प्रबोधन सहाय्यक फंड

हे खरंतर साहित्य नाही. पण प्रबोधनकारांनी लिहिलेली हे जाहिरातपत्रकही खूप मोलाचं आहे. आपल्या सामाजिक जीवनातल्या प्रेरणांचा उल्लेख या लेखात आलाय. म्हणून हा लेख महत्वाचा.

आश्रयदाते, वर्गणीदार आणि वाचकगण यांस प्रणिपातपूर्वक विनंति.

(१) परिस्थितीचा अल्प परिचय सन १९२६ साली माझ्या व्यावहारीक आणि आर्थिक स्थितीला टेम्पट्रेस खटल्याचा बॉम्ब लागून ती उध्वस्त झाली. तरी त्यानंतर दीड वर्ष म्हणजे १९२७ अखेर पर्यंत प्रबोधन चालवुन नव्या लोकहितवादी साप्ताहिकाची मी घडाडीनें सुरवात केली साप्तहिकाची मी धडाडीने सुरवात केली. पण या धडपडी केवळ प्रयत्नवादाच्या त्याच्याहि वर पारमेश्वरी इच्छा, योगायोग, ग्रहगति , दैव किंवा मनुष्यमात्राचें प्रवाहपतितत्व हाणून काहीतरी शक्ती आहे. तिचा जोर झाला; आणि प्रयत्नवादाला एका ठराविक ठिकाणी अडेल तट्टाप्रमाणें बिनर्शत अचानक उभे राहावे लागले. व्यावहारीक कारणे काहीहि असली, कोणाला दिसली, मी पाहिली किंवा कोणी दाखविली, तरी एक गोष्ट सर्वांना कबूल करणें भाग आहें कीं सर्वच कार्य केवळ प्रयत्नवादाला एकांड्या तिरमिरिनें साधत नसतात. ईश्वरी इच्छा किंवा ग्रहदशा प्रवाहपतित मानवांच्या जीवननियंत्रणावर उभी आहेच आहे. तिच्या गणिती ठोकताळ्याच्या तडाक्याने मोठमोठी साम्राज्ये रसातळाला गेली आणि नेपोलियन बोनापार्टसारखे कट्टे यत्नवादी चक्रवार्ति हतप्रभ होऊन अखेर कुत्र्याच्या मोताने मेंले. मी कट्टा दैववादी नव्हे आणि कच्चा यत्नवादीहि नव्हे. पण यत्न झाले की देव झाले, तरी तरी प्रत्येकाला कांहीतरी सीमा आहेच. अशा एका अज्ञात सीमेवार अचानक माझ्या कारभाराचे यत्न खटकन बंद पडून ग्रहदशेचा फेरा इतक्या कल्पनातील रीतीनें गर्रर्र फिरु लागला की माझे मलाच काय होत आहे हें उमगे ना. प्रथम मी आजारी पडलो आणि पाटोपाठ कुटुंबातींल सर्व लहानथोर मंडळी एकेका भयंकर दुखण्यानें जमीनदोस्त. सारे घर दवाखाना बनले. छापखाना बंद झाला आणि दवाखाना सुरु झाला. प्रत्येक सरळ गोष्ट हटकून वाकडी घडू लागली. पुढे जाण्यासाठी पाऊल उचलावे तो शंभर कदम पिछेहाट.

परिस्थितींत एकदम एवढा भयंकर ट्रान्सफर सीन झाला, की हातच्या कारभारांत बोल बोलतां होत्याचे नव्हतें झाले. व्यावहारीक कारणें केवळ निमित्तमात्र, परंतु घडला प्रकार केवळ कल्पानातित . विपरीत परिस्थितिचे मधून मधून भयंकर बॉम्ब स्फोट उडत असतानाही , ज्या श्री हरिने मला हाती धरुन प्रवोधन आणि इतर लहान मोठे ग्रंथद्वारा जनता जनार्दनाची सेवा घडविली, त्यानेच एकद्अम (१९२४ साला प्रमाणेच) पुन्हा अज्ञातवासाची देवाज्ञा फर्वावली. तीहि मी प्रणिपारपूर्वक शिरसावंद्य मानून त्याच्या प्रेमळ कॄपेचा दीप कोठे कधी कसा पाजळणार , याची अपेक्षा करीत स्वस्थ बसलो. देशांत नानाविध चळवळींच्या उलट सुलट लाटा बेभान उसळत असतां, ऎन भररंगात प्रबोधान आणि लोकहितवादी यांच्यावर अकल्पित अज्ञातवासाच्या क्रांतीचा सुरुंग फुटावा, यात पारमेश्वरी ईच्छेचे काय गुढ भरले असेल, ते या क्षणी तरी माझ्या अटकळीत येऊ शकत नाही. भविष्यकाळ या कोड्याचा खास उलगडा करीलच करील ! ज्योतिषि मित्र म्हणतात की मी सध्या शनिच्या साडेसातीच्या उत्तरार्धात आहे. सन १९२२ सालच्या सरकारी नोकरीच्या राजीनाम्यापासून साडेसातीच्या क्रांतीचक्राची सुरुवात झाली. प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता या त्यांच्या म्हणन्यात पुष्कळ तथ्यांश आहे., तत्त्वशंहि आहे. आपत्तींच्या कित्येक तारखांचे फेरे आणि ठोकताळे इतके तंतोतंत पटतात आणि काहीच कारण नसता अकल्पित घडणार्याव चमत्कारीक घटनांपुढे विचार आणि व्यवहार इतके विलक्षण बुळे बावळे बनतात, की यत्नवादाला दैववादाच्या सीमेशी कोठे तरी नेऊन भिडविल्या शिवाय सुटकाच नसते. चालू अज्ञातवासात या विषयाचा जो सर्व बाजूनी मी स्वानुभवपुर्वक विचार केला आहे, तो शनिमाहात्म्य अथवा ग्रहदशेच्या फेर्याहचा उलगडा नामक विस्तृत ग्रंथाच्या रुपाने मी येत्या मे महिन्यात जनता-जनार्दनाच्या चरणी सादर रुजू करणार आहे. त्यांत माझी सद्य:स्थिति आडपडदा न ठेवतां चित्रित केलेली आढळेल.या नवीन ग्रंथाची जाहीरात सोबत पाठवित आहे.

(२) वृत्तपत्रकारांचे जिकिरी जीवन कायदेशीर मार्गाने पद्धतशिर रजिष्टर्ड झालेल्या आणि वेचक वेचक विद्वान व्यवहारपटूंच्या अनेक हाती संघटनावर चालणार्याश लोकमान्य दैनिका सारख्या मोठमोठ्या