वक्तृत्व – कला आणि साधना: Page 75 of 75

आणि त्याचीच चर्चा सगळीकडे चालू होते. डॉ. अनी बेझण्टवाईंचा हाच क्रम असे. व्याख्यान अतुच्च बिंदूवर गेले का झपकन भाषण थांबवून त्या व्यासपीठावरून निघून जात. नामदार गोपाळ कृष्ण गोखले अशाच ठिकाणी भाषण संपवून खाली बसले का श्रोत्यांना ‘‘अरेरे, आणखी काही त्यांनी बोलायचे होते हो’’ असे चुटपुटत असत. लोकमान्य टिळकही समारोपाच्या फारसे भानगडीत पडत नसत. ‘‘मनात जे विचार नेहमी खळबळत असतात, तेवढेच आजवर मी तुम्हाला सांगत आलो. त्याचा विचार करणे वा न करणे हे आता तुमचे काम.’’ असेच काही बोलून ते आपल्या भाषणाची समाप्ती करीत असत. = स मा प्त =