संगीत विधिनिषेध: Page 10 of 34

टाकावा. बावळे, परशा एरवी कसाही असला, तरी माझ्याशी तो लक्स साबणासारखा स्वस्त न् स्वच्छ वागतो. किती जलदी तो शान्तीला घेऊन आला ! याला म्हणतात क्विक् डिस्पॅच्. मिलिटरी डिसिपलीन्. जा म्हणजे गो, अन् ये म्हणजे कम्. परश्या परश्या, तुला हजार खून माफ आहेत ! बावळे- वकीलाचा एवढा आशीर्वाद असल्यावर हवा तो गावगुण्ड शोफर बनेल. कावळे- बावळे तु्म्ही बावळे आहात. मोटारखाली खून पाडून ते जिरवायला सुद्धा स्पेशल अक्कल लागते- ही पहा, जिन्यावर पावलं वाजली. शान्ती आली.—बावळे, बी ऑफ—बी ऑफ. [बावळे जातो] आ S हा S! शान्ते शान्ते—तुला कॉर्जल वेलकम् द्यायला, तुझा दासानुदास हा कावळे आपले दोन्ही हात होकायन्त्रासारखे ताणून उभा आहे. [डोळे मिटून अवसानात उभा राहतो, तोच सनातने त्याच्यापुढे येऊन उभा राहते.] सनातने- गुड मॉर्निंग्. कावळे- गुड मॉर्निंग- गोड गोड मॉर्निंग शान्- [डोळे उघडून] आँ ! सनातने- आँ ? व्हाय धिस् आँ ? कावळे- (स्वगत) मोतन खातर डुब्बी मारी तो शंख लगे हात ! (उघड) कोण ? मिस्टर सनातने ? बरे वेळेवर आलात. पण मला आता वेळ नाही. सनातने- मलाहि आता वेळ नाहि. म्हटलं उभ्या उभ्या भेटून जावं. कावळे- उभ्यानं नको न् ओणव्यानं नको—ही घ्या, सही होऊन आली तुमची पोटगी नोटीशीची रिसीट. सनातने- डॅम दॅट नोटीस अँड रिसीट मला या कायदेबाजीचा अगदी वीट आला. कायद्याच्या जोरावर पतिपत्नीची फाटलेली अन्त:करणं जुळवायचा खटाटोप यूसलेस आहे. माझा यावर मुळीच विश्वास नाही ! कावळे- इझिट ? नव्या अकलेची ही नवी लाट दिसते. कायदेबाजीवर विश्वास असो वा नसो, कोणतंहि प्रकरण चिघळत चिघळत निकरावर आलं, म्हणजे निर्वाणीला त्यावर कायदेबाजीचं पालस्तर मारावंच लागते. मग त्यावेळी हातून निसटलेल्या मोकाट बायकोची गोष्ट कशाला ? जन्मदात्या आईबापाला सुद्धा पोलीस-चावडी दाखवायचा कुणी विधिनिषेध बाळगीत नाही. क्रान्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केला— सनातने- काय, आत्महत्येचा प्रयत्न ? कावळे- यस यस. डिलिबरेट सुईसाईड ! आय. पी. सी. सेक्शन त्री हण्ड्रेड नाइन. सनातने- नॉनसेन्स ! काय वकील झालात म्हणून हवं ते बरळता ? कालच तिच्या एमेचा रिझल्ट लागून, ती फर्स्टक्लास फर्स्ट आली न् तिला पाच हजाराचं वाडिया प्राईज सुद्धा मिळालं. ती कशाला आत्महत्या करील ? कावळे- असं असं ! म्हणून का या नवरोबाला आपल्या पळपुट्या बायकोचा इतका जिव्हाळा फुटला ?—अहो राव, मग असे बाहेर बाहेरून कशाला खडे मारता ? जा-जा तडक दवाखान्यात, न् धरा त्या मावलीचे पाय. न् म्हणावं, जगदम्बे-मातोश्री, त्राहिमाम् त्राहिमाम् त्राहिमाम्. सनातने- असं करायला काही हरकत नाही. ती माझी बायको आहे न् मी तिचा नवरा आहे. कावळे- ब्रेव्हो नवरीचा नवरा ! अंगाला हळद लागली म्हणून ? का सप्तपदीची तंगडझाड केलीत म्हणून ? मंगलाष्टकांची नान्दी, पाणी ग्रहणाचा विष्कंभक, आणि मंगलसूत्राची दावेबांधणी, असल्या नाटकी खटपटीनं जर स्त्री-पुरूषांची अन्तकरणं बिनतोड एकजीव जुळती, तर सनातने, तुम्ही क्रान्तीला जन्माचे मुकलेच नसता. सनातेन- म्हणजे ? विवाहविधी हे काय नुसतं नाटक ? कावळे- मानली तर अटक, नाहीतर नाटक, लोक मानतात तोवर ठीक आहे. पण एकदा का त्यांनी त्याचा विधिनिषेध बाळगला नाही, की मग पुढे काय ? विवाहनिधीच्या नुसत्या नाटकाने जर पतिपत्नीच्या जोड्या अभंग जुळत्या, तर समाजात कष्टी कुटुंबांचा उकीरडा इतका फैलावलाच नसता ! सनातने- वाहवा ! ही छान सोय ! विवाहाचाच विधिनिषेध राहिला नाही, तर सगळीकडं संकराची संक्रान्तच उसळायची, संकरी नरकायैव ! कावळे- संकराचा उघड नरक परवडला, पण खोट्या समाजशुद्धीच्या बुरख्याखालचा विषम् विवाहाचा शेणसडा आता कुणालाच परवडत नाहीसा झाला आहे. सनातने- हव्या त्या गोष्टीचा विधिनिषेध होऊ लागला, तर कोण शहाणा स्वस्थ बसेल ? कावळे- शहाण्याना स्वस्थ बसून कसं चालेल ? सनातने- हा सनातन्या तरी हातपाय