पावनखिंडीचा पोवाडा: Page 2 of 5

मी म्हणुनी पुढें सरकले शुर वीर गाजी ॥ हाच भराडी ललकारीनें चेतवि गज बाजी ॥७॥

चाल ॥जय उदो उदो अंबेचा ॥जय०॥

जगदंबेचा। महाराष्ट्रचा ॥ ऐळकोट मार्तंडाचा। जय छत्रपती शिवबाचा॥

जय किल्ले रायगडाचा॥ जय भगव्या जरिपटक्याचा॥ हर हर हर हर महादेव गर्जना करा खाशी॥ उदो०॥

----------------------------------------------

—२— वर्दी गेली विजापुरला पडला अफझुल्ला॥ तुटला उजला हात शहाचा झाला बहु गिल्ला॥१॥

बिकट पेंच हा पडला होता खुद्द शिवाजीला ॥ कारण अतिशय शूर वीर लढवय्या अफझुल्ला॥२॥

अफाट सेना निवडक हाती दैत्यासम शक्ती॥ पंरतु करिता मात म-हाठे धन्य राष्ट्रभक्ती॥३॥

वाघनखाच्या कचक्यासरसा लोळविला खालीं॥ कदरबाज महाराष्ट्र म्हणुनिया गोष्ट अशी घडली॥४॥

जय हर जय हर म्हणतां शिवबा निशाण विजयाचें॥ उंच फडकतां येत मावळ्यां भरतें शौर्याचें॥५॥

नायक पडतां मोंगल हटलें धैर्य सर्व सुटलें॥ त्यांत मावळे हल्ला करितां धूम पळत सुटलें॥६॥

प्रतापगडचा प्रताप सारा स्वार्थत्यागाचा॥ राष्ट्रभक्तिचा, धारिष्टाचा, अचाट हिमंतीचा॥७॥

महाराष्ट्रच्य़ा धर्मावरचे संकट हे मोठ॥ श्रीअंबेने पार पाडिले अडलें नच कोठे॥८॥

चाल॥मन एक सर्व राष्ट्राचें ॥मन०॥ एक मताचे एक जिवाचे॥ य़ानेच दिले य़श कार्या॥

गुरूकिल्ली ही चिर विजया॥ भुलवी न कुणा रिपुमाया॥ ये धांवत लक्ष्मी पायां॥

गजांत लक्ष्मी ऐश्र्वर्यातें करि शिवप्रभु दासी ॥ उदो०॥

----------------------------------------------

—3— पडतां समरी पिता चढे तो त्वेषहि पुत्राला॥ फाजल महमद उठे कडाडुनि घे करिं शस्त्रला ॥१॥

पातशहाला घि:कारुनि तो वदे "कसे बसला॥ "स्वस्थ षंढ हो! चिरडि शिवाजी माझ्या बापाला ॥२॥

पहाडका वो चुव्वा काफर क्यों मिले जिंदा"!॥ "मैं अकेला खतम करुंगा " अशी करी निंदा ॥३॥

शिवयुक्तीच्या पुढती फोल सर्व सक्ती॥ कुणी कुणावर करु शकेना युद्धाची शक्ती ॥४॥

ठका महाठक असा रचनिया कपटाचा कावा॥ निघे संगरी फाजलु घ्याया शिवकंठी चावा ॥५॥

शिद्धी सरजाखान निघाले घेउनि सैन्याला॥ जाणुनि पुरतें मनी भेटण्या जातों दैन्याला ॥६॥

" जंगलका वो शेर शिवाजी " पन्हाळ किल्याला॥ आला ऐंशी खबर लागता वेढा त्या दिघला ॥७॥

जाळ्याध्यें पुरा पकडला सिंह म-हाठयांचा॥ वाटे सर्वां येथ बुडाला बेत शिवाजीचा ॥८॥

चाल॥ लागली तात मानेला ॥लाग०॥ श्रीशिवप्रभुच्या। महाराष्ट्राच्या ॥ धडकले सैन्य त्या रिपुचें ॥ चढविले घमघमे मोर्चे॥

यावनी वीर नच कच्चे॥ जावते बंद किल्याचे॥ पहा पहा शिव झाला अंबे! कारागृहवासी ॥उदो०॥

----------------------------------------------

—४— दाणा वैरण दारुगोळा भरपुर किलल्याला॥ होता म्हणूनी जुमानिले ना परकी हल्याला ॥१॥

किल्याखालुन तोफ सुटे ये गोळा परतुनि॥ वरुनि लोटतां सहज दगड रिपु मरती चिरडोनि ॥२॥

तोफातोफी बहुतचि केली मरे न मरगट्टा॥ हिंमत खचली जरि तो फाजिल हिंमतीचा कट्टा ॥३॥

वरचा मारा अचाट मारी शत्रुसैन्य भारी॥ तारी ज्याला तुळजादेवी त्यास कोण मारी! ॥४॥

कितिक महाटे फकिरवेषें शत्रुगणी घुसले॥ खुशाल फिरुनी वेध काढिती कुणा न ते दिसले ॥५॥

दाणा वैरण मिळे न रीपुला कारण नेताजी॥ रोंखुनि बसला बाहिर सगळ्या वाटा रणगाजी ॥६॥

किल्यावरचा मार त्यांत भर उपासमार झाली॥ विजापुराची सर्वच सेना रडकुंडी आली॥ ७॥

मुसलमान आणि शूर मराठे चार मास ल़ढले॥ मिळे न किल्ला चढे न हल्ला मुसलमान थकले ॥८॥

चाल॥ ‘चल छोड देवजी किल्ला’॥ चल०॥ एकच गिल्ला। करीती हल्ला॥ मग धीर देत त्या शिध्दी॥

"ही योग्य म्हणे नच बुध्दी॥ "येईल आपणां सिध्दी॥ संपली रिपूची सद्दी॥ "ताडताड तट फोडुनि जातों या या पाठीशीं॥उदो०॥

----------------------------------------------

— ५— सावधान द्या श्रोतेगणहो। झोंपु नका कोणी॥ नातरि ठरविल बहि-यापुढची ही माझी गाणीं॥१॥

राष्ट्रविनाशक काळझोप कां अझुनी नच गेली॥ डुलक्या पाहुनि वाटे तुमची हितबुध्दी मेली॥२॥

कशास चिडतां प्रियबांधवहो ?वटारितां डोळे॥ सांभाळाहो! शिद्धि फेंकतो तोफेचे गोळे ॥३॥

अनेक युक्त्या वरवर करि जरि देह शिवाजीचा॥ विसरुं नका त्यामधे विहरतो आत्मा बाजीचा॥४॥

बाजी