वक्तृत्व – कला आणि साधना: Page 8 of 75

यायला चरित्र कारण होते. म्हणून चरित्र श्रेष्ठ. (राजवाडे, चंपूकाव्य – प्रस्तावना) आरोहांचा तर्कशुद्ध उपयोग जोपर्यंत वाक्याचा अथवा वाक्यांगाचा अर्थ संपूर्ण झाला नसेल, अथवा मुद्दाम अपूर्ण ठेवायचा असेल तेव्हा स्वरांचा वाक चढता ठेवावा, आरोह अवरोह ३ कोठे पुराणे होत आहेत, ------------------- अशा प्रकारे २ कोठे कीर्तने होत आहेत, सगळा महाराष्ट्र १ कोठे भजन होत आहेत, महोत्सवात दंग झाला आहे. (२) नकारार्थी अणारी वाक्ये नि वाक्यांगे स्वरांच्या चढत्या कमानीत उच्चारावी – ३ कोणाचे काही. रुचायचे नाही, ----------------- अशा माणसाला २ दुसरा करतो ते खपायचे नाही, म्हणावे तरी काय १ स्वतः काही करायचे नाही, समजत नाही. (३) संशय किंवा अचानक योग व्यक्त करणारी वाक्ये आरोहाची असावी – ३ शोभणारी नाही. ------------------------------------------------- २ हा न्याय (संशय) १ सध्याच्या लोकशाहीला ३ आले म्हणायचे --------------------------- (आकस्मिक योग) २ अखेर १ वांध्यांत पडलेले घर त्याच्या ताब्यात (४) ज्या वाक्यांचे स्वरूप प्रश्रार्थक असते, त्यांना ‘होय’ किंवा ‘नाही’ या दोनच शब्दांनी समर्पक उत्तर देता येते, त्या वाक्यात आरोहाची योजना करतात – ३ भागेल काय ? २ सुराज्याने १ स्वराज्याची तहान आरोहांचे भावनात्मक उपयोग (५) जेव्हा वाक्याचे स्वरूप आर्जवात्मक, विनंत्यात्मक असते, तेव्हा ते वाक्य अथपासून इतिपर्यंत चढत्या स्वरात बोलतात. आवाजाची टीप कमी-अधिक प्रमाणात पण उच्च असावी. तथापि ज्या वेळी उदाह वृत्तीची विनंती, गंभीरपणाचे आर्जव करायचे असते, त्यावेळी स्वरांचा कल पडताच ठेवणे बरे. (1) आर्जवात्मक (आरोह) “मराठ्यांच्या मर्दुमकीचा प्रतापसूर्य एकदा मावळा तो फिरून न उगवण्यासाठीच काय ? शूर नरनारींचा महाराष्ट्र असाच का अंधारात पडून राहणार ? बाप हो, छत्रपति शिवाजी महाराज, थोरले बाजीराव, तानाजी नि बाजी प्रभूंच्या उदात्त तेजस्वी नि पराक्रमी इतिहासाची चाड तुम्हाला जर नसेल, तर त्याची क्षिती दुसरा कोण बाळगणार ?” (ब) विनंती (आरोह) “मला मारून जर तुम्ही पेशव्यांच्या रक्ताशी निमकहराम झाला, तर बाजीराव साहेबांच्या कुळातील कोणता पुरुष तुम्हावर विश्वास ठेवील ?” (1) उदास वृत्तीची विनंती (अवरोह) “मोहने, माझ्यासारख्या दुर्दैवी अपेशी पुरूषाच्या प्रेमात धन्य मानण्यासारखे काय आहे ? माझी धनदौलत, माझा अभिमान, माझा दरारा या कांचनगडात भरलेला होता. ज्या वेळी गड कोसळला, त्या वेळीच माझ्यातील सर्व चांगल्या गुणांचा लोप झाला. माझ्या प्रेमात आनंद मानण्यासारखे आता काय उरले आहे ?” (६) गंभीरपणाचे आर्जव (आरोह) “जस्टिस रानडे आम्हाला सोडून आजच परलोकी प्रयाण करतील, अशी कल्पनाही काल सायंकाळी कुणाला शिवली नसेल. पण... काळाची गती... विचित्र खरी. त्यांच्या विविध कार्यांचा पसारा काही पूर्ण तर काही अपूर्ण असा सर्वत्र पसरलेला आहे. तो नीट आवरून, त्यांच्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी, बंधूहो आता आपणावर येऊन पडली आहे.” (७) विनंती किंवा प्रार्थना करण्याच्या वाक्यात स्वरांचा आरोह असला, तरी विकारानुरूप टिपेची पट्टी कमीजास्त प्रमाणात असेल. हाच नियम गंभीर प्रार्थना, हृदयद्रावक आर्जव यांना लागू आहे. (८) आनंद, प्रेम, भक्ती, मैत्री, आशा आणि बहुतेक सर्व आनंददायक विकार दर्शविणारी वाक्ये आरोहात असतात, पण शेवटले शेवटले शब्दोच्चार अगदी वरच्या टिपेत होतात. अत्यंत मृदुलता, दया, करूणा यांचे मिश्रण असल्यास, आरोह असला तरी स्वरांची टीप खालच्या सप्तकातील रहाते. (९) आश्चर्य, विस्मय, अदभूत प्रकार दर्शविणारी वाक्ये उच्च स्वरांच्या टिपेच उच्चारली, तरी आदरयुक्त भीती, धास्ती नि भय-मिश्रित वाक्यांचा सूर खालच्या सप्तकातलाच लागतो. अवरोहांचा तर्कशुद्ध उपयोग (1)एखाद्या वाक्याचा अथवा पोटवाक्याचा अर्थ संपूर्ण झाला असे तर्काने वाटताच, त्य ठिकाणी स्वरांचा कल पडताच ठेवला पाहिजे. (2)स्वरांचा अवरोह झाला म्हणजे अर्थपूर्णता झाली असे वाटते. तान मारताना गवई प्रथम आरोह करून नंतर विश्रांतीसाठी अवरोहाच्या शेवटल्या टप्प्यावर येतो. अवरोह हे एक विश्रांतीचे ठिकाण आहे आणि येथेच ‘विराम’ सहाजिक घडून येतो. म्हणून मोठमोठ्या वाक्यातील