वाचकांचे पार्लमेण्ट: Page 9 of 74

झाले म्हणण्यात काय अर्थ? रेशनचे कदन्न खावून सगळे लोक ठाकठीक जगत आहेत. निवारा नाही,कपडा नाही, गुन्हेगारी बोकाळली, चो-यामा-या ----, खून पडत आहे, तर सरकारच्या मंत्रिमंदिरात अधिका-याचे खून पडताहेत, तरीहि कोटिकोटि जनता काँग्रेजी उमेदवारांच्या पेटीत ---- ढिगार ओतायला ठणठणीत जिवंत असता आयुष्य कमी झाले कसे म्हणता! आता अवताराविषयी म्हणाल, तर बरोबर – अवतारच --- ह्याची बिनचूक आकडेवार मोजदाद केन्सस वाल्याने ठेवलेली आहे. मुरलीधर कृष्णा पाटील, भादली बु।। स०- शेतकरी समाजात स्त्री-शिक्षण वावडे कां? ज०- पुरुष-शिक्षण तरी कुठें वावडे आहे? स०- आईची सर बायकोला येणे शक्य नाही, म्हणतात. खरे ना हे? ज०- कशी येणार? बायकोला आईपणा येत असला, तरी बायकोला आई कोण मानणार? ----- मधू चव्हाण, हिरापुर, ता. ४०गांव. स०- सत्यनारायण केल्यापासून हित अहित कोणते? ज०- भोळसट मनाचे पोकळ समाधान, यापेक्षां अधिक काही होत नाही. स०- देहातून आत्मा निघतो नि मग कोठे जातो? ज०- शैवांचा कैलासात, वैष्णवांचा वैकुण्ठात, टाळकुट-या वारक-यांचा ----आणि बाकीच्यांच्या आत्म्यांसाठी स्वर्ग पाताळाच्या सरहद्दीवर एक निर्वासितांची छावणी थाटलेली आहे. तेथल्या झोपड्यांत, असा पुराण---- निर्वाळा आहे. स०- -- स्वातंत्र्यामुळे आपल्याकडे ब्रम्हदेशे निर्माण होतील, असे -- वाटते? ज०- ब्रम्हदेवाची बरीच माहिती दिसते राव तुम्हाला. नवजवान कंपनी, रोझोदा, ता. रावेर. स०- पाकिस्तानी मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांची प्रतिती लक्षात घेऊन, हिंदूंनी मुसलमानांशी कसे वागावे? ज०- काही थोड्या व्यक्तींच्या ------ बद्दल सर्वच समाजावर ---------- पणाचे आहे. जगात कितीहि निरनिराळे धर्म अ सले, तरी -------- माणुसकी हा एकच धर्म पाळायचा आहे, ही जाणीव मुसलमानांप्रमाणे हिंदूंनाही शिकायची आहे. स०- देशातील काळा बाजार नि भांडवलशाही नष्ट करण्यासाठी जनतेने कोणत्या पक्षाला निवडून द्यावे? ज०- दुधाचे भांडे उलथले. आतां या भानगडी नष्ट होतात कां पुष्ट होतात, ते नुसते मुकाट्यानें पहायचे आहे. स०- काँग्रेसच्या राज्यात सायकलीपासून जकात बसली. कांही वस्तु विकायची, तर तेथेहि कर आहेच, मग माणसांवरहि कर बसणार काय? ज०- कां बसू नये? असेलहि. रामराज्यांत अशक्य काय आहे? विश्वनाथ डी. नेहेते, सावदा. स०- भारतात सर्वत्र शाळेतून लष्करी शिक्षण कां दिले जात नाही? ज०- शेल-फोर्स आत्मबळावर रामराज्य चालवणारे आपण अहिंसावादी. आपल्याला कशाला हवी ती तमोगुणी ---- हा --------? जोवर राज्यकारभारात ----- नि बेइमानीचे ----- आहे तोवर या शिक्षणाचा मुद्दा चुकून निघालाच तर त्याला ---- पडावें लागेल. स०- विधिमंडळासाठी मराठी चवथी शिकलेला माणूस उमेदवार उभा राहतो, तर तो ---- जनतेची गा-हाणी कशी मांडणार? ज०- जनतेची गा-हाणी मांडण्यासाठी लोक विधिमंडळात जातात, ही समजूतच आधी मूळ चूक. मराठी चवथीच कशाला? आंगठेबहाद्दर टोणपा निवडून गेला तरी रामराज्यांत चालतो. विधिमंडळात करावयाचे विधि ठरलेले असतात. आता तर काय? सगळे मंडळ काँग्रेसवाल्यांचेच आहे. विरोधाला कोणीहि नाही. म्होरक्याने ढोलके वाजवायचे आणि बाकीच्या नंदी बैलांनी व्हय व्हय म्हणून नुसत्या माना डुलवायच्या एवढे कर्म त्या मराठी चवथीवाल्याला साधणार नाहीं कां? स०- साधू संत समाजाला उत्कर्षाची प्रेरणा देवू शकतात काय? ज०- शकतात. पण असे संत फारच विरळा. बाकीचे सगळे भगताना अध्यात्माचे वेड लावून स्वतःचे पाय रगडून घेणारेच असतात. नामदेव लक्ष्मण चवाथे, भोजे, ता. पाचोरे. स०- ---- असणा-या व्यक्तीची मनोवृत्ती कशी असावी? ज०- ----- पर्वा न करता सत्यासाठी प्राणार्पण करणारी. स०- ब्राम्हणादि उच्चवर्णीय समजणा-या पांढरपेशा समाजांत विधवांचा पुनर्विवाह न करण्याच्या रुढीचे मर्म कशात आहे? ज०- त्या समाजाच्या राक्षसी मनोवृत्तीत. श्रीरंग कृष्णाजी वराडे, सुरवाडे. स०- लोकोत्तर विभूतींची चरित्रें आपण लिहिता. मग आमचे वडील संत तुकडोजी महाराजांचे चरित्र पुढेमागे लिहिणार आहात काय? ज०- आज श्री. गाडगा बाबांचे चरित्र लिहित आहे. कारण ते माझ्या सोशालिस्ट पिंड प्रकृतीला आकर्षिणारे आ हे. उद्या कोणाचे लिहिणार, किंवा मुळीच लिहिणार नाही, हे