वैदिक विवाह विधी: Page 7 of 9

regarded by the caste as essential then it must be performed. Explanation 1. The ceremony of Saptapadi is necessary to complete a marriage performed according to the orthodox rites and that of विवाह होम is also usually performed but their non-performance dose not invalidate a marriage if otherwise complete. 2. A marriage celebrated with due ceremony is not invalid by reason of the fact that a party thereto was then an outcaste. Hindu code – Dr. H. S. Gour सर शंकरन् नायर यांनी एका केसमध्ये याच तऱ्हेची विचारसरणी अंगिकारली आहे. Hindu lawyers prescribed various ceremonies to constitute a valid marriage. But those ceremonies in their entirety are seldom, if ever, performed. According to them the विवाह होम and सप्तपदी are essential. But it is notorious that marriages are performed in many castes without them and it is now settled that if by caste usage any other form is considered as constituting a marriage then the adoption of that form – with the intention of thereby completing the marriage union-is sufficient. Muthuswami V. Masilamni 33 M. 342. तेव्हा एक गोष्ट उघड झाली की, लग्न कायदेशीर होण्यास त्या त्या प्रांतातल्या चालीरितीने आवश्यक व सोईस्कर असतील तेवढे विधी केले म्हणजे बस्स आहे.

शास्त्रातील विधी अजिबात बाजूला सरले आहेत व ठराविक असा एकच विधी नाही. सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे विवाह कायदेशीर होण्यास पुढील गोष्टींची आवश्यकता आहे. –

1)वधू व वर एकाच जातीचे पाहिजेत. भिन्न पोटजातीचे असले तर चालतील. चुकून जरी असे (पोटजातीचे) लग्न लागले तरी ते मोडणार नाही.

2)वधू आणि वर हे शास्त्रांनी निषिद्ध मानलेल्या नात्यातील असता उपयोगी नाहीत. म्हणजे ते सपिंड किंवा सगोत्र असता कामा नये. स्मृतीग्रंथांनी आणखीही पुष्कळ नात्याचे निर्बंध घातलेले आहेत. पण रूढीने ती बंधने आता बरीच सैल केली आहेत. शास्त्रस्मृतींच्या व्याख्यांप्रमाणे आणि निर्बंधांनुसार जवळ जवळ २१०० नाती निर्बंधांत काढली आहेत. युरोपियन समाजात अशी ३० सापडतील. या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवावयास पाहिजे. लग्नाच्या बाबतीत ही निषिद्ध नाती चालीरीतीनी ठरविली जातात. खुद्द स्मृतिकारांचा एकमेकांशी मुळीच मेळ नाही. तेव्हा स्थानानुसार या जातींच्या रूढी प्रमाणे निरनिराळ्या ठिकाणी नाती अयोग्य समजली जातात. “The question of a proper or an improper marriage is therefore always one of usage, to be determined according to the people’s achar (आचार).” (Mandalik’s Hindu Law, 414)

3)फसवणुकीने किंवा जबरदस्तीने विवाह होता कामा नये. अर्थातच तक्रार करणाराला या बाबतीचा फायदा देताना न्याय-कोर्टाला फार जपून वागावे लागते.

4)कायद्याप्रमाणे आवश्यक अशा विधीचे पालन झाले पाहिजे. कायद्याप्रमाणे आज दोन विधींचे परिपालन जरूर आहे. श्री. चौबळांनी म्हटल्याप्रमाणे चार-पाच विधींची मुळीच जरूरी नाही. हे दोन विधी म्हणजे (१) विवाह-होम आणि (२) सप्तपदी हे होत. There are two ceremonies essential to the validity of a marriage, whether the marriage be in the Brahm form or the Asura form namely – (i)Invocation before the sacred the and (ii)Saptapadi. The marriage becomes completed when the seventh step is taken, till then it is imperfect and revocable. (Justice Mulla) (एक गोष्ट येथे लक्षात घेतली पाहिजे. एखाद्या जातीत उपरोक्त विधी व्यतिरिक्त काही विशिष्ट विधींनी विवाह मान्य होत असला तर तेथे या दोन विधींचे परिपालन झाले नाही तरी चालते – कालीचरण x दखी ५ क. ६९२, रामपियार x देवराम (१९२३) १ रंगून) या दोन विधीतून सप्तपदीचा विधीच काय तो जास्त महत्त्वाचा आहे. कायद्याच्या दृष्टीने याची