ऊठ म-हाठ्या ऊठ: Page 6 of 31

कामा नये. भाषिक राज्य-स्थापनेचा हा मूळ उद्देश. पण तो महाराष्ट्र राज्याच्या कारभा-यांना अजूनही नीटसा हाताळता आलेला नाही.

अगदी परवाची कथा ऐका. म्हैसूर राज्यातल्या शिमोगा जिल्ह्यातल्या एका जंगलात केरळीय उप-यांनी बेकायदेशीर वसाहत तयार केली. जंगलातील लाकडे तोडून व्यापार चालू केला. तेथे एक चर्चही उभारले. उप-यांची संख्या अंदाजे ३ हजारांवर होते. म्हैसूरचे मुख्य प्रधान निजलिंगप्पा यांचे नजरेला केरळी उप-यांचे हे बेकायदेशीर आक्रमण येताच त्यांनी त्यांना एक आठवड्यात चले जावची नोटीस दिली. हे उपरे नोटीशीच्या पोटिसाला धूप घालण्याइतके थोडेच सभ्यतेच्या मर्यादेतले असतात! सभ्यपणाच्या सगळ्या मर्यादा झुगारून केवळ पाहणा-यांच्या नजरेवर मेहरबानी करण्यासाठी फक्त दीड दोन हाताची लुंगी गुंडाळून मन मानेल तेथे घुसणारे घुश्ये. त्यांनी निजलिंगप्पाला अंगठा दाखवताच त्यांनी ताडकन् पोलिसी फौज पाठवून, केरळी उप-यांना झोपड्या झोपड्यातून बाहेर ओढून, त्या पेटवून दिल्या, त्यांचे ते चर्चही जाळून भस्मसात केले. सारी वसाहत नष्ट केली. `दिल्लीवाले काय म्हणतील?’ या भ्याड चिंतेला त्यांनी सफाचट ठोकरून, म्हैसूर म्हैसू-यांसाठी, हे तत्त्व अक्षरशः अंमलात आणले. थोतांडी राष्ट्रवादाचा त्यांनी मुलाहिजा राखला नाही. या वेळीही `भारतीय व्यक्तीला भारतात कोठेही राहण्याचा, जगण्याचा हक्क आहे,’ या घटनेतल्या श्रुति, स्मृती-पुराणोक्त सूत्राकडे बोट दाखवून, म्हैसूरचे कान वाजविण्याची केंद्री मठपतींना हिम्मत झाली नाही. कारण नंगेसे खुदाभी डरता है. नंगेसे खुदाभी डरता है! `जे नंगे होत नाहीत, ते मोक्षाला जाऊ शकत नाहीत. नंग्याला खुदाही डरतो, आणि राज्यकर्त्यालाही खरे भय नंग्याचेच वाटते. या भारताला मुक्त केले, ते एका नंग्या फकिरानेच. देवांमध्येही जो नंगा, तोच महादेव ठरला. जो नंगा नाही, त्याचे म्हणणे कोणी ऐकून घेत नाही. तेव्हा गड्या, तूही नंगा हो.’ (कण्टकांजलीः पान ३२)

बंगालची फाळणी झाली. बंगालभर बंगाल्यांचा आरडाओरडा चालू झाला, त्या प्रसंगी महाराष्ट्राचे लोकमान्य प्रतिनिधी टिळक जातीने तिकडे धावले. उभा हिंदुस्थान जागा करण्यासाठी देशभर त्यांनी दौरे काढले एकजात सगळ्या म-हाठी पत्रांना वंगभंगविरुद्ध आंदोलनाची ज्वाला उफाळण्याच्या कामाला जुंपले. बंगाली नेत्यांच्या खांद्याला खांदा भिडवून अखेर वंगभंग रद्द करविला. महाराष्ट्राने जिवाचे रान करून, बंगालच्या छातीवर रोखलेली कु-हाड वरच्या वर झेलून त्याची मुक्तता केली. आज तोच बंगाल महाराष्ट्रावर सापासारखा उलटला आहे. कलकत्ता येथील महाराष्ट्र निवास ही फार जुनी संस्था आहे. काही दिवसांपूर्वी कोणी तरी त्या इमारतीवर काळे निशाण लावले. निवासाच्या संस्थापकांना या घटनेची काही कल्पनाच नव्हती. अचानक कोणीतरी (बहुतेक लावणारांनीच) ते काळे निशाण काढून टाकले. लगेच दीड-दोनशे बंगाली महाराष्ट्र निवासावर चाल करून आले आणि कोणी नि का निशाण काढले? याचा जबाब व्यवस्थापकास खडसून विचारू लागले. लावले केव्हा नि कोणी आणि काढले केव्हा नि कोणी, याची व्यवस्थापकांना कल्पनाच नव्हती, तर ते काय खुलासा करणार? बस्स. वढे निमित्त बंगाली गुंडांना दंगल माजवायला पुरेसे झाले. त्यांनी महाराष्ट्र निवासवर भयंकर दगडफेक केली. तावदाने फोडली. खिडक्या मोडल्या. हा सर्व `राष्ट्रवादी’ मंगल सोहळा चालू असता, महाराष्ट्राला नि मराठ्यांना अचकट विचकट शिव्यांचेही दान चालू होते. अखेर `म-हाठेको बंगालसे तडीपार, हकाल देंगे’ इत्यादी नि वगैरे पोटभर धमक्या दंगलखोरांनी दिल्या नि गेले.

सारांश, म-हाठेतर इतर सर्व भाषिक राज्यांत महाराष्ट्र आणि म-हाठ्यांचा भयंकर द्वेष राजरोस भडकतो आहे. प्रत्येक राज्यात म-हाठ्यांच्या हकालपट्टीची धमक्यांची भाषा चालू आहे आणि आमच्या महाराष्ट्र राज्यात परकीय उप-यांना `आव जाव मकान तुम्हारा’चे सुस्वागतम आणि खास संरक्षण. त्यांनी वाटेल तेथे हातभट्ट्या चालवाव्या, परदेशाहून चोरून आणलेल्या स्मगल्ड जिनसांचा व्यापार खुशाल उघड्या फुटपाथवर उभे राहून चालवावा, झोपडपट्ट्यांतून कुंटणखाने, दारूचे पिठे चालवावे, मन मानेल तेथे गुंडगिरी करावी, पाण्याचे हायड्रंट उघडून लाखो गॅलन पाणी बरबाद करावे, हत्तीच्या अंगाएवढ्या नळानाही भोके पाडून पाणी वापरावे, ना आमचे सरकार, ना पोलीस, ना ती म्युनिसिपल कार्पोरेशन, कोण्णी कोण्णी त्या उप-या महात्म्यांच्या या