वैदिक विवाह विधी: Page 2 of 9

सामाजिक ‘गोषा’ घुसलेला असल्यास नवल नाही.

धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्यार्थ अग्रेसरत्वाने पुढे येत असलेल्या मराठेसमाजाला अजूनसुद्धा ‘पडद्या’ पुढे बिनशर्त हार खावी लागत असते. सारांश, हिंदुजनांच्या या अत्यंत महत्त्वाच्या, अत्यंत उत्क्रान्तीकारक व अत्यंत पवित्र अशा धर्ममान्य विधीच्या आचरणात कालमानानुसार धार्मिक व सामाजिक गोष्टींचा भयंकर संकर झालेला आहे. गेली कित्येक शतके लोकव्यवहाराच्या तंत्राने धर्माला धावपळ करण्याचा प्रसंग आल्यामुळे शेकडो सामाजिक रूढी धर्माचाच मुखवटा घालून आज आमच्या बोकांडी बसल्या आहेत. याचा परिणाम साहजिकच असा झाला आहे की विवाहविधीचे धार्मिक व नैतिक तेज प्रस्फुरित करणा-या आचारविधीला गचांडी मिळून त्याच्या ठिकाणी सामाजिक भलभलत्या रूढींची खेकटी आज ‘धर्म धर्म’ म्हमून आम्ही खुशाल डोक्यावर घेऊन नाचवीत आहोत. सत्यशोधकांच्या ‘घरचा पुरोहित’ पाहिला तरी त्याला सुद्धा या रूढीपुढे हात टेकावे लागलेले हते. समाजपुरुषाच्या आगी झोंबलेल्या रूढीच्या खविसाचा नायनाट करणा-या मांत्रिकाच्या शोधार्थ असताना खुद्द खवीसच मांत्रिकाचे सोंग घेऊन दत्त म्हणून उभा राहिला की कसली सुधारणा आण कसले काय? भीक नको पण कुत्रा आवर, असला अनवस्था प्रसंगच तो! सुधारणा पाहिजे म्हणून सुधारणा करण्यास हात घालणे केव्हाही श्रेयस्कर होत नाही. सुधारणेच सर्व अंगे, दोषांची उत्पत्ती स्थिति व व्याप यांचा उत्कृष्ट अभ्यास प्रथम झाला पाहिजे. अभ्यासाला निरीक्षण-कौशल्याची व निश्चित निर्णयशक्तीची जोड पाहिजे. इतक्या भांडवलावर सुद्धा गाडे निभणार नाही. सत्याचे प्रेम, असत्याची चीड आणि संशोधनार्थ अवश्य लागणारी मनाची न्याय निष्ठुरता यांच्याशिवाय सुधारणेचे पाऊल पुढे पडत नसते. अमुक एक प्रघात आज इतक्या वर्षे बिनतक्रार चालू आहे,ए वढ्याच सबबीवर त्याच्या अधार्मिक स्वरूपाकडे दुर्लक्ष करणे, त्याला ढका लावण्याचे टाळणे, त्याच्यावर सुधारणेच्या सफेदीचा एखादा पट्टा ओढून त्याचे मूळ स्वरूप जाणूनबुजून किंचित् दृष्टीआड करणे म्हणजे संशोधकाची आत्मवंचना होय. असल्या आत्मवंचकांनी संशोधनाची व सुधारणेची शेखी मिरवण्याचे निंद्य कर्म करण्यापेक्षा झुकत्या दुनियेकडे पहात आढ्याला तंगड्या लावून स्वस्थ बसण्याची मेहेरबानी जगावर करावी. अमुक गोष्ट किंवा विधि हा शुद्ध सामाजिक आहे, रूढीप्रणित आहे, विशिष्ट परिस्थितीजन्य आहे, याचा धर्माशी काही एक संबंध नाही, इतके पटल्यावर त्याचा धर्मकार्यातला संकर तसाच पुढे चालविणे हे दुबळ्या व गुलाम मनाचे चिन्ह होय.

मानसिक दास्यातून मुक्त होणारांनी व इतरांस मुक्त करणारांनी प्रथम स्वयंस्फूर्त स्वतंत्र बनले पाहिजे. हिंदुजनांच्या जीवनक्रमात प्रामुख्याने तीन विधींचा अंतर्भाव होतो. उपनयन, विवाह आणि अंत्येष्ठी. या व्यतिरिक्त इतर विधि गौण न केले तरी चालणारे आहेत. सोळा संस्कारांच्या अधिकाराबद्दल दंडादंडी व केशाकेशी करणारे कागदी वीर रगड असले, तरी प्रत्यक्ष १६ संस्कारांच्या कवायतीतून बिनचूक बाहेर पडलेला षोडश-संस्कारी पठ्ठ्या खुद्द ब्राह्मण्याचे संरक्षण करण्यास धाधावलेल्या ब्राह्मणब्रुवात एक तरी आढळेल की नाही, याची शंकाच आहे. मात्र उपयनय, विवाह व त्येष्ठी हे तीन विधि हिंदुजनात – काही फेरफाराने - खास होत असतात. आद्य हिंदु मिशनरी गजाननराव वैद्य यांनी हिंदु मिशनरी सोसायटी स्थापन करण्यापूर्वी जवळजवळ २४ वर्षे हिंदू धर्माच्या संशोधनार्थ भक्तिपूर्वक स्वाध्याय केल्याचे सर्वत्र मशहूरच आहे. त्यांच्या पूर्वी धर्म-विधि-संशोधनाचे अद्भुत कार्य श्रीमद्दयानंद सरस्वति या महात्म्याने केलेच होते धर्मकर्मात अनवश्यक सामाजिक चालीरीतींचा रूढीमुळे जो संकर झाला आहे. त्या संकराच्या कचाट्यातून वेदांच्या आधाराने उपनयन व विवाहविधीचे शुद्ध धार्मिक स्वरूप निराळे काढण्याचे धैर्य कै. वैद्य यांनी सतत आपल्यापुढे ठेवून १२ वर्षांच्या अव्याहत प्रयत्नाने सर्व हिंदूजनांच्या वैवाहिक संस्काराची ‘वैदिक विवाह पद्धती’ व उपनयन विधि अखेर निश्चित केले. या पुण्यकार्यात त्यांना स्वाध्यायाच्या जोडीनेच, लोकमान्यासारख्या लोकोत्तर विद्वानांचे प्रेमळ सहाय लाभले, ही गोष्ट सर्वांनी वश्य लक्षात घेतली, म्हणजे हे विधि यच्चावत् हिंदूमात्रास स्वीकारणीय असेच संशोधित झालेले आहेत, हे निराळे सांगण्याची आवश्यकता उरणार नाही. खरे पाहिले तर कै. वैद्यांनी या विधीत आपल्या पदरचे एक अक्षरसुद्धा घातलेले नाही. विवाह व उपनयन विधीत जो अनेक रूढीजन्य