वैदिक विवाह विधी: Page 6 of 9

नीट विचार करा. नाही तर तरुणपणाच्या धडाडीत तुम्हाला वाटेल की आम्ही मोठी सुधारणा केली. पण एखादे वेळेस प्रसंग याववायाचा व मग न्यायाच्या दरबारात तुमचा विवाह बेकायदेशीर ठरेल, तुमच्या पत्नीचे पोराबाळांचे व इस्टेटीचे ते धिंडवडे कोण वर्णन करणार ? तेव्हा संभाळा एकादा ठाकरे, राजे किंवा वैद्य तुमचे मन वळविण्यास आलाच तर त्याला थोडा थोपवून धरा आणि एकदम वकीलाकडे धाव मारा, त्याचा नीट सल्ला घ्या आणि मग ही अंधारात उडी घ्या, असे चौबळांचे आक्रोशपूर्वक म्हणणे आहे. मला श्री. चौबळांनाच असे सांगावयाचे आहे की, ही पाने खरडण्यापूर्वी तुम्हीच एखाद्या वकीलाचा सल्ला घेतला असता तर तुमचे हे श्रम खास वाचले असते. न्याय कोर्टाला विवाहाचे गांभीर्य तुमच्यापेक्षा नीट समजते.

एखादी गौण गोष्ट नसली की ठरव तो विवाह बेकायदेशीर इतके ते चवचाल नाही. लांबलचक व अवघड विधीनेच गांभीर्य येते असली खुळचट कल्पना त्याची नसते. हा अजब तर्कशोध श्री. चौबळ रजिस्टरांचाच दिसतो. विवावविधी सोपा असला म्हणजे नीतीमत्तेला म्हणे शिथीलता येते. काय पण तत्व आहे ! मारे दोन दिवस सारखा विवाहविधी चालवला, वधू-वरांना सर्कशीतील अवघड फीट्स करण्यास लावल्या, उपाशी तापाशी उभे ठेवावे, मग काय बिशाद त्यांची वैवाहिक नीती बिघडायची ! अगदी जन्मभर नातिचरामिचे पालन ! तुमचा विधी चार तास काय पण चार दिवस चालू राहिला, (न समजणारे मंत्र म्हणावयाचे मग नुसते दुसरेही काही ध्वनी खुशाल काढावे. मुहूर्ताची वेळ होईपर्यंत मंगलाष्टकांत वाटेल ते श्लोक दडपतातच का नाही ? गीतगोविंदातील राधाकृष्णाच्या चवचाल प्रेमाचा श्लोक मंगलाकष्टकात मी ऐकिला आहे.) म्हणजे एखाद्या पाजी माणसाचे पाय वेश्यांचे जिने चढावयास मोडतात होय ? हे तर्कशास्त्र कुठल्या कोटीतले ? आता आपण विवाह कायदेशीर होण्यास लागते तरी काय हे एकदा पाहू. हे नीट पाहिले की, या प्रश्नाचा निकाल लागलाय. लग्नविधिसंबंधाने विचार करताना एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे. जुने पुराणे शास्त्रविहित विधी आता जवळजवळ नष्ट झाले आहेत. कन्या पसंत करण्यापासून ते गृहप्रवेशापर्यंत किती तरी विधींचा समावेश त्यात होतो. कै. श्री. मंडलीक यांनी आपल्या Hindu Law मध्ये असले शास्त्रशुद्ध (?) विधी २७ प्रकारचे सांगितले आहेत. त्यापुढेच त्यांनी सांगून टाकले आहे की, हे आता कोणी पाळतही नाहीत व त्याची जरूरीही नाही. जरूरी संबंधाचा पुढेच उल्लेख आला आहे – ‘There are places where hardly a qualified Brahmin priest is obtainable, and parties have to improvise a ceremonial for themselves.’ (Mandlik Hindu Law-402) स्मृतीने सांगितलेला विवाह-होमही कित्येक ठिकाणी केला जात नाही.

निरनिराळ्या सर्व विधीतून सप्तपदीचा विधीच काय तो जरूरीचा मानला जातो. पण तो सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रीतीने आचारला जातो. त्यातसुद्धा सर्व ठिकाणी एकवाक्यता नाही. देशात लग्नविधीसंबंधाने एकंदर इतकी विविधता दृष्टीस पडते की, एका नियमाच्या सूत्राने त्यांना बांधू पहाणे हे अगदी हास्यास्पदच काय पण मुर्खपणाचेही होईल. आज जरी सर्वांकरिता ब्राहा वव असुर हे दोनच विवाहप्रकार चालू व कायद्याला मान्य आहेत, तरी कोठे कोठे गांधर्व पद्धतीही प्रचारात असलेली दृष्टीस पडते. वराच्या कट्यारीशी होणारे लग्न, कोठल्याही धार्मिक संस्काराशिवाय मृत पतीच्या भावाशी वा आप्ताशी होणारा पंजाबातील ‘करेवा’, जाठातील ‘कराव धुरीचा’, शिखांतील ‘आनंद’ किंवा ज्यांना खरोखरी स्त्री-पुरुषसंयोग हेच नाव योग्य आहे, पण त्या त्या समाजात अगदी उघड्या डोळ्याने कायदेशीर मानले जातात असे पंजाबातील ‘चामर अंदाझी’ किंवा मलबारातील ‘सर्वधम्’ हे सर्व प्रकार पाहिले म्हणजे वरील म्हणण्याची सत्यता ताबडतोब निदर्शनास येईल. सांगण्याचा मुद्दा एवढाच की, सर्व ठिकाणी लागू पडेल व कायद्याचे दृष्टीने ज्याची आवश्यकता आहे असा एकच विधी हिंदू विवाहाकरिता उरलेला नाही. No prescribed ceremony is necessary to constitute marriage, provided that if any ceremony is customary and