रायगड यात्रा दर्शन माहिती : Page 20 of 20

( शिवाजी राजानी ) घेतला. राजा खासा जाऊन पाहता गड बहूत चखोट. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे, दिड गांव उंच, पर्जन्यकाळीं कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे........ आणि बोलिले तक्तास जागा गड हाच करावा. असे करारीं करून तेच गडी घर वाडे माडिया सदरा घटी महाल चुनेगच्ची बांधले. खर्च 50 हजार होन." 6 जून 1674 पहाटे शिवरायाचा राजाभिषेक झाला. 19 जून 1676 नेताजी पालकराला परत हिंदू धर्मात घेतले. 3 एप्रिल 1680 छत्रपति शिवाजी महाराज दिवंगत झाले. 21 एप्रिल 1680 संभाजिला डावलून बाल राजारामाला छत्रपति म्हणून मंचकारूढ करण्याच्या कटाने अनाजी दत्तोने म-हाठमंडळात कलीचे बिजारोपण केले. 18 जून 1680 संभाजीने पन्हाळ्यातून येऊन राज्यसूत्रे हातात घेतली. सर्व राजकारणी कटबाजाना क्षमा केली. 6 जानेवारी 1681 संभाजीचा राज्यभिषेक. ऑगष्ट 1681 अनाजी दत्तो आणि सोयराबाई यानी हिरोजी फरजंदाला हाताशी घेऊन संभाजीच्या जेवणात विषप्रयोग करविला. तो चटकन उघडकीला येऊन राजा वाचला, पण राजाआधी मुद्दाम अन्न चाखणारा एक इमानी पो-या आणि कुत्रा त्या विषाला बळी पडले. सप्टेम्बर 1681 सोयराबाईने विषप्राशन करून आत्महत्या केली. 25 मार्च 1689 झुलफीकारखानाचा रायगडाला वेढा. 5 एप्रिल 1689 येसूबाई नि युवराज शिवाजी (शाहू ) रायगडाचा अखेरचा निरोप घेतात. रायगडाचे ऐक्ष्वर्य संपले.

3 नवंबर 1689 हवालदाराच्या हरांमखोरीने रायगड मोगलाच्या ताब्यात जातो. म-हाठ मंडळाने तमाम महाराष्ट्रभर बादशाही फौजेची चोहीकडून लांडगेतोड चालू केली. महाराष्ट्रगीत जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा सकल गुणांचा राजा मराठ-वाडा, विदर्भ आणि खानदेशचे शेतमळे गोमांतक नंदनवज माझे कोंकण फुलवी फुले फळे तापि, नर्मदा, गोदा, कृष्णा, आणि तुंगभद्रा, भीमा जीवन अर्पित पुढे चालल्या देशबांधवाच्या कामा माय माउल्या गिरिजा जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा 1 सह्याद्रीच्या लिपींत लिहिला वीरश्रीचा इतिहास पूज्य समाधी विरामचिन्हें संतजनांचा सहवास शौर्य धैर्य त्यागानें ज्यांच्या भूषविले तुझिवा विभवा शक्ति आणखी भक्तीचा हा इथेंच जुळला खरा दुवा ! हीच प्रभूची पूजा जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा 2 सचेतनासी द्याया मसलत अचेतनाला फूटे गिरा मराठमोळ्या ! तुला सांगतो रायगडाचा चिरा चिरा इथे पताका आणिक भाला ताल मृदंगी ढाल चढे वारक-याचा धारकरी हो शिंपुनी सडे जय महाराष्ट्र गर्जा जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा 3 ज्ञानेक्ष्वर, एकनाथ, तुकया, समर्थ संताची माला मालवतेची वीज रोवुनी सदा जागविति आम्हांला वंद्य शिवाजी, पहिले बाजी, लोकमान्य ऐसे वीर स्वांतंत्र्याचा मंत्र देउनी केला ज्यांनी संचार दावुनिया नवतेजा जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा 4 संकट येतां लढतो आम्ही धांव घेत उत्तरेकडे भारत देशा संरक्षाया सैन्य आमुचे सदा खडे परंपरेने देत आम्हांला शक्ति आणि वेदना धडे करांत कर घालुनी चालल्या बुध्दि आणि भावना पुढें उघड ह्रदय- दरवाजा जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा 5 -सोपानदेव चौधरी श्री. अनंत वासुदेव मराठे यांचीं दोन सुंदर पुस्तकें श्रीगणपति वैदीक कालापासून आतापर्यत लहानथोर, गरीबश्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित अशा सर्व प्रकाराच्या लोकांना पूज्य व प्रिय असलेल्या या देवतेच्या अनेक शेवटी सर्वांना समजेल व थोड्या वेळांत आचरतां येईल असा पूजाविधीही सार्थ दिला आहे.

सत्यव्रत भीष्म भारतीय युध्दाच्या प्रसंगीं श्रीकृष्णांचाही प्रतिज्ञाभंग करणा-या पितामह भीष्मांची योग्यता काय वर्णावी ? त्यांचे बालपणापासून अखेरपर्यंतेचे चरित्र सोप्या भाषेत या पुस्तकात दिलें असून सरकारी शाळाखात्यानें पुरवणीवाचन म्हणून मंजूर केंले आहे. महाराष्ट्रांतील अनेक शाळातून आज हें पुस्तक चालू आहे. प्रत्येक घरी एकेक प्रत असली म्हणजे घरच्या लहानथोर सर्वच मंडळीला ह्याचा उपयोग होईल.