ' खूप लढा ' नावाच्या सूळकाबादज चढणीचा तंगतमोडी रस्ता लागतो. चढणीरांची हा चांगलीच कसोटी पहातो. पुरी दमछाट करावी लागते.

आणखी पुढे हजार फूट वर चढल्यावर, रायगडाची काळीकभिन्न चि-यांची विशाळ नि घोटीव तटबंदी दिसताच, गडाच्या भव्यतेने माणसाचे ह्रदय उंचबळू लागते. डोंगराच्या तुटत्या कड्यावर विशाळ नि प्रचंड पाषाणांची ही रेखीव नि घोटीव तटबंदी बांधलीच असेल कशी ? या प्रश्नचिन्हाचे कोडे प्रेक्षकाला क्षणभर तरी बुचकळ्यात टाकटे. जसजसे जवळ जावे तसतसा एकेक प्रंचड चिरा एकेक प्रचंड चिरा एकमेकात कैचीसारखा साखळीबध्द बसवलेला पाहील्यावर, शिवकालीन स्थापत्यशास्त्राचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. महाव्दाराचे दर्शन. आता समोर डावी उजवीकडून मिळत्या येणा-या अंदाजे 75 फुटी उंचीच्या तटांच्या काळ्याभोर चिरेबंदी भिंती दिसू लागतात. इंग्रेजी S एस अक्षराच्या वळणाने चालत चालत आपण पुढे जातो तोंच समोर भव्य महाव्दाराचे दर्शन घडते. बाजूला दोन उंच नि भव्य बुरूज आणि हा विशाळ कमानदार दरवाजा पहाताच प्रेक्षक अभिमानाने, आश्र्चयाने नि आदराने गहीवरून जाऊन तेथल्या पाय-यांवर साष्टांग नमस्कारच घालतो. निदान माझी तरी तशी अवस्था झाली खरी. श्रीशिवरायाच्या नि स्वराज्यासाठी सर्वस्वाचे हासत हासत बलिदान करणा-या मर्द मावळ्यांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या या पाय-यांची माती कपाळाला लावतो. कोणताहि शत्रू या महाद्वारापर्यन्त कसाबसा टिकाव धरून आलाच, तर अवघे वीस पंचवीस ढालाईत त्याची चटणी उडवायला पुरे, अशीच ही योजना आहे. लाकडी दरवाजे आता कोसळले आहेत आणि पूर्वीच्या औरसचौरस चार फुटी अर्गळेचा एक हातभर तुकडा तेवढा नमुन्याला शिल्लक उरला आहे. दोन बाजूना पुरुषभर उंचीच्या चिरेबंद चौथ-याच्या देवड्या आहेत. शिवाय आतल्या बाजूला दोन पडक्या घरांचे पाये आहेत. प्रत्यक्ष गडावरील वसतीचा नि इमारतींचा आणि या महाद्वाराचा तसा काही संबंधच ठेवलेला नाही. दोघात पुढे अर्धा पाऊण मैल चढावाचे अंतर आहे. हे अंतर चालून गेल्यावर पठाराच्या सपाटीवर येण्यापूर्वी दोनदोन तीनतीन फूट उंचीच्या लांबलचक 15-16 पाय-या चढाव्या लागतात. रायगड-चढणीच्या तपश्चर्येची ही अखेरची कसोटी. ही पार पडली का आलोच आपण साधारण पठारावर . येथून फर्लांगभर गेल्यावर मदारशहाची कबर लागते. तेथे एक 6-7 इंच व्यासाचा नि पुरुषभर उंचीचा मलखांबासारखा लोखंडी खांब पुरलेला आहे. त्यावर शिवाजी कसरत करीत असे, असे काहीजण सांगतात. खांबाच्या माथ्यावर जाड लोखंडी कडी कोयंड्यात अडकवलेली आहे. यावरून तो मलखांब खास नसावा. त्यावर काही मराठी अक्षरे खोदलेली आहेत, पण आता ती वाचताच येत नाहीत इतकी खरचटून नाहीशी झाली आहेत. जवळच या जागेच्या समोर हत्तीचा तलाव आहे. पोहण्यासाठी हत्तीना तेथे सोडीत असत. यावरून मदारशहा हत्तीखान्याचा माहूत असावा. त्याला मागाहून लोकानी पीर बनवला असावा आणि तो लोखंडी खांब हत्ती बांधण्यासाठी असावा, असा सरळ तर्क होतो.

रायगड कमेटीची धर्मशाळा. रायगड चढायला आम्हाला साडेतीन तास लागले. साडेदहा वाजता आम्ही धर्मशाळेत दाखल झालो. काही वर्षापूर्वी महाशय आठवले यांच्या एकनिष्ट परिश्रमाने रायगडच्या पायवाटेची जी सुधारणा झाली, त्या वेळीं सांगलीचे सुवर्णतुलावाले श्रीमंत विष्णू रामचंद्र वेलणकर यानी 2000 रुपये खर्चून ही धर्मशाळा बांधलेली आहे. येथे चार प्रशस्त खोल्या, प्रत्येकीत एकेक लोखंडी खाट, काही खुर्च्या आणि स्वयंपाकाची भांडीकुंडी अशी सोय केलेली आहे. खुर्च्यांची बसकटे खलास झाली असली, तरी खाटा जेमतेम तग धरुन आहेत.