प्रबोधन सहाय्यक फंड : Page 3 of 3

फंड गेल्या ५ वर्षात अनेक आश्रयदात्यांनी अयाचित लहानमोठ्या देणग्या प्रबोधनास दिल्या आहेत. अनेकांनी अनेक तर्हांानी मदत केलि आहे. ती कोठवर सांगावि. सर्वांच्या कृपेची मला कृतज्ञता आहे. पण आज मदतीसाठी फंडाची याचना करावी लागत आहे. अशी याचना करावि न करावी. ’करणे बरे का वाईट’. अलीकडे गुंडांनी फंड शब्दाला बंडा इतके भयंकर बनविल्यामुळे आपण त्या मार्गाला कसे पाऊल टाकावे; वगैरे विकल्पांच्या विचारांतच गेला दिड महिना गेला. आतां असा विवेक केला कीं सांपत्तिक सहय्याचि मी जी याचना करणार ति चव्हाट्यावरील जानार्याक येणार्या हव्या माणसाकडे नव्हे; तर प्रबोधन कार्याचे जे भोक्ते आहेत, त्यांच्याजवळ्च करणार. माझ्या खास आश्रयदात्यांपाशी मी याचना करणार. आम्हा दोघांत हा विकल्प काय म्हणून? दोघांचाहि प्रबोधनाच्या कार्याबद्द्ल परस्पर आत्मविश्वास असलाच पाहिजे. माझ्या अडचणी आश्रयदात्यांना कळवायच्या नाहीत, तर कोणाला? अखेर विकल्पावर संकल्पाची मात करुनच मी या फंदयोजनेचा प्रश्न हाती घेतला. माझी प्रकृती आता थोडी थोडी सुधारत आहे आणि लेखन कार्यालाही मी सुरुवात केली आहे. कामा पुरती सांपत्तिक मदत हाती येतांच प्रबोधन आणि लोकहितवादिचे संपादन मी चालू करु शकेन. ’प्रबोधनाचा आश्रयदाता’ या सदरांत त्याचे वर्गणीदार तर आहेतच आहेत; पण वर्गणीदारांच्या संख्येपेक्षा त्याचा वाचकवर्ग महाराष्ट्रांत असंख्य आहे. त्याचाहि त्यांत मी समावेश करीत असतो. आजची घडी अशी आहे की आश्रयदाते वर्गणीदार आणि वाचक या सर्वांनी प्रबोधनाच्या आदळलेल्या कार्याला ताबडतोब हातभार लाऊन उठविले पाहिजे.

(५) मदत करण्याचे काहीं मार्ग (लो) प्रत्येक वर्गणीदाराने श्रीहरी प्रेरणा करील त्या प्रमाणे दोन रुपये किंवा अधिक रक्कम आशीर्वादासह मदत म्हणून पाठवावी. (क) आपल्या आजूबाजुच्या प्रबोधन - वाचकां नाही मदत फंडाची योजना समजाऊन द्यावी आणि त्यांच्या कडून फूल ना फुलाची पाकळी जमेल, ती. नांव गांव यादीसह एकत्र किंवा निरनिराळी पाठवावी. एकत्र बरी. (हि)तह्यात आश्रयदाते वर्ग नं. १: रोख रु ५० एकरकमी देणगि पाठवणारांस पूर्वी प्रसिध्द झालेले (पण शिल्लक असलेले) त्याचे प्रमाणे पुढे प्रसिध्द होणारे सर्व प्रबोधन-वादमय (ग्रंथ मासिक साप्ताहिक) प्रणिपातपूर्वक तह्ह्यात विनामूल्य पुरविले जाईल. (त) तह्यात आश्रयदाते वर्ग नं २: रोख रु २५ एकरकमी देणगी पाठविणारांस पुढे प्रसिध्द होणारे सर्व प्रबोधन वाडमय (ग्रंथ मासिक साप्ताहिक) प्रणिपातपूर्वक तह्ह्यात विनामूल्य पुरविले जाईल. ज्याला जसे सामर्थ्य असेल, श्रीहरी प्रेरणा करील, तशी त्याने मदत करावी, अशी प्रार्थना आहे. एकहाती काम करणार्या एकाच माणसाची सारी धडपड , हें लक्षात घेतल्यास, व्यक्तीच्या आपत्तींचा संस्थेवर होणारा आघात, आश्रयदात्यांना फारसा आचंब्यांत पाडणार नाही आणि मी मारलेल्या हा केला प्रबोधनाचा जनता-जनार्दन तात्काळ ओ देईल, एवढ्या विश्वासाच्या आशेत हें पत्रक पुरे करतो.

महाराष्ट्राचा नम्र सेवक, केशव सीताराम ठाकरे, संपादक प्रबोधन आणि लोकहितवादी.

निसबत ६-३३ खांडके चाळ, दादर, मुंबई नं . १४