पावनखिंडीचा पोवाडा: Page 4 of 5

॥ सांगितलिं एक हितगोष्टी ॥ ठोकीन तोफा पांच पोंचता रांगण किल्य़ासी ॥उदो० ॥

----------------------------------------------

— ९— गडी मावळे मुठभर सारे तोडी खिंडीच्या॥ उभे राहूनी छाटिती सप सप तुकड्य़ा शत्रूच्य़ ॥१॥

गुं गुं भरभर सों सो सुटती दगड गोफणींचे ॥ बाणांचा सणसणांट पाडी ढीगार प्रेतांचे ॥२॥

चमचम चमकति तलवारीची भाल्य़ाची पाती ॥ शिरे कितीतरि चेंडुसारखी भरभर वर उडती ॥३।।

चहुकडे घनदाट चालले पाटची रक्तांचे॥ धारातीथी "खतम "जाहले वीर फाजलाचे ॥४॥

हत्ती बुडेसा चिखल जाहला रक्तामांसाचा ॥ युध्द नव्हे ! तो पसरे जबडा विश्र्वभक्षकांचा ॥५॥

तांडावरती उभा वीर प्रभु बाजी देशपांडे समशेरीच्या फडक्य़ासारसा करि अरिचीं खाडें ॥६॥

पट्टा फिरवित उभा ठाकला काळ अविंधांचा॥ दाट पडे तट पाठीमागें मर्द मावळय़ांचा ॥७॥

हल्य़ावरती हल्ले चढती देती किती टकरा॥ परंतु उतरा बाजी खाली फाजलचा नखरा ॥८॥

॥चाल॥ नाहला उभा रक्तांनी॥ नाह०॥ किती जखमांनी॥ युध्दश्रमांनीं॥ मागे न पाय तिळ घेई॥

हल्यांची नित्य नवाई ॥ पट्याची अति चपळाई॥ ही शिवबाची पुण्याई॥

----------------------------------------------

—१० — उरता थोडे सैंन्य़ दणाणे धावे शिध्दीचे॥ शक्ती युक्ती हरली संपले प्रभाव बुध्दीचे ॥१॥

चढवी चिडुनी अखेरचा मग निकरांचा हल्ला॥ संधि साधुनी बमी बाजीप्रभू जखमी केला ॥२॥

बांधुनि जखमा तयार झाला वीर दुजो-याने ॥ हटे न तिळ जरि शिकस्त केली शिध्दी फाजलने ॥३॥

एक दोन ना बारा झाल्या जखमा बाजीला ॥ मान न त्याला परी लढे तो स्वामीकार्याला ॥४॥

शिवरायाची तोफ जोंवरी पडे न मम कानी ॥ तोंवरी आला काळ तरि त्या ठेचिन लाथांनि ॥५॥

जय हर जय हर बोलुनि चेतवि सर्व सौंगड्य़ांना ॥ तेही पठ्ठे कसून लढती त्य़जुनि देहभाना ॥६ ॥

तोफ ऐकुं म्हणुनी व्य़ाकुळ मनि बाजी ॥ पाच तास तो लढला परि नच हटला रणगाजी ॥७ ॥

उभा ठाकला पुढे काळ साक्षांत त्यांस खाया ॥ पंरतु मानी त्यांस न तिळ धरि चित्त प्रभूपाया ॥८ ॥

॥चाल॥ घोम धडडड धडडड ऐसा ॥धोम्०॥ ध्वनि तोफांचा । शिवरायाचा ॥ शेवटी पडे तो कानी ॥

जीवास धन्य तो मानी॥ जयशिव जयशिव हें म्हणूनि ॥ अंतिचा श्र्वास सोडुनि॥

धारातीर्थी मोक्ष मिळे प्रभु रणशुर बाजीशी ॥ सुरनर किन्नर गाउनि करती सुपुष्यवृष्टीशी ॥

------------------------------------------------------

—११— बाजी पडतां सिद्धि धावला त्यास आलिंगाय ॥ फाजल महमद उडी घेउनी ये स्तवना गाया ॥ १ ॥

‘भले बहाद्दर भले बहाद्दर दुस्मन तूं दाना’ ॥ तलवारीनें वंदन करिता वांकवुनी माना ॥ २ ॥

बाजीला मग मुजरा केला अखेर सर्वानी ॥ मुसल्मानही रडले जरि ते फुगले गर्वानीं ॥ ३ ॥

सभोवतीं मग जमला मेळा मर्द मावळ्यांचा ॥ मुक्तकंठ तो शोक कुणी बा! वर्णावा त्यांच्या ॥ ४ ॥

सन्मानानें प्रत बाजीचें नेले शिवपायां ॥ रडे मुलापरि धायधाय शिवराय पडे ठायां ॥ ५ ॥

बळी दिला तूं तुझ्या जिवाचा केवळ मजसाठी ॥ राष्ट्रोन्नतिची जणू बसविली कोणशिला मोठी ॥ ६ ॥

ज्या भूमीवर रक्त सांडले या प्रभु वीराचें ॥ दर्शन घेतां गहिवरती नर अलोट धीराचे ॥ ७ ॥

बाजी गेला कीर्त करुनिया बखरी त्या गाती ॥ विसरे ज्या दिनि महाराष्ट्र त्या खाइल तें माती ॥ ८ ॥

आकाशीं जोवरी चमकती चंद्र सुर्य तारे ॥ गातिल शाहिर कवनांवरती कवन कंरुनि सारे ॥ ९॥

॥चाल॥ प्रभु बाजी देशपांडयाचा ॥प्रभु०॥ पवाडा पुरा। मोत्याचा तुरा ॥

वाहिल बाजीच्या पायीं ॥ त्याचीच सर्व पुण्याई ॥ ती प्रसन्न अंबाबाई ॥

म्हणुनी हे कवन मी गाई ॥ शाहिर केशव अखेर करितों मुजरा सर्वासी ॥ उदो०॥

------------------------------------------------------

सामाजिक धार्मिक व राजकीय स्वयंनिर्णयाची विचारक्रांती प्रबोधन मासिक नियमाने वाचल्यास होते