साता-याचें दैव का दैवांचा सतारा: Page 6 of 15

मेल्या स्थितीत कण्हतकुंथत पडलेला आहे. त्या तक्ताच्या खाली प्रतापसिंहांच्या सत्याग्रहाच्या धडाडीबरोबरच भोसले घराण्यांतल्या राजस्त्रियांच्या किंकाळ्या आपल्याला अजून ऐकूं येतील. त्या तक्ताच्या खालीं ब्राम्हणांच्या राष्ट्रद्रोहाबरोबरच आप्पासाहेब भोसल्याचा घरभेद, आप्पा शिंदेकरांचा हारामखोरपणा, तात्या केळकराचे खोटे शिक्के नागोदेवरावाची भिकी सोनारीण, भोरचे पंतसचीव वगैरे अनेक वीररत्नांच्या कारस्थानांचे देखावे, ताराबाई साहेब, आपल्याला त्या रात्री स्षप्ट दिसूं लागतील. छत्रपतीच्या तक्ताला पेशवाई वळणाचें भिक्षुकी ग्रहण कसें लागलें, ब्राम्हण ब्राम्हणेतर वादामुळें अभिमानाऐवजी स्वदेशद्रोहाचें बाळकडू म-हाठे कसे प्याले आणि कायदेबाजीच्या सबबीवर बनिया कंपनीनें सातारच्या या पूज्य छत्राचें तीन तेरा आपल्याच लोकांच्या हातून कसे वाजविले, या सर्व गोष्टीचा आपण नीट मननपूर्वक अभ्यास केला. आणि त्या दिशेनें युवराजाच्या आत्म प्रबोधनाचा मार्ग आखलांत, तर केवळ काकतालीय न्यायानें घडून आलेल्या आपल्या चिरंजीवांच्या दैवाच्या सता-याबरोबरच साता-याचें दैवसुद्धां उदयास येण्याची आशा अजून नष्ट झाली नाही, असें आशाखोर मानवी मनाला वाटत असल्यास तो आशावाद खात्रीनें निंद्य गणला जाणार नाहीं, अशी आम्हाला आशा आहे.

-------------------------------------

इतिहास कसाही उलट सुलट वाचला आणि राजकारणाची तांगडी कशीही उलथीपालथी करून चोखाळली तरी एक गोष्ट निर्विवाद आहे की, अवघा महाराष्ट्र सातारा राजधानीकडे कांही एका वर्णनीय भावनेनेंच नेहमी पाहात असतो. आज या देवळांतला देव जरी नष्ट झाला असला तरी त्याची पडकीं भिंताडे आणि रडके बुरूज त्या देवाची आठवण त्यांच्या हृदयात क्षणोक्षणी उंच बळवीत असतात. सातारच्या छत्रपतींच्या उच्चाटणांचे पाप जितकें स्वकीयांच्या पदराला बांधता यील, तितकेंच ते ईस्ट इंडिया कंपनीच्या पाटलोणीलाही भिडवितां यईल. जितक्या प्रमाणात आमचें देशबंधु या कामी जबाबदार ठरतील, त्यापेक्षां शतपट प्रमाणांत या पापाचा वाटा ब्रिटीश सरकारच्या मूळमाया कंपनीला – अर्थात ब्रिटिश राष्ट्रालाही घ्यावा लागेल. प्रतापसिंह छत्रपतींचें उच्चाटण हा ब्रिटिशांच्या न्याबुद्धीवरला कधीही न पुसला जाणारा कलंक आहे, अशा प्रकारचे तत्कालीन ब्रिटिश मुत्सद्यांचे अभिप्राय आज कागदोपत्री प्रसिद्ध आहेत. हिंदु लोकांनी राष्ट्रद्रोह केला, तर ब्रिटिशांनी अन्याय केला, असा या प्रकरणाचा सारांश निघतो सर्वांचीच त्यावेळी बुद्धी फिरली, म्हणून शिव छत्रपतींची सातारा राजधानी खालसा होऊन तेथील भोसल्यांना नुसत्या साध्या जहागिरीवर संतुष्ट राहण्याची वेळ आली. आज काळ बदलला आहे. फाटलेल्या मनोवृत्ति सांधण्याचा सर्वत्र प्रयत्न होत आहे. हिंदी व ब्रिटिश लोकांचे संबंध समरस करण्याचे श्लाघ्य प्रयत्न चालू आहेत. गतेतिहासाचा कसलाहि विकल्प मनांत न आणतां, मराठे वीरांनी गेल्या महायुद्धांत ब्रिटिशांच्या अब्रुसाठी फ्रान्सच्या समरांगणांवर सांडलेलें रक्त अजून लालबुंद चमकत आहे. अशा परिस्थितीत अखिल मराठ्यांना अमरावतीप्रमाणे प्रिय असलेली सातारा राजधानी जर या नव्या मन्वतरांत पुनश्च स्वतंत्र म-हाठी संस्थानाच्या पुनरुज्जीवनाला पात्र होईल. ब्रिटिश न्यायदेवता जर साता-याच्या शिवछत्रपतींच्या परमप्रिय गादीची पुनर्घटना करील, तर त्यामुळें ‘शिवराया प्रणिपात कराया’ ब्रिटानियेने आपल्या उद्याच्या बादशहाला हिंदुस्थानांत पाठवून जो कृतज्ञ भाव व्यक्त केला, त्या भावनेला कांही तरी अर्थ आहे, असें महाराष्ट्र समजेल. आज हा विचार कित्येकांना रुचणार नाही. अनेकांना ही कल्पित कादंबरी वाटेल. बरेच विचारवंत याला स्वप्न म्हणतील. परंतु जेथें तेथें खरें मर्दानी म-हाटी हृदय धमधमत असेल तेथें तेथें हा साता-याच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न काळजाला जाऊन भिडल्याशिवाय कधींही राहणार नाही, अशी आमची खात्री आहे.

भांबुर्ड्याच्या धोंड्यावर कसलें तरी कांही तरी स्मारक उभारण्यापेक्षा सातारच्या संस्थानचें जर आज पुनरुज्जीवन होईल, तर महाराष्ट्राप्रमाणेंचं ब्रिटानियेलासुद्धा एका महत्पातकाचे प्रायाश्चित मोठ्य़ा आबांत घेण्याची मंगल पर्वणी प्राप्त होईल. ब्रिटिशांसारख्या सर्वसमर्थ, धूर्त व कदरबाज राष्ट्राला महाराष्ट्राची जर कांही कदर वाटत असेल, मराठ्यांच्या आत्मयज्ञाची त्यांना बूज राखावयाची असेल, तर तिवाठ्या तिवाट्यावर दगडधोंड्याचीं स्मारके उभारण्यापेक्षा म्हैसूर, काशी वैगेरे खालसा झालेल्या कांही संस्थानचें जसें त्यांनी पुनरुज्जीवन केलें, तद्वत सातारच्या छत्रपतींचे व त्यांच्या पुरातन तक्ताचें पुनरुज्जीवन केल्यास मर्द मराठ्यांच्या हृदयांत आपलेपणाविषयी भावना जागृत केल्याचें श्रेय त्यांना खास मिळेल. ही अशक्य कोटीतील गोष्ट नव्हे. ही