साता-याचें दैव का दैवांचा सतारा: Page 15 of 15

सतत चवदा वर्षे विलायतेस झगडून न्याय मिळविण्याचा यत्न केला. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणा, किंवा योगायोगाची गोष्ट म्हणा की ज्या दादजी नरस प्रभूनें आद्य छत्रपति शिवाजी महाराज यांच्याशी स्वराज्यस्थापनेची आणभाक केली, त्याच्याच अस्सल चौथ्या वंशजावर त्याच हिंदवी स्वराज्याचा भिक्षुकशाहीकडून झालेल्या खुनाचा न्याय मिळविण्यासाठी विलायतेस जाण्याचा प्रसंग यावा, हा योगयोग विलक्षण नव्हे काय? असो. रंगो बापुजीची विलायतेची कामगिरी हा एक स्वतंत्र विषय आहे तो आपल्याला माझ्या पुस्तकांतच पहावयाला मिळेल इतकें सांगून मी पुरें करितों.