रायगड यात्रा दर्शन माहिती : Page 2 of 20

आता, मुंबईहून थेट महाडला बस सर्विस चालू आहे. दि. 24 डिसेम्बर 1949 शनिवारी पहाटे मुंबईहून निघणा-या स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसने साडेसहा बाजता, ' छत्रपति शिवाजी महाराजकी जय, जय महाराष्ट्र ' या गर्जना करीत आम्ही रायगड यात्रेकरू निघाले. सुकेळी खुंडीपर्यन्त प्रवास छान झाला. खिंड चढताना आमची बस पुढे जायला टंगळमंगळ करू लागली. तिने आपला वेगहि गोगलगाईचा केला. ड्रायव्हरजीनी दीडफूट लांब सुस्कारा टाकला. तो हात जोडून स्वस्थ बसला. यंत्रात कोठे काही बिघाड झाल्यास तो पाहण्याचा ड्रायव्हरला अधिकार नव्हता ; ते काम फक्त स्टे. ट्रा. च्या खास विंजणेराचे. तो येईल तेव्हा पुढची बसची नि आम्हा प्रवाशांची वारलाद लागयाची, असा पडला कंपनीचा कायदा. वरसगांवला बसबाईने अखेर बैठकच मारली. सगळे उतारू खाली उतरले. आमचे नशिब थोर. थोड्याच वेळात मुंबईकडच्या आणखी बसगाड्या आल्या. त्यांत दोनदोन चारचार उतारूंची वाटणी होऊन आम्ही पुढे मार्गाला लागलो नि सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास महाड येथे टिपणिसांच्या घरी येऊन दाखल झालो. स्नाने उरकून सर्वानी मेजवानी झोडली. वामकुक्षीचा विचार डोक्यात डोकावतो तोच टिपणीस कपतानजीचे फर्मान सुटले कीं '' रात्रीचा मुक्काम करायला तात्काळ पाचाड.302 ला निघालेच पाहिजे.'' झाले. स्पेशल बस दारात येऊन तिने चलो भैया, आगे कूच करना है असा कर्णा फुंकला. इतक्यात माझ्या निमंत्रणाला मान देऊन महाडचे इतिहास-संशोधक स्नेही महाशय आवळसकर मास्तर आमच्या टोळीत सामील झाले. संध्याकाळी 5 वाजता आम्ही पाचाडला जाण्यासाठी निघालो. 12 मैलांवर कोंझर गावानजिकच्या एका शेतात आम्हाला उतरवून बसगाडी महाडला परत गेली.

आमच्या यात्रेचे टिपणिसांचे फर्मान आधीच पुढे गेलेले असल्यामुळे, पाचाडच्या महार बांधवानी कोंझरला 7-8 ओझेकरी उभेच ठेवले होते. त्यानी भराभर आमची सामानांची ओझी डोईवर घेऊन चालायला सुरुवात केली. पाचाडची डोंगराळ पायपिटी. कोंझरपासून पाचाडचा डोंगरी चढाव सरासरी दोन मैलांची आहे. असे म्हणतात की ' कोणे एके काळी ' महाडच्या डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाने कोंझर ते पाचाडपर्यन्त गाडीरस्ता बांधला होता. पण शिवरायाच्या रायगड राजधानीची किती शोचनीय अवस्था झालेली आहे ,हे पायथ्याशीच प्रवाशांच्या स्वच्छ अटकळीत यावे, म्हणून त्या रस्त्यानेहि तशीच उध्वस्त प्रेतकळा पत्करण्याचा आत्मयज्ञ राजखुषीने नि अक्कलहुशारीने केला आहे. रायगडची खरी डोंगर-चढाई वास्तविक कोंझरपासूनच सुरू होते म्हणायला काही हरकत नाही. हातात उंच भक्कम काठीचा आधार घेऊन, चढावाच्या वाकड्या तिकड्या दगड धोंडे खडकांच्या दरडीवरून मुत्सद्दी चातुर्याच्या एकेक पावलाने मार्ग कंठावा वागतो . त्या लत्त्यातील रहिवाशांना त्याचे काहीच वाटत नाही. झपाझप पावले टाकीत रात्रंदिवस ते जात येत असतात. सूर्यास्त झाल्यानंततर मात्र चांगल्या लांब पल्ल्याच्या तेजाळ बिजलीबत्ती (टॉर्च) शिवाय वाटेचा सुगावा काढणे फार कठीण कर्म. शिवकाली पाचाड मोठ्या बाजारपेठेचा गाव होता. गडावर येथूनच सर्व प्रकारच्या खाजगी मुलकी नि लष्करी सामान साहित्याचा पुरवठा होत असे. महाराजाना भेटायला येणा-या देशी परदेशी पाहुण्यांची नि मुत्सद्यांची प्रथम छावणी येथेच पडायची आणि प्राथमिक विचीरपूस चौकशी खुलासे झाल्यानंतरच त्यांची गडावर रवानगी व्हायची . माता जीजाबाई नेहमी आजारी असत. त्यांच्यासाठी महाराजानी पाचाडलाच एक मोठा राजवाडा , विहिरी , बाग बांधलेले होते. त्यांचे आज नुसते चौथरे पहायला मिळतात. पाचाडचा चढाव चढत असताना , सूर्यास्ताच्या सोनेरी किरणानी न्हाऊन निघालेला रायगड पहाताच त्याच्या भव्यतेची स्पष्ट कल्पनआ होते. महार बांधवांचे प्रेमळ आदरातिथ्य. सुमारे सायंकाळी साडेआठच्या सुमाराला आम्ही 25 यात्रेकरू ( कारण महाडचे सुरबा टिपणीसादि 10-12 मंडळी आमच्या मार्गदर्शनासाठी बरोबर आले होते.) पाचाडच्या महारवाड्यात येऊन दाखल झालो. आहाहा ! त्या आमच्या महार भगिनीबांधवांची आपुलकी नि जिव्हाळा किती वर्णावा! शाळेपुढील स्वच्छ सारवलेल्या आंगणात त्यानी रंगीबेरंगी कागदांच्या पताका तोरणे माळा लावून एक प्रशस्त शामियाना आमच्या स्वागतासाठी उभारला होता. हातपाय धुण्यासाठी गरम पाण्याचे हंडे तयार होते. हातपाय धुऊन बैठकीवर बसताच चहा तयार. सर्वानी थोडा