वैचारिक ठिणग्या : Page 2 of 20

अशी छोटी पुस्तिका आजच्या ‘दूरदर्शन’च्या जमान्यातली कुशाग्र बुद्धिची मुले एका बैठकीत वाचून काढतात. त्यांच्याच सारासार विवेकावर विसंबून उज्ज्वल भवितव्याची आशा बाळगणारा-

रंगनाथ कुलकर्णी रंगनाथ कुलकर्णी यांची पुस्तके

1)मार्क ट्वेन - परचुरे प्रकाशन २) चार्ली चॅपलिन - लोकवाङ् मय गृह ३) चणेखाल्ले लोखंडाचे - जयहिंद प्रकाशन ४) सुरईतला राक्षस - जयहिंद प्रकाशन ५) आई (ध्वनिचित्र) - विदुला प्रकाशन ६) एका गाढवाची कहाणी - शुभा प्रकाशन ७) साहेब – यशवंतराव - पुरुषोत्तम प्रकाशन ८) घार हिंडते आकाशी - शुभा प्रकाशन ९) प्रयोग (आत्मकथा) - शुभा प्रकाशन १०) पुत्र सांगती (कादंबरी) - शुभा प्रकाशन ११) जाड्या, रोड्या, लंबू - शुभा प्रकाशन आणि चेटकीय (को. म. सा. प. चा १९९८ चा बालवाङ् मय पुरस्कार प्राप्त) १२) चिमणराव - पुरुषोत्तम प्रकाशन १३) सुदाम्याचे पोहे - पुरुषोत्तम प्रकाशन १४) तिकीट (नाटक) - शुभा प्रकाशन

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची साहित्य संपदा (जन्मः १७ सप्टेंबर १८८५ मृत्यूः २० नोव्हेंबर १९७३) 1)माझी जीवनगाथा – आत्मवृत्त १६) कुमारिकांचे शाप 2)रंगोबापूजीः सातारच्या १७) पंडिता रमाबाई राज्यक्रांतीचा इतिहास. त्यात १८) संत गाडगेबाबा चरित्र रंगोबापूजीची भूमिका. १९) रायगडः वर्णन व चिंतन ३) संगीत सीताशुद्धी नाटक २०) महामायेचा थैमान ४) संगीत काळाचा काळ --''— २१) मुमताज प्रकरणांचा दंभस्फोट ५) संगीत टाकलेलं पोर --''— बावला मुमताज प्रकरण ६) संगीत खरा ब्राह्मण --''— २२) Temptress (इंग्रेजी) ७) संगीत विधिनिषेध --''— २३) शेतक-यांचे स्वराज्य ८) हिंदुजनांचा –हास आणि २४) पोटाचे बंड अधःपात २५) दगलबाज शिवाजी ९) हिंदूधर्माचे दिव्य, अर्थात २६) साता-याचे दैव की दैवाचा संस्कृती संग्राम सातारा १०) कोदण्डाचा टणात्कार २७) आई ११) भिक्षुकशाहीचे बंड २८) पावनखिंडीचा पोवाडा १२) ग्रामण्याचा साद्यंत इतिहास २९) जुन्या आठवणी १३) स्वाध्याय संदेश ३०) देवळांचा धर्म आणि धर्माची १४) शनि महात्म्य – अर्थात् देवळे ग्रहदशेच्या फे-याचा उलगडा महादशेच्या फे-याचा उलगडा ३१ ते ४२) प्रबोधन मासिकाचे ६ १५) वक्तृत्वशास्त्र १५) वक्तृत्वशास्त्र ः वर्षाचे अधलेमधले १२ अंक उपलब्ध नाहीत ४३) संत रामदास चरित्र ४४) बापाची कसरत – मुलीची फसगत

जळगाव येथील नेहते यांच्या दैनिकाच्या अंकात १९५६ ते १९६० अखेरपर्यंत दर रविवारी लिहिलेले लेख ‘नवाकाळ’ मध्ये १९५६-१९६० या काळात दर रविवारी ‘घाव घाली निशाणी’ सदर लिहिले. अंक मुंबई मराठी ग्रंथालयात उपलब्ध आहेत, परंतु अवस्था इतकी नाजूक आहे की, झेरॉक्स करणे शक्य नाही. हे सर्व लेख संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या भूमिकेतून लिहिलेले होते. दोन्हीकडचे मिळून १०२ लेख भरतात. शिवसेनेच्या प्रारंभी काढलेली ‘SHIV-SENA SPEAKS’ ही पुस्तिका. मार्मिक मधील तत्कालीन लेखांचे संकलन ‘ऊठ मराठ्या ऊठ.’ सुधारकाची साक्षात मूर्ती प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे जीवन म्हणजे अन्यायाविरुद्ध त्यांनी केलेल्या अखंड संग्रामाचे महाकाव्य असे म्हणता येईल. मिळेल तेथून ज्ञान संपादन करण्यासाठी आधाशाप्रमाणे वाचन करणारे आणि सखोल चिंतन करुन सत्यासाठी लढणारे विचारवंत असे त्यांचे वर्णन करता येईल. आजकाल प्रागतिक म्हणून मिरवावयाचे असेल तर महात्मा फुले यांनि स्तुतिसुमने वाहिली की पुरेसे होते. पण पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून फुले यांचा छळ झाल्यानंतरच्या काळात फुले यांचा लढा पुढे चालविण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे पुण्यात तळ ठोकून राहिले. त्यांच्या मार्गात विरोधकांनी आणलेले सर्व अडथळे त्यांनी मोडून काढले व त्यांनी केलेल्या छळास तोंड दिले. फुले यांचा लढा त्यांनी पुढे चालवितांना सा-या विरोधकांची दाणादाण उडविली. त्यांची भाषणे आणि त्यांचे लेखन इतके प्रभावी होते की, त्याच माध्यमातून सत्यशोधकांचा लढा महाराष्ट्राच्या कानाकोप-यांत पोचला. लोकहितवादी, आगरकर आणि महात्मा फुले यांच्या क्रांतिकारक वाङमयाचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणा करण्यासाठी आपण काय करावयास हवे याची एक खास अंतर्दृष्टी त्यांनी विकसित केली. त्या विचाराचा प्रसार करणे हेच त्यांनी आपल्या जीवनाचे