वैदिक विवाह विधी: Page 8 of 9

आवश्यकता तर आहेच, पण स्मृती ग्रंथांनीही याला महत्त्व दिले आहे. ‘पत्नीचे नाते ज्या वेळेस वर वधूचा हाताने स्वीकर करतो त्यावेळेस उत्पन्न होते. हे ध्यानात धरले पाहिजे की, विद्वानांच्या मते या मंत्रांची पूर्तता सप्तपदीच्या मंत्रपूर्ततेबरोबरच होते.’ मनु. ‘जलप्रोक्षण करून किंवा कन्यादानाचे शब्द उच्चारून पति-पत्नीचे नाते उत्पन्न होत नाही. तर ते ज्यावेळी वर वधूचा हात आपल्या हातात घेतो व ते एकमेकांबरोबर सातवे पाऊल टाकतात त्याच वेळी होते.’ – यम ही सप्तपदी कशी करावयाची यात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे फरक आहेत. पण फरक असले तरी त्याची आवश्यकता मात्र आहे. (अपवाद व कंसात उल्लेखलाच आहे. कायद्याला कशाची जरूरी आहे हे आता अगदी स्पष्ट झाले. विवाहात रूढीनुसार पुष्कळ भारूड गौण गोष्टींचा गोंधळ झालेला असतो. विशिष्ट जातीत विशिष्ट चालीरिती प्रत्यही आचरताना आढळण्यात येतात. पण असल्या गौण गोष्टी राहिल्या म्हणून त्याने विवाहाला कोणत्याही प्रकारचा बाध येत नाही. एवढेच काय पण एखादा विधी चुकून राहिला तरी सुद्धा विवाह बेकायदेशीर होत नाही. न्याय-कोर्टाने विवाहाच्या गांभिर्याची चाड असते. संतती झालेली असल्यास कोर्ट या बाबतीत जास्तच काळजीपूर्वक वर्तन करते.

वाटेल त्या क्षुल्लक गोष्टींकरिता विवाह बेकायदेशीर ठरू लागले तर अनवस्था प्रसंगच प्राप्त व्हावयाचा. ‘quod non debuit factum valet’ (What should not be done, yet being done shall be valid) हे कायद्याचे सूत्र हिंदू विवाहाच्या बाबतीत लागू पडते. जिमूत वाहनाने ‘दायभाग’मध्ये हे तत्व प्रतिपादले आहे. त्याचप्रमाणे विज्ञानेश्वरानेही ‘मिताक्षरा’ मध्ये याला मान्यता दिलेली आहे. भिन्न जातीत किंवा सपिंड वगैरे निषिद्ध नात्यात विवाह झालेला असला तरच तो कोर्ट बेकायदेशीर ठरविल. कोर्ट या बाबतीत कोणत्या प्रकारची दृष्टी ठेवते याबद्दल डॉ. गौर म्हणतात – But before it can be avoided the court must be satisfied of violation of some substantial right and material prejudice, otherwise it will condone mere irregularities, omissions and errors of procedure which could not be permitted to affect such solemn obligations as those of marriage : quod fiery non debuit factum valet.” Hindu code – Dr. H. S. Gour एवढेच काय पण कायदा याहीपुढे जातो. गृह, कुटुंब असल्या पवित्र संस्थांच्या स्थैर्यावर समाजाची घटना अवलंबून असते. आणि समाजघटनेच्या रक्षणासाठीच कायद्याचा अवतार असतो. म्हणून फक्त बरेच वर्षे पति-पत्नीच्या नात्याने दोघांची नांदणुक झाली होती, सर्व व्यवहार याच तऱ्हेने उघडपणे केलेले होते, यावरून ती बाई त्याची पत्नीच असली पाहिजे, निदान तिला ते अधिकार प्राप्त झाले होते व त्याचा फायदा तिला अवश्यमेव मिळाला पाहिजे, असा निकाल या बाबतीत झालेला आहे. दलिपकुंवर व फत्ती (बाई लालकुंवर) या प्रसिद्ध केसमध्ये प्रिव्ही कौन्सिलने वरीलप्रमाणे निकाल देऊन तिच्या मानीव नवऱ्याच्या इस्टेटीवरील तिचा हक्क मान्य केला आहे. (Dalip kuar v. Fatti 1913 – P. R. 99; 18 I. C. 930) अशाच एका दुसऱ्या केसमध्ये (शास्त्री x सांबकट्टी) प्रिव्ही कौन्सिलचा निकाल सांगताना सर बोनेस पिकॉक यांनी याचे पूर्ण विवेचन केले आहे. “Law presumes and presumes strongly in favour of marriage from the fact of continuous cohabitation conduct and repute…… The evidence for the purpose of repelling it must be strong, distinct, satisfactory and conclusive.” पण या गोष्टींशी आपल्याला विशेष कर्तव्य नाही. मला सांगावयाचे एवढेच की, कायद्याची दृष्टी इतकी गंभीर व व्यापक आहे की, गौण परंपरागत गोष्टींनी विवाहाच्या कायदेशीरपणाला प्रत्यवाय येणे मुळीच शक्य नाही. श्री. चौबळांनी याचा जो एवढा मोठा बाऊ केला आहे त्याच्या मुळाशी प्रबोधनने म्हटले प्रमाणे रिकाम्या न्हाव्याची उपद्व्यापी वृत्ती किंवा मनाची गुलामगिरी या व्यतिरिक्त काही असू शकेलसे वाटत नाही. तेव्हा असल्या बुजगावण्याने कोणी बुजून जाण्याचे