वक्तृत्व – कला आणि साधना: Page 9 of 75

अपूर्ण मतलब असलेली, पण अर्थपूर्णतेसाठी एकमेकांवर अवलंबून असलेली पोटवाक्ये उच्चारताना आणि त्यांचा परस्परसंबध वेगवेगळा दाखवण्यासाठी, अवरोहाची योजना फार खुबीने नि चातुर्याने केली पाहिजे. (3)ज्या वाक्यांचे स्वरूप प्रश्नार्थक असते, पण त्यांना ‘होय’ किंवा ‘नाही’ या दोनच शब्दांनी दिलेले उत्तर पुरेसे होत नाही, तर त्यासाठी स्वतंत्र वाक्याची योजना करावी लागते, तेथे स्वरांचा कल पडता असतो. जसे – प्रश्न – ही नोकरी सोडून तू जाणार तरी कुठे ? उत्तर – का ? वाटेल तिथे. नोकऱ्यांना काही दुष्काळ पडला नाही. (4)ज्या वेळी एखाद्या गंभीर प्रतिज्ञेची अगर आपल्या भाषणाच्या सत्यतेची खात्री पटवायची असेल, त्या वेळी स्वरांचा कल पडता तर पाहिजेत, पण मुख्य मुद्यांच्या शब्दांवर आघातही केला पाहिजे. वाक्य नकारार्थी असेल तरी हरकत नाही, पण आघातमिश्रित अवरोह अपेक्षित परिणाम केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी स्वरांची टीप सर्वसाधारण सप्तकातली असते. (5)आज्ञा, धाक किंवा अधिकार दर्शविणारी वाक्ये आघात मिश्रित अवरोहात उच्चारावी लागतात. स्वरांचे प्रमाण मध्यम सप्तकापासून तो नीच सप्तकापर्यंत असते. (1)आर्जवात्मक (आरोह) भारतखंडातील जयश्रीचा प्रतापसूर्य एकदा मावळला तो फिरून न उगवण्याकरिताच काय ? आमचे प्रतापी आर्यावर्त असेच का अंधारात रहावयाचे ? महाराज, यावच्चंद्रदिवाकरौ ज्यांची कीर्ती या भूगोलावर अजूनही दुमदुमत आहे, त्या तुमच्या श्रीरामचंद्र, युधिष्ठिर, विक्रमादित्य, अशोक इत्यादी पूर्वजांच्या उदात्त, तेजस्वी आणि निष्कलंक सत्त्वांची तुम्हाला जर चाड नसेल तर त्यांची क्षिती दुसऱ्या कोणी बाळगावी बरे ?’ कर्नल ऑल्कॉट (2)विंनती (आरोह) सुमेरसिंग, खरकसिंग, पाच लाख रुपये व दोन किल्ले एवढेच तर आपल्याला पाहिजे असेल तर तसा माझ्या सहीशिक्याचा हुकूम मी आता तुम्हाला देतो. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही काकांना पेशव्यांचे गादीवर बसवा. मला जिवंत ठेवल्याबद्दल काका तुमच्यावर खात्रीने रागवणार नाहीत; उलट पेशव्यांच्या रक्ताशी तुम्ही बेईमानाने वागला नाही म्हणून मी लिहून देत असलेल्या दोन किल्ल्यांचे ऐवजी तीन किल्ले बक्षीस देतील. मला मारून जर तुम्ही पेशव्यांच्या रक्ताशी निमकहराम झाला, तर बाजीरावसाहेबांच्या कुळातील कोणता पुरूष तुम्हावर विश्वास ठेवील ? भाऊबंदकी – अंक १-१ (6)साधारण नियमच असा आहे की उग्र, कडक, तापट, खनशी विकार (म्हणजे राग, संताप, त्वेष द्वेष इ.) प्रगट करताना स्वरावरोह अतिशय आघाताने नि झपाट्याने बाहेर पडत असतात. मात्र, स्वरोच्चार कितीही उंच असला तरी त्याची अखेरची टीप खालच्याच सप्तकात फुटते, हे लक्ष्यात असावा. (7)औदासिन्य, खेद, दिलगिरी इ. दुःखद विकार व्यक्त करताना स्वरोच्चारांचा कल मुख्यत्वेकरून पडता असतो. स्वर अगदी मंद्र (खालच्या) सप्तकातला असून, शिवाय प्रत्येक शब्दाच्या उच्चारात काल किंवा विराम हे फार दीर्घ असतात. अभ्यासाचे धडे ‘‘एकूण ज्या पुरूषाच्या पोटी संतान नाह, त्याची गती अशी होते ना ! ज्याचा तो मरण पावला म्हणजे त्याची सगळी संपत्ती एखाद्या परक्याच्या हाती लागते ! झाले, मी मरण पावलो म्हणजे या पुरुषवंशातल्या राजलक्ष्मीची देखील भलत्याच ऋतूत पेरलेल्या जमिनीप्रमाणे व्यवस्था होणार !’’ शाकुंतल, अंक ६ – कै. किर्लोस्कर ‘‘हाय हाय ! कैकयी, खचित माझा प्राण घेण्याला कारण तू होणार ! चांडाळणी, तू आपला हट्ट न सोडलास तर केवढा घात होणार, हे तुझ्या लक्षात तरी आहे काय ?........ हा दुष्टा ! हतदैव दशरथा ! या काळसर्पिणीरूप स्त्रियेवर लुब्ध होऊन हा विशुद्ध रविवंश बुडविलास रे बुडविलास. धुःकार असो तुझा ! ! ’’ रामराज्यवियोग. अंक ३. कै. किर्लोस्कर मार्गदर्शनन आणि सूचना सर्वसाधारण विद्यार्थ्यांना नियम आणि व्याख्या कंटाळवाण्या वाटणे साहजिक आहे. स्वरोच्चाराचे खरे मर्म भावनांच्या यथातथ्य प्रगटीकरणात असते, एवढे ध्यानात असले म्हणजे झाले. वास्तविक, हा विकार नि भावनाच्या प्रगटीकरणांचा धर्म नैसर्गिकच असतो. मात्र सर्वांना तो सारखाच व्यक्त करता येतो, असे नाही. आश्चर्य किंवा राग हा एकच विकार घेतला, तरी प्रत्येकजण तो आपापल्या स्वभावानुसार वेगवेगळ्या तऱ्हेने व्यक्त