वैचारिक ठिणग्या : Page 10 of 20

जिवंत गाडले !... प्रत्येक ख-या खोट्या जबाबदा-या हिंदूंच्या हिंदूपणाचे मर्म त्यांच्या धर्माच्या षंढत्वात आहे !! हिंदूंना माणुसकीची आणि माणुसकीच्या नैसर्गिक हक्काची जर काही चाड उरली असेल, तर हा षंढ धर्मच नष्ट करावा धर्माच्या लोढण्याशिवाय जगणारे पुष्कळ समाज जगात आहेत ! आणि ते स्वयंनिर्णयाचे स्वर्गतुल्य सौख्य अनुभवीत आहेत.'' देव आणि देऊळ याविषयी  प्रबोधनकार म्हणतात, ''भटेतरांच्या धार्मिक गुलागगिरीच्या थोतांडात देवळाचा नंबर पहिला लागतो.देवळाची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला झालेली नाही ! हिंदू धर्माची ही अगदी अलिकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे जे आलय, वसतीस्थान ते देवालय... आमचे तत्त्वज्ञान पहावे, तो देव ‘चराचर’ व्आरून आणखी वर दशांगुळे उरला आहे. अशा सर्वव्यापी देवाला, चार भिंतींच्या आड, आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन रहाण्याची जरुरच काय पडली?''

 ''बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परागंदा होईपर्यंत, भारतीय इतिहासात देवळाचा कोठेच काही सुगावा लागत नाही!... मग, काय तोपर्यंत आमचे हिंदू देव थंडीवा-यात कुडकुडत आणि उन्हातान्हात धडपडत कुठेतरी पडले होते?'' (‘देवळात धर्म आणि धर्माची देवळे’ ः पान १७४)  ''इसवी सनाच्या ७ व्या, ८ व्या शतकात शंकराचार्यांचा अवतार झाला. या महाशयाने रजपूतांच्या पाठबळाने बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या, आणि बौद्ध विहाराचे रूपांतर त्याने देवळात केले !''  ''जोपर्यंत चिलीमच नव्हती, तोपर्यंत गांजाची जरूर कोणालाच नव्हती. देवळांच्या चिलमी निघाल्यावर निरनिराळ्या देवांचा गांजा पिकवायला हिंदूंच्या तरल कल्पनेला कसला सायास? शंकराची देवळे निघतात, न निघतात – तोच गणपती सोंड हलवीत, मारुती गदा झेलीत, बन्सीधर कृष्ण मुरली मिरवीत एकामागून एक हजर !!''  समाज बहिष्कृत पडल्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या लक्षावधी लोकांनीही आपल्या जिवाच्या समाधानासाठी म्हसोबा, खैसोबा, चेडोबा असे अनेक ‘ओबा’देव – साध्या दगडांना शेंदूर फासून निर्माण केले.  ''आद्य शंकराचार्यांनी रक्तपाताच्या अत्याचारी पुण्याईवर पुनरुज्जीवित केलेली भिक्षुकशाही जसजशी बेफाम थरारू लागली, तसतशी जातिभेदाची आणि देवळांची पैदासडुकरिणीच्या अवलादीला बरे म्हणवू लागली !'' (पान १५६-१५७)  ''देवळाचा धर्म म्हणजे भटांच्या पोटापाण्याचे गुप्त मर्म आहे या मर्माचे वर्म अफाट भटेतरांना कधीच उमगू नये, म्हणून भटांनी १८ पुराणांची पैदास करून ठेवली आहे. गीता, उपनिषद वगैरे कितीही क्रांतिकारक आणि सत्यशोधक ग्रंथ असले, तरीही देवळावर देह जगविणा-या भू-देवांचा विशेष मारा पुराणांवरच असतो! देवळांचे महात्म्य पुराणांनी वाढविले !!''  ''पुराण म्हणजे शिमगा -'' असे विचारवंत म्हणतात. ''पुराण म्हणजे हिंदू धर्मचा शोचकूप !'' असे आमचे मत आहे... ''पुराणात काही गोष्टी चांगल्या आहेत.'' असे काही भेदरट सुधारकही म्हणतात. असतील ! शौचकुपात पडलेल्या मोहरा, पुतळ्या ज्यांना उचलायच्या असतील, त्यांनी खुशाल उचलाव्या. आम्ही त्यांचा हात धरू इच्छित नाही.  पुराणे म्हणजे शौचकूप ठरल्यावर, त्यांच्या जिवावर जगणा-या देवळात काय काय पातकांच्या गिरण्या सुरू असतात, याची कल्पनाच केलेली बरी – (पान १५९-१६०)

 पुराणाच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारो भोळसट हिंदूंनी गावे, जमिनी, दागदागिने देवाला आंदण द्यावी – ती आयतीच पुजारी भटांच्या पदरी पडत ! नाव देवाचे, गाव भटाचे !! (पान १६०)  मूर्तीपूजा बरी की वाईट? खरी की खोटी? तारक का मारक? हे मुद्दे थोडा वेळ बाजूला ठेवले, तरी देवळातल्या देवात काहीतरी विशेष ‘देव’पणा असणे, आणि तसा तो अ-किल्मिष भासणे अगत्याचे नाही का? देवाचिये द्वारी । उभा क्षण भरी ।। तेणे मुक्ती चारी । साधियेल्या ।।धृ.।। ‘द्वारी’, ‘क्षणभर उभा’ रहाणारा आणि रहाण्याची शिफारस करणारा कवी मनाने भटी महात्म्याचा गुलामच असल्यामुळे, देवळांच्या आत पुजा-यांचे काय रंगढंग चालू असावेत? याची त्या बावळटाला काय कल्पना असणार? (पान १६२)  देवळाशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही ! देवळं म्हणजे हिंदूंच्या अतिद्वेषाची नरककुंडंच ! देवळांचे महात्म्य संपूर्ण नष्ट झाल्याशिवाय, हिंदू समाजाच्या गुलामगिरीला कारण