संगीत विधिनिषेध: Page 8 of 34

हा कावळे जिवन्त असेपर्यंत नाटक बन्द ? पात्रांशिवाय नाटके, सूत्राशिवाय ठोकळे, आणि तक्रारीशिवाय फिर्यादी रंगवणारा मी रंगारी. झालं काय इतकं होपलेस व्हायला ? कसला अॅक्सिडेण्ट ? भैरव- पेपर वाचा, पेपर वाचा. कावळे- अरे मला मरायला नाही फुरसद. ऐंगेजमेण्टांची पठाणी परवड सारखी हात धुवून लागली आहे माझ्या मागं. दोन दोन दिवस पत्रांकडं नुसता डोळा मारायला होत नाही. बावळे- पात्रांच्या परवडीनं पत्रांकडे पाहायला वेळच मिळत नाही साहेबाना. भैरव- पात्रांच्या टेहळणीपेक्षा पत्रांची न्याहाळणी अधिक ठेवा आता. कावळे- भैरव, तू आहेसना आमचा चालता बोलता लोकल टाइम्स ? मग कोण लेक ही सगळ्या पत्रांची कचरपेटी उपसायची यातायात करतो ? सांग सांग कसला झाला अॅक्सिडेण्ट तो. भैरव- एकचसा काय ? पाठोपाठ वन, टू, थ्री. काल रावसाहेब पुराण्यानी शांतीच्या कपाळी कुंकू पाहिलं न् काडकन् त्यांचं डोकंच फिरलं “ कुंकू लाव, पाट लाव ” अशा आरोळ्या मारीत, चिंध्या फाडीत ते गावभर धुमाळूळ घालीत आहेत. कावळे- शांतीच्या कुंकवानं पुराण्याचं डोकं फिरलं ? बावळे- पोटच्या गोळ्याची तिडीक डोक्यालाच विशेष भोवते. कावळे- पण पुराण्यांना डोकं असतं किंवा होतं, याची आजवर खरोखरच कुणाला कल्पना नसेल. बरं, दुसरा कोणता अपघात ? भैरव- काल काही कॉलेज तरूणी नदीत बोटींग करतांना, --खळखळाट्यांची ती सौभाग्यवति –विधवा मुलगी – कावळे- कोण ? क्रान्ती ? भैरव- तिची होडी उलटली अन् क्रान्ती बुडून वहाणीला लागली. कावळे- टेरीबल् टेरीबल्. पण आजूबाजूला कुणी लोक होते का नव्हते ? भैरव- रेल्वेचे शंण्टींग, दारूपिठ्यांचे पिकेटींग, न् बायकांचे बोटींग बघायला तमासगिरांची उणीव कशाला पडेल ! नदीचा काठ कॉलेजतरूणांच्या वॅनिटी फेअरने भरगच्च उफालला होता. पण “ धावा धावा- बुडाली बुडाली ” या ओरड्याशिवाय कोणी काही केले नाही. अखेर तो नवीन बॅरिस्टर विवेकराव आला आहेना ? तो गर्दीतून रेटारेटी करीत धावाला, न् त्याने सुटाबुटा सकट धडाड उडी घेऊन, क्रान्तीला पाण्याबाहेर काढली, न् बेशुद्ध स्थितीत आपल्या साईड-कारमध्ये घालून— कावळे- स्वत:च्या चेंबरमध्ये नेली की काय ? भैरव- डॉक्टर प्रवाळाच्या हॉस्पिटलात नेवून पोचविली. बावळे- विवेकाला कावळ्यांचं डोकं थोडसं असणार. तेथे पाहिजे जातीचे ! कावळे- सन्यातन्याला हे कळले की नाही ? भैरव- कुणी सांगावं ! पुराण्यांच्या जोडीने चिंध्या फाडीत, धोण्डे मारीत भटकतांना, सनातने अझून कुणाला दिसले नाहीत. कावळे- हे एक पात्र तरी नाटकात अझून शिल्लक आहे म्हणायचं ! बावळे- सनातन्याशिवाय वाचाळपुरीत एकही नाटक रंगायचं नाही. भैरव- रंगायचं नाही ? अन् रंगलेलं भंगायचं नाही. पण बेट्याच्या पाठकण्याचाच पत्ता नाही. कावळे- पाठकणा असो वा नसो. पण त्याचं डोकं फिरल्याशिवाय किंवा कुणी फिरवल्याशिवाय कोणतंच नाटक रंगणार नाही. बावळे- पण सनातन्याना डोकं असल्याशिवाय ते फिरणार कसं, न् कोण शहाणा फिरवणार तरी कसं ? भैरव- तोच तर वान्धा आहे ना. सनातन्याला डोकं असतं, तर क्रान्तीसारखी बायको गमाऊन तो कशाला बसता. कावळे- आणि हातातून निसटलेली बायको, गावभर मोकाट भटकतांना उघड्या डोळ्यांनी कशाला पहाता ! बावळे- आधी जातं डोकं न् मग जाते बायको. भैरव- बायको टिकवायला डोकं लागतं. क्रान्तीला प्रसन्न करून घेता येत नाही, त्या सनातन्याच्या नशिबी पोरं किंवा ढोरं वळण्यापलीकडे कसलं भाग्य असणार ? कावळे- डॅम हिज भाग्य. तिसरा आणखी अॅक्सिडेन्ट कोणता ? भैरव- इजा बिजा तिजा केला शान्तीनं. क्रान्ती हॉस्पिटलात गेल्यावर, एका मित्राची मोटार सायकल घेउन शान्ती लेडीज क्लबावर जात असता, दिली एका म्हाता-या वडारणीला धडक न् धाडली तिला यमाकडं तडक. कावळे- ओ ! धिसीज डेंडरस. शहाण्या, मग इतका वेळ हे का नाहीं आधी सांगितलंस. भैरव- शेवटची गोष्ट शेवटी सांगितली. आधी कशी सांगायची ! कावळे- शान्ती आता कुठं आहे ? भैरव- त्या म्हातारीला कायमची शान्ती देऊन, ती