पावनखिंडीचा पोवाडा

प्रबोधनकार ठाकरे हे जसे तिखटजाळ लेखक तसे कवीही. पण ‘कवी केशवा’चे हे काव्यही लोकजागृतीसाठीच होतं. त्यांनी लिहिलेले दोन पोवाडे आज उपलब्ध आहेत. बाजीप्रभू देशपांडे हे प्रत्येक मराठी माणसासाठी कायम प्रेरणेचा स्रोत आहेत. प्रबोधनकारांनी दादर येथे त्यांचा स्मृतिदिन दरवर्षी साजरा करण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी लिहिलेले हा पोवाडा.

----------------------------------------------

पहिली आवृत्ती (१९१८)

"आम्ही सूरमर्द क्षत्री! नाही भिणार मरणाला॥ शाहिर तुलशीदास.

॥ श्री शिवछत्रपती महाराज की जय॥

पावन खिंडीचा पोवाडा.

आवृत्ती २ री

बळी दिला तूं तुझ्या जिवाचा केवळ मजसाठी राष्ट्रोन्नतिची जणू बसविली कोणशिळा मोटी.

प्रकाशक – केशव सीताराम ठाकरे,

प्रबोधन ऑफिस, ३४५ सदाशिव पेठ,पुणे शहर.

किंमत एक आणा.

----------------------------------------------

वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या संबंधाने कै. न्यायमुर्ती रानडे यांचे उद्धार. "प्रसंग फार कठीण आला, पण अशा वेळी बाजी प्रभुने बाजू राखली. शिवाजी महाराज रांगणा किल्ल्यावर सुखरुप जाऊन पोचल्याच्या तोफा ऐकू येईपर्यंत हा शूरवीर रस्त्यावरील एका अवघड खिंडीच्या तोंडाशी फक्त १००० लोकांनिशीं उभा राहिला. विजापूर सरदारच्या अवाढव्य सैन्याने आपली होती नव्हती तेवढी अक्कल खर्च केली, पण या बहाद्दाराने त्यात एक पाऊलही पुढे टाकूं दिले नाही. किती तरी जखमा लागल्यामुळे हा वीर रक्ताने अगदी न्हाऊन गेला होता. त्याच्या अंगी उभे राहण्याचीहि ताकद राहिली नव्हती. तरीही रांगण्यावरील (खुणेची) तोफ ऐकेपर्यंत त्याने रणांगण सोडले नाही. शेवटची तोफ ऐकली तेव्हा या वीराने आपला प्राण सोडला. काय ही स्वामिभक्ति आणि काय हा स्वदेशाभिमान! अशी नररत्ने शिवाजीच्या साहाय्यास नसती तर शिवाजीच्या हातून काय झाले असते ?" (मराठयांच्या सत्तेचा उत्कर्ष पृष्ठ ४९)

----------------------------------------------

प्रस्तावना

या लोकपिय पोवाडयाची पहिली आवृती ता.२९ मे सन १९१८ रोजी निघाली व त्याच दिवशी वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांच्या वार्षिक सार्वजनिक स्मृतिदिनाचा उपक्रम ज्योतिर्माला कचेरीच्या दिवाणखान्यांत दादर येथे प्रथम करण्यात आला. तेव्हांपासून हा स्मृतिदिन महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दरसाल नियमित साजरा होत असतो. बाजीप्रभूंच्या आत्मयज्ञाची तिथी कोणती? हा वाद-इतर तिथ्यामित्यांच्या वादाप्रमाणेच-उपस्थित झाला आहे, तरी स्मृतिदिनाच्या वार्षिक समारंभांत कोठे खंड पडत नाही. ही आनंदाची गोष्ट होय. मुख्य प्रश्न स्मृतिदिनाचा आहे, तिथीच्या गुलामगिरीचा नव्हे. बाजीप्रभूंचे खास वंशज कै. विनायकराव देशपांडे (मेजर सुभेदार लक्ष्मणराव देशपांडयांचे बंधू ) यांनी २९ मे ही तारीख संग्रहीच्या कागदपत्रावरून श्री ठाकरे य़ांस कळविली होती. श्रीयुत वेंद्रें प्रभृति संशोधक आषाढ व०१ म्हणतात. ठीक आहे. कोणतीहि तारिख धरा, पण बाजीप्रभूला स्मरा. कारण:- बाजी गेला कीर्त करूनिय़ा बखरी त्य़ा गाती विसरे ज्य़ा दिनिं महाराष्ट्र त्य़ा खाइल ते माती ही प्रस्तुती शाहीराची तलाख आहे. हा पावन खिंडीचा पोवाडा महाराष्ट्राच्य़ा सर्वच क्षेत्रांत पडलेल्य़ा भेदभावाच्य़ा खिंडाराना एकजिनसि एकीच्य़ा चैतन्याने पावन करो? प्रबोधन कचेरी, सज्जनांचा कृपाभिलाषी, पुणे शहर. रामचंद्र वामन चित्रे (बी.ए.) ता. १ आँगष्ट १९२५. सह- संपादक मासिक प्रबोधन,

----------------------------------------------

"आम्ही सूरमर्द क्षत्री! नाही भिणार मरणाला॥ शाहिर तुलशीदास.

॥ श्री शिवछत्रपती महाराज की जय॥

पावन खिंडीचा पोवाडा. अर्थात् वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचा आत्मयज्ञ.

"चाल:-विजयादशमी सण विजयाचा.

जय जय अंबे माय भवानी तुळजापुरवासी॥ उदो उदो श्री जय जगदंबे रक्षि बाळकांसी ॥ धृ०॥

गोंधळ अंबे! तुझा घालण्या अनन्य भावाचा॥ दिवटा घेउनि करी नाचतो शाहिर शिवबाचा ॥ १॥

तुझ्या कृपेची पांखर अंबे! कवनावरि पाडी॥ पहा कसा मग कवि मोत्यांचा जणुं पाऊस पाडी॥ २॥

तुंच नाहिं कां केलें अंबे! शिवबाला धन्य॥ सांग कुणाच्या पदी रिझे तो तिजवांचुनि अन्य॥३॥

आळविले तुज परोपरीनें रामाच्या दासें ॥ कुठें जाउं मी टाकुनि असलें मोक्षदपद खासें॥४॥

स्फूर्तीच्या तेलांत भिजविला दिवटा कवनाचा॥ पेटविला बघ नाचुनि गातो शाहिर मानाचा ॥५॥

मीच नाचलो शिवबापुढती रायगडावरती ॥ थाप डफावर पडे पडे तों अस्तानि हो वरतीं ॥६॥

मी