ऊठ म-हाठ्या ऊठ: Page 3 of 31

आहे, यांचे कोणालाच भान राहिले नव्हते. धर्मातीतपणाचा एवढा गगनभेदी बेण्डबाजा वाजला पण अखेर काय? गांधी नेहरूंच्या छाताडावर टाच देऊन जिनाने पाकिस्तान हिसकावून घेतलेच ना? तथाकथित राष्ट्रनेत्यांच्या स्वाभिमानाचा पाठकणा किती आरपार पिचलेला आहे, याचा बिनचूक आडाखा बांधूनच जिनाने भारताची खाटकी काटछाट केली. जात काय नि धर्म काय, यांचे अभिमान माणसाच्या जन्माबरोबरच जन्माला येत असतात.

`आम्ही जातपात धर्म मानीत नाही,’ असे बरळणारे शिखण्डी हिंदुंतच फार सापडतात. आई, बाप, बायको मेल्यावर, पांढरी कॉलरवाले हे पांढरपेशे दाढीमिशा डोके भादरून, नासिकच्या रामकुंडावर मयतांची राख-हाडे मोक्षाला पोचविण्यासाठी मुकाटतोंडी जाताना कोणी पाहिलेच नाहीत? वाणी करणीचा व्यभिचार करणा-या करंट्यांना इतर जबरदस्तांची पायतणे चाटूनच जगण्याचा बांका वखत आला, तर त्यांची काय म्हणून कोणी कीव करावी? मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, बोहरी इत्यादी हिंद्वेतर जातीत असला कोडगेपणा आढळणार नाही. स्वाभिमानशून्यानाच आपली जात नि धर्म ठणकावून सांगण्याची हिंमत होत नाही. छत्रपती शिवरायांच्या लोकसंग्रहाचे एक गमक आज विचारात घेण्यासारखे आहे. राष्ट्राच्या उत्थानासाठी लोकसंग्रहाच्या क्षेत्रात जाती धर्माच्या भावना वापरू नयेत, म्हणून राष्ट्रकार्यासाठी बाहेर पडताना त्या भावना प्रत्येकाने आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत ठेवून बाहेर पडावे अशी छत्रपतींची सक्त ताकीद असे. पण सबंध महाराष्ट्र जातीधर्मातीत सेक्युलर आहे, असा फतवा त्यांनी काढला नाही किंवा आपण स्वतः तसे आहोत, अशा वल्गनाही केल्या नाहीत. जाती आणि धर्म व्यापणा-या स्वाभिमानाच्या कक्षा किंचितही न दुखावता, छत्रपतींच्या सैन्यात मराठे नि मुसलमान एकजूट एकमूठ महाराष्टाराच्या उत्थानासाठी लढत होतेच ना? पण अल्पायासाने नि जवळ जवळ अचानक हातात आलेल्या राज्यसत्तेच्या घोड्यावरील ऊर्फ टोळकीय मांड कायम टिकविण्यासाठी जी अनेक कारस्थानी सोंगेढोगे धूर्त मतलब्यांना करावी लागतात, ती जनतेच्या पचनी बिनबोभाट पडावी, एवढ्याचसाठी जातीधर्मातीतपणाचा खुळखुळा काँग्रेजियाना वाजवावा लागतो. जात वर्ज्य, धर्म वर्ज्य, मग म. गांधी, जवाहरलाल नेहरू, शास्त्री यांच्या मृत्यूंनंतर त्यांच्या और्ध्वदेहिक संस्कारांसाठी सरणाभोवती भटाब्राह्मणांची गर्दी कशाला आणि ते मंत्रघोष तरी का? काही वर्षापूर्वी नासिक जिल्ह्यातील मालेगावी एका कॉलेजचे, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसादांच्या हस्ते उद्घाटन झाले. रेडिओवर तो कार्यक्रम संपूर्ण ध्वनिप्रसारित केला होता तेव्हा अनेक वेदाभ्यासी ब्राह्मणांकडून वैदिक ऋचांनी समारंभाची नांदी उरकण्यात आली. समजा, राजेंद्रबाबूंच्या ऐवजी जर उपराष्ट्रपती झाकीर हुसेन साहेब उद्घाटनाला आले असते, तर काय तेथील कार्यकर्त्यांनी मंगलचरणासाठी कुराणातील कलमा पढायला मुल्ला मौलवींना पाचारण केले असते? त्यांनी तरी वैदिक ऋचांचे श्रवण आणि मंत्रोच्चारांनी होणारा विधी पाटावर आसनमांडी घालून `म्हणा मम आत्मना श्रुति स्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम्’ म्हटले असते काय? आणि समजा, त्यांनी म्हटले असते तर अनेक राजकारणी ढोंगापैकी ते एक ढोंगच ठरले असते.

मुसलमानाचा ईस्लाम धर्माभिमान केवढा कडवा असतो, याचे दाखले आज गेली १३०० वर्ष सारी दुनिया पाहात, अनुभवित आहे. कडू कारल्याप्रमाणे त्यांना `भाई भाई’च्या तुपात तळा नाही तर गोप्रदानाच्या साखरेत घोळा, ते आपली जातीयता नि धर्मियता पिढीजात गुण म्हणा, अवगुण म्हणा – सोडणारच नाहीत. आजची महाराष्ट्राची अवस्था थेट शिवपूर्व कालासारखीच हल्लाकीची नि बजबजपुरीची आहे. स्व-राज्य (?) आले म्हणतात, तरी सु-राज्याची अस्पष्ट झुळुकही आम्हाला चाटताना अनुभवाला आलेली नाही.शिवपूर्व कालाप्रमाणेत आजही आम्ही दिल्लीच्या सुस्का-यावर जगत मरत आहो. महाराष्ट्र राज्य स्थापन झाले, ते सुद्धा म-हाठ्यांच्या रक्तपातावर आणि बलिदानावरच! इतके सारे होऊनही या राज्याच्या कारभार-यांना कारभाराचे एकएक पाऊल उचलताना दिल्लीवाल्या काँग्रेजी मठपतींच्या लहरीचा आगाऊ सुगावा घ्यावा लागत असतो. सर्व सत्ताधारी काँग्रेजी हुकूमशहांच्या जाती-धर्मातीतपणाच्या आणि `सर्व भारतीय एक’ या अनैसर्गिक थोतांडामुळे महाराष्ट्र राज्य म-हाठ्यांचे असताही आज येथे म-हाठ्यांना सूळ नि उप-यांना गूळ चारण्यात येत असतो. महाराष्ट्र राज्यभर परप्रांतीय उप-यांचा मनस्वी सुळसुळाट झाला, रोज वाढत्या श्रेणीने होतच असतो, तरीही काँग्रेजी सत्ताधा-यांच्या धास्तीने आमच्या म-हाठी राज्य-कारभा-यांना तो लोंढा रोखण्याची छातीच होत नाही. अन्न आसरा नि वस्त्रांच्या पुरवठ्याचा प्रश्नही