संगीत विधिनिषेध: Page 7 of 34

जन्माचा मुकला ! विवेक- टेरिबल, हॉरिबल, अँक्सिडण्ट ! (आंत बायकांच्या किंकाळ्या, “ मेलो मेलो, बुडाले ” असा ओरडा. बगळाजी घाबरत धावत येतो.) बगळाजी- धावा धावा, कुणी तरी धावा बिगी बिगी. होडी फुटली, बाया बुडाल्या. बाया फुटल्या, होडी बुडाली. अक्षिधण अक्षिधण. प्रवाळ- बोटींगचा अँक्सिडण्ट दिसतो. विवेक- घाबरू नकोस. चल पुढे. आम्ही आलो. डॉक्टर बकप्. बगळाजी- किकमार्च, किकमार्च. [जातात.] प्रवेश तिसरा ( कावळे वकीलाची कचेरी . कावळे टेबलावरचे कागद चाळीत आहे. जवळ बावळे कारकून लिहीत आहे. ) कावळे- बावळे, तुम्ही अगदी बावळे आहात. कवडीची अक्कल नाही तुम्हाला. बावळे- (स्वगत) म्हणूनच आपला मी कारकून ! कावळे- घण्टाळवाडीटं पोटपाडीचं अपील आज आहे, हे काल कां नाही मला सांगितलं. त्या बाईला रात्री भेटायला बोलावली असती. बावळे- ---पण –साहेब— कावळे- चूप बसा, बेवकूब, कामाचं महत्त्वच नाही तुम्हाला ! इकडं सेशनात पोटपाडीचा खटला न् त्याच वेळी तिकडं दिवाणीत तो गहाण खताचा खटला. आता त्या बाईला गहाणात ढकलून, तिच्या खटल्याचे काय खत करू ?—बरं, त्या ठकू म्हापशेकरणीचा बयाणा आला नाही ? बावळे- मागायला गेलो तर ती म्हणाली, साहेबांचं न् माझं खातं आहे. वळते करून घ्या. कावळे- अस्सं म्हणाली—अस्सं म्हणाली ? इकडं आलीच तर— बावळे- तिनंच तिकडं तुम्हाला संध्याकाळी— कावळे- शटप्, मी काय म्हणतो ते ऐकून घ्या, ती इकडं आलीच तर स्पष्ट सांगा, शंभर रूपये बयाणा हातात पडल्याशिवाय मी हातात केस धरणार नाही.— हे नॉटपेड पत्र कुणाचे ? कशाला झक् मारायला घेतलेत ? बिलं वसूल करायची अक्कल नाही, न् अडीच अडीच आणे असल्या पत्रांच्या डोम्बलावर— बावळे- हे त्या फासवडच्या चम्पीचं पत्र— कावळे- असं कां ! हां, असं डोकं चालवलंत, तर कोण म्हणेल तुम्हाला बावळे ? शाबास. बावळे- माझं आडनावच बावळे, तर मला बावळे म्हटल्याशिवाय तुमची न् जगाची सुटकाच नाही. कावळे- होल्लो ! बावळे- बावळे, संध्याकाळी मला माजूरीला गेलंच पाहिजे. ड्रायवरला म्हणावं, गाढवाच्या लेका, कार तयार ठेव. नाहीतर जाशील म्हणावं सिनेमाला. बावळे- पण आज साहेबाना वेळ नाही. शुद्धीसमारंभाला अध्यक्ष म्हणून जायचं आहे संध्याकाळी. कावळे- डॅम दॅट शुद्धी ! नसते उपद्व्याप आहेत सगळे. आहेत त्याच हिन्दूना माणुसकीनं जगण्याची अक्कल नाही, त्यांत ही भरताड कशाला ? मरो ती शुद्धी. मी नाही गेलो तर होईल दुसरा कुणीतरी ठोकळा अध्यक्ष. ठोकळयांना काही दुष्काळ पडला नाही. कार तयार ठेवा. माजूरीला चम्पीचा जलसा. मला न जाऊन कसं भागणार ! आय मस्ट गो. ( एक पाकीट उघडून )—ही तार कुणाची ? वेदालंकार कोळशेशास्त्र्यांची- अन् ही अशी खाली कशाला ठेवलीत ? बावळे, यू आरे फूल—सिली—डाँकी. अहो ही तार ना ? तार ना ? मग सगळ्या कागदांच्या थडग्यांच्या खाली गाडून कशाला ठेवलीत ? तार म्हणजे पत्र नव्हे, अन् पत्र म्हणजे समन्स वॉरण्ट नव्हे, यूसलेस. बावळे- साहेब, बस् झाली तुमची ही साहेबी. मला रजा द्या. कुठेहि मला पोट भरता येईल. या यूसलेस यूसलेस सर्टिफिकेटांचा मलिदा आता पुरे झाला ! कावळे- बावळे, अहो असं डोक्यात राख घालून थोडसं पोट भरतं ? युसलेस म्हणजे काय ? बावळे- निरूपयोगी. कावळे- क्वाइट राइट, तुम्ही यूसलेस कुणाला ? इतरांना मला नाही. मी तुम्हाला यूसफूल म्हटलं, तर सा-या लोकांची तुम्हाला दृष्ट लागेल, त्याची वाट काय ? बावळे अर्थापेक्षा नेहमी गाभ्यालाच हात घालावा. बोला, तुम्ही यूसलेस—का यूसफूल ? बावळे- मी ? साहेब यूसलेस—साहेब—यूसलेस—अगदी यूसलेस. ( घाबरलेला भैरव प्रवेश करतो ) भैरव- यूसलेस—यूसलेस. आमचं नाटकच बन्द पडायची वेळ नाही. महत्त्वाची सगळी पात्रं अॅक्सिडेण्टात सापडून पार जायबन्दी झाली. अजून पहिला अंकसुद्धा गाठला नाही. यूसलेस—होपलेस ! कावळे- व्हॉटू यू मीन भैरव ?