विजयादशमीचा संदेश

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सीकेपी समाजात जागृती आणण्याचं काम प्रबोधनकारांनी केलं. या समाजातील तरुणांसमोर बाजीप्रभू देशपांडे यांचा आदर्श कायम ठेवला. त्याचं दर्शन कवी केशवाच्या या छोट्या पुस्तिकेत घडतं.

चांद्रश्रेणीय कायस्थ प्रभू समाजास ‘ विजयादशमीचा संदेश‘

(आवृत्ती ३ री ) बिनमोल (२७/९/१९२५) खास कायस्थ प्रभू समाजासाठीं विजयादशमी –

निमित्त पोवाडा विजयादशमी सण विजयाचा वैभव शौर्याचा । चैतन्याची ज्योत भडकवी प्रताप आर्याचा ।। धृ ।।

ज्या दिवसाने दक्षिण प्रांता महा-राष्ट्र केले । शिवरायांचें निशाण भगवे अटकेला नेले ।।

राज्य म-हाठी शिवरायांचें कां कायस्थांचे ? । कायस्थांच्या रक्तांवरती बुरूज उभे त्याचे ।।

प्राणप्रतिष्ठा त्या राज्याची कायस्थें केली । अवतारी शिवमूर्ती वरती मग स्थापना केली ।।

गत कालांतिलसा-या गोष्टी आज स्पष्ट दिसती । आज कशाला ? कायस्थांच्या ह्रदयीं नित वसती ।।

सतराव्या शतकात गाजला डेका शौर्याचा । सह्याद्रीतुनि अझुनहि निघतो प्रतिध्वनी त्याचा ।।

ते वैभव त्रयशतकांचे ।। ते वैभव . ।। महाराष्ट्राचे ।। कायस्थांचे ।। शिवछत्रपतींची छाया ।।

राहिली मात्र नित गाया ।। घडिघडीं असे सुचवाया ।। सर्व जाउ द्या, परंतु राखा बाणा मर्दाचा ।। चैत. ।।

२ शिवबाचा जो हस्तक उजवा चिटणिस बाळाजी । पावनखिंडिस पावन करि नरवीर प्रभु बाजी ।।

मुरार बाजी तो रणगाजी विसरु नका कोणी । नांव ऐकतां टचकन् येते डोळ्यांला पाणी ।।

थांबा थांबा ! दणकत आहे नौबद ही कसली ? । ठाणेदारिण सावित्री ही मोक्षपदीं बसली ।।

“ हाल करा की ठारहि मारा परंतु राघोबा “ । ठासुनि गर्जुनि कोण बोलला सांगा वाघोबा ।।

सखाराम हरि गुप्ते ज्याचे नांव पूर्ण मोही । महाराष्ट्र इतिहास तयाचे डफगाणें गाई ।।

सीमोल्लंघनसमयीं मातावचनाला जागे । परकांता-छलकास दंडि निलकंठ राम पागे ।।

हे पूर्वज अमुचे तुमचे ।। हे पूर्वज. ।। महाराष्ट्राचे ।। कायस्थांचे ।। विसरुन नका त्या जाऊ ।।

या चला त्यांस नित ध्याऊ ।। “ आम्ही वंशज तुमचे “ दाऊ ।। शौर्य धैर्य मति कलमबहाद्दरि बनवि पिंड आमुचा ।। चैत . ।।

३ महाराष्ट्राची हांक ऐकुनी खडबडले पणजे । ‘स्वराज्य’ शब्दहि बोलाया कां मन तुमचे लाजे ।।

गडकरि गडविरहीत जाहले राज्य न राजांना ।। प्रधान बसले स्वस्थ , मिळेना गुप्ती गुप्त्यांना ।।

टिपणीसांचे टिपण हरवले फड नच फडणीसा ।। चौबल हतबल, करि न समर्था कोणी कुर्नीसा ।।

स्थिती असे ही , स्पष्टोक्तीचा राग नका मानू । सत्यप्रिय कवि चीत कराया शोधु नका कानू ।।

स्वत्व विसरतां सर्वहि गेले दैन्य पूर्ण आलें । चैतन्याची ज्योत. विझाली ग्रहण पुरे आले ।।

परिस्थिती चारित्र्य संस्कृती बदलाया येते । जसा काळ बदलतो बदलती तसे लोकनेते ।।

ये नवा मनू जोमाचा ।। ये नवा . ।। महाराष्ट्राचे ।। कायस्थांचे ।। वेळींच सिद्धता ठेवा ।।

सांपडे अमोलिक ठेवा ।। हा सुयोग दुर्लभ देवा ।। उज्जवल तुमचा थोर पराक्रम जन्माजन्मांचा ।। चैत. ।।

४ झोत जगाच्या प्रवृत्तीचा कोणिकडे वाही । संस्कृत असुनी दृष्टी तुमची, दिसत कसा नाही ।।

“उदासीनता” ब्रीद नसे हे मुळिं कायस्थाचें । देशासाठी मरुन गेले वाडवडिंल ज्यांचे ।।

इतिहासाच्या स्वच्छ दर्पणीं आत्मरुप बघता । केसरिचे जे छावे बनले मेष कसे आता ।।

हुद्दे पदव्या रगड मिळवितां, काय विजय केला ? समाज तुमच्या स्वार्थापायीं अवनतिला गेला ।।

प्रचलित मनु-संदेश ऐकुनी थरारला देश । अझुनी आम्ही कां न त्यजावा उदासीन वेष ।।

उहात्त हेतू उदार बुद्धी, उत्तम तत्त्वांचा । विसर तुम्हांला समूळ पडला आद्य-संस्कृतीचा ।।

सण दसरा अति भाग्याचा ।। सण ।। महाराष्ट्राचे ।। कायस्थांचे ।। सत्वरी जागृतिस याहो