संगीत विधिनिषेध: Page 34 of 34

कर. विवेकाच्या दडपशाहीला मी कारण झाले, याची मला फार लाज वाटत आहे. भैरव- (हळूच सनातन्याला) क्रान्तिबाईला दिवस गेले आहेत, त्याची नाही तोळामासा लाज ? क्रान्ति- भैरव, क्रान्ति पडदानशीन नार नव्हे. माझा खुलासा नीट ऐका. विवेक-क्रान्तीची ताटातूट झाली, विवेकाची मुस्कटदाबी झाली, तरी क्रान्तीच्या उदगत विवेकाचे नवचैतन्य या क्षणाला फुरफुरत आहे. कसल्याहि विरोधाला न जुमानता, ते योग्यकाळी पूर्ण उमलून जन्माला येईल. कुकल्पनांचा अंधार नष्ट करील, आणि भूतदयेच्या कमळाना फुलवून समतेच्या प्रकाशानं सर्वत्र माणुसकीच्या तेजाचा सडा पाडील. तामस भ्रान्ति नष्ट झाली, सात्त्विक शान्ति दिङमूढ बनली, तरी त्रिगुणात्मक समानतेची ही क्रान्ति समाजोद्धारासाठी योग्य वेळी कडकडल्याशिवाय कशी राहील ? पुराणे- क्रान्ति ये. क्रान्ति- आहा ! या गोड हाकेसाठी मी भुकेली होते. पुराणे- सनातने या. भैरव, तू पण ये. वेडाच्या भरात मी “लाव कुंकू लाव पाट” आरोळ्या मारत भटकत होतो. भैरव- त्या मॅड्नेसमध्येसुद्धा मेथड होती की काय ? पुराणे- असेल. पण आता चांगला शुद्धीवर आलेला हा पुराणे, माझ्या सा-या तरूण विधवा मुलीना हेच ओरडून सांगत आहे, की मुलीनो कसलाहि विधिनिषेध न बाळगता “लावा कुंकू लावा पाट” क्रान्ति— भारत-भालिं तिलक नव देवा । लाल भडक विभवाचा लावा ।। स्वातन्त्र्याचा हिरकणी बिन्दि बिज्वरा शिरा । विवेक-क्रान्तिच्या जडवाचा शिरपेच तुरा ।। रमाकान्त कृति-गौरव व्हावा ।।१।। सर्व- विधिनिषेध समाप्त. विश्वाच्या सूत्रधारा, सोड तुझ्या अभंग यशाचा पडदा या नाटिकेवर. समाप्त अभिनववाङ्मयमालेचें ४ थें पुष्प वीर वामनराव कृत शीलसंन्यास नाटक समर्थ नाटक मंडळी स्टेजवर आणीत असलेलें लवकरच प्रसिद्ध होईल. महाराष्ट्र पब्लिशिंग हाऊस लि. पुणें.