संगीत विधिनिषेध: Page 3 of 34

झाले छान. असा नाट कधी लागला नव्हता. लग्न न् मरतिक, दोन्ही अगदी हुकमी. गेलो का काम फत्ते. आजवर शेंकडों लग्नें पाहिली, न् मुर्दे जाळले. पण ना कधि लग्नातनं नवरी पळाली, ना सरणातनं मुर्दा उठून फरारी झाला. पण आत्ताचा प्रकार म्हंजे अगदी हाच ! शिक्षणामुळे मोकाट सुटल्या या पोरी ! कलियुग-कलियुग बरं का हे- भैरवा- कलियुग !

भैरव- कलियुग नाही का ? हे मी बिनचुक विसरतो. उप-निषदाचं सत्ययुग न् रामकृष्णाचं द्वापारयुगच अझून चाललंय, असंच मला आपलं वाटतं.

पुराणे- अडणीवरचा आहेस. अरे ती युगं गेली- मेली- ठार झाली.

भैरव- त्यांची भुताटकीच काय ती उरली. [आत-“भ्रान्तीनं चांगला दिला त्या मेल्याला धडा.”] भैरव- बसला उजव्या कानाला दडा. पुराणे, डावीकडं येऊन पडा. ( दुस-या बाजूला जातो.) [आत- “कावळे वकील शेम शेम.” त्रिवार गर्जना.] पुराणे- शेण शेण ? हा कसला शेणसडा, भैरव. भैरव- पुराणे, पळा पळा. हा, इकडं येतोय शिकलेल्या बायांचा दरवडा. पळा. त्या दगडी पुतळ्याच्या आड दडा, नाहींतर भरला आपल्या हयातीचा धडा.

पुराणे- गाढवा, बायकांना भितोस ?

भैरव- अहो पण या शिकलेल्या आहेत.

पुराणे- शिकलेल्या असोत, नाहीतर पिकलेल्या असोत, बायकांना बाचकून पुरूषांचे कसं भागणार ? ब्रम्हदेवाची सृष्टी का आजच बन्द पाडायची आहे ?

भैरव- त्या सृष्टीच्या धास्तीनंच मी शनवारचे निर्जळी उपास न् मारूतीची उपासना चालवली आहे. पुराणे- तर मग तिथेच तुझा घात होणारे भैरवा. साडेसाताळलेले लोक मारूतीच्या शेन्दरात लोळपाटणी मारतात. पण बेट्या, मारूतीच्या मागची वान्झोट्या बायांची साडेसाती कुठं सुटली आहे ? पुत्रदर्शनासाठी धाधावलेल्या, शिकल्या पिकल्या बायांनी, प्रदक्षणा घालघालून त्या बालब्रम्हचा-याला अगदी उठवणीस आणला आहे. ब्रम्हचारी म्हणून मारूतीच्या नादी लागशील, तर लग्नाच्या खटपटीशिवाय संसारांत अडकशील. लग्नसराईच्या लग्नांची आणेवारी काढली, तर सवा आठ आणे लग्नं मारूतीच्या देवळात, अन् पावणेआठ आणे लग्नं शाळा कॉलेजात जमतात हो. बायकांना भिऊन पळण्यात अर्थ काय ? रहा, त्या दगडी पुतळ्यासारखा ताठ उभा रहा. भितोस काय लेका असा ?

भैरव- अहो मी बायकांना भीत नाही, लग्नाला भितो. पुराणे- लग्नाशिवाय संसार थाटायला तर नाही ना तुझी हरकत ? नसली, तर या, या बाजारातच तुझा सौदा जुळून येईल. घाबरू नकोस. भैरव- नको बुवा. या शिकल्या सवरलेल्या श्रीमत्या म्हणजे धावत्या पळत्या संक्रान्ती ! पंचांगातल्या संक्रान्ती परवडल्या. त्या दक्षिणेकडे तोंड करून, ईशान्येला पाहातात, अन् वायव्येला मुरका मारून, उत्तरेला पळतात.पण या संक्रान्ती म्हणजे वायूच्या विहिणी, अंजनीच्या बहिणी अन् मारूतीच्या सवाष्णी. पुराणे- भैरव, ती- ती- तीरे कोण ? भैरव- ती ? तिथं तर तरूणींची एक जत्राच भरली आहे. त्याला तुमची ती कोणती, कशी सांगू ? पुराणे- माझी “ती” कशाला येते मरायला पुन्हा ! अन् आलीच, तर आहे कुठं आता घरांत व्हेकन्सी. शांतीच्या नव-याच्या तेराव्यालाच तिने नदीचा कांठ गांठला—ती, ती ती पहा, घाटोळी बैलांच्या वशिंडाएवढा अंबाडा मानेवर घेतलेली ती. एsहे एsहे ! काय बटकीची, एकेका शब्दागणिक मानेला दहादहा हिसके न् मुरके मारतेय्. कोण रे गाढवाची लेक ही, भैरवा ? भैरव- ती तर तुमचीच लेक, शांता. पुराणे- अन् तिच्याबरोबर ती दुसरी फटाकडी रे कोण ? भैरव- ती क्रान्ती. सनातन्याशी लग्न लागलेली— ( क्रांती शांती प्रवेश करतात ) क्रान्ति- शटप् भैरव, यू फूल. त्याच्याशीं माझा विवाह झाला, पण लग्न लागलेलं नाही. आयाम ए व्हर्जिन्. पुराणे- यूआरे व्हर्जिन्, अँड ही कोण ? शान्ति- आय् टू- मी पण- व्हर्जिन नाही का बाबा ? पुराणे- व्हर्जिन् असलीस तरी विधवा आहेस,-अगो, पण हे काय ? हे हे काय ? हे हे हे काय ? शान्ति- बाबा झालं काय ? भैरव- पुराण्याना हिवडं भरलं का काय ? पुराणे- अगोs,