संगीत विधिनिषेध: Page 9 of 34

सेण्ट्रल पोलीस स्टेशनात शान्त बसली आहे. बापाकडं जाईन, तर त्याचं फिरलंय डोकं. क्रान्ती अत्यवस्थ. भ्रान्ती— कावळे- तिचं नाव काढू नकोस माझ्यासमोर. भैरव- चुकलो, आता तिला कोण मदत करणार ? म्हणून आलो धावत तुमच्याकडं. शान्तीसाठी हा आडला नारायण-गाढवाचे, नव्हें तुमचे पाय धरीत आहे. कावळे- डोण्ट बी अफ्रेड भैरव. मी आता तिची सुटका करतो, न् सारी भानगड त्या म्हातारीच्या मुर्द्याबरोबरच गाडतो. (टेलीफोन घेऊन) हल्लो- सेण्ट्रल ! मिस्टर ब्रेन- कावळे स्पिंकींग—यस् दॅट मोटार-सायकल अॅक्सिडंण्ट. शान्ती माझी नातेवाईक क्लोज रिलेटिव- बूझम फ्रेण्ड-यस-यस-(टेलीफोन ठेवून) भैरव जा. माझी कार घेऊन जा न् शान्तीला इकडं पाठवून दे.—बावळे, परशाला म्हणावं, गाडी बाहेर काढ. जा लवकर. बावळे- (स्वगत) भ्रान्तीची व्हेकन्सी शान्तीनं भरून काढण्याचा ठाव दिसतो. [जातो] कावळे- भैरव शान्तीला सांग, म्हणावं तुमच्या सगळ्यांच्या मनात माझ्याबद्दल कसलेही गैरसमज असले, तरी या कावळ्याचं मन बगळ्यासारखं पांढरे फेक आहे. अशी तिची खातरी पटव. तिला गाडीतून एकटीच इकडं पाठवून दे. भैरव- मीच तिला बरोबर घेऊन येतो. कावळे- छे छे छे छे. या नसत्या फन्दात तू पडू नकोस. आरोपीबरोबर उघड फिरायला, तू वकील का आहेस ! तुला तिच्याबरोबर आता कुणी पाहील, तर या खुनाच्या प्रकरणात तू विनाकारण अडकशील. भैरव, हा खून आहे खून, कल्पेबल् होमिसाइडसुद्धा नाही. तिला दे गाडीत बसवून न् तू जा आपल्या कामाला बिनधास्त. शान्तीची व्यवस्था मी लावतो. (बावळे प्रवेश करतो.) बावळे, तुम्ही कशाला मरायला पर आलात ? यूसलेस ! बावळे- परश्याने गाडी बाहेर काढली, हे सांगायला आलो साहेब. कावळे- व्हेरि गुड. असे शहाण्यासारखे वागलात तर कोण तुम्हाला गाढव म्हणेल ? भैरव, नौ बकप्. शान्तीला लवकर पाठवून दे. भैरव- एकटीच ना ? कावळे- अगदी एन्टायर्ली एकटी पाठवून दे. भैरव- थँक्यू ! [जातो] कावळे- बावळे, परशाला म्हणावं, अशिलाला घेऊन डिरेक्ट इकडंच ये. नाहीतर भलतीच समजून, जायचा लेक तिला घेऊन सा-या शहराची रस्ते-पहाणी करायला. जा, त्याला क्लियर वॉर्निंग द्या. बावळे- वॉर्निंग देणं माझं काम, पण ऐकण्याचं काम त्याचं ना ? सा-या वाचाळपुरीचा लीडींग ड्रायव्हर, म्हणून या परशाला केवढी घमेण्ड ! त्यात आपण त्याला अगदी डोक्यावर चढवून ठेवलाय. कावळे- बावळे, तुम्ही बावळे आहात. अहो, साप मुंगसाचा खेळ करणा-या गारोड्याला असले हण्डीबाग हमखास संगही ठेवावे लागतात, अन् यालाच लोकसंग्रह असं म्हणतात. बावळे- लोकसंग्रह करा. नाहीतर हण्डिबाग- संग्रह करा. पण देवाआधी माशीच नैवेद्याला चाखते, त्याची वाट काय ? कावळे- नैवेद्याची माशी ? बावळे, सांगता काय ? नैवेद्याची माशी, [बाहेर मोटारीचा हॉर्न वाजतो.] माशी स्टार्ट झाली. बावळे, माशी उडाली. स्टॉप हिम-परशा-परश्या स्टॉप हिम.SSS डॅमिट. व्हॉट टूडु. कसं करावं आता ! बावळे, तुम्ही तरी भैरवाबरोबर गेला असतात--- बावळे- त्या तसल्या नैवेद्याच्या ताटावर माझ्यासारखा जाळीचा रूमाल काय कामाचा ? माशी बसायची ती बसणारच. कावळे- माझी खात्री आहे, खादीच्या जाड रूमालासारखा तुमचा उपयोग झाला असता. बावळे- परश्या- वा-यानं हा रूमाल वाटेत तेव्हाच उडवला असता. कावळे- ते काही नाही. टॅक्सी करून तुम्ही जा त्याच्या पाठोपाठ, न् तुम्ही स्वत: शान्तीला बरोबर घेऊन या आपल्या गाडीतून. बावळे- माझ्या बरोबर कशाला ? त्या वावडीला माझ्यासारखा कच्च्या सुताचा धागा कितीसा आवरणार ? कावळे- त्या परश्या शोफरचा मांजा तरी काय कामाचा ? रास्कल माझाच थ्रेड तोडून टाकायचा ! बावळे- कावळ्यांना तोडून परश्याचं कसं भागणार ? सध्या, सहकार चळवळीचे दिवस आहेत. भागीचा डिविडण्ड प्रत्येकाला प्रमाणात मिळालाच पाहिजे. नाहीतर ही वाचाळपुरी तेव्हाच बजबजपुरी व्हायची. चाललंच आहे ! घार उडते आकाशी अन् गुळापाशी चिकटे माशी ( बाहेर हॉर्न वाजतो.) कावळे- इतक्यात आली ? शाबास परशा शाबास ! माझ्या मोटारीवरून तुझा जीव ओवाळून