वाचकांचे पार्लमेण्ट: Page 74 of 74

माणसे व्यवस्थित नसण्याचे कारण कायॽ ज.- व्यवस्थित म्हणजे काय\ ती काय ढुंगणाचे सोडून डोक्याला गुंडाळतातॽ गणपत भिकू इंगळे, एदलाबाद स.- बालवीर चळवळ प्रथम कोणत्या देशात कोणी चालू केलीॽ ज.- ही आंतर्राष्ट्रीय संघटना सर रॉबर्ट बेडन पोंवेल याने 1908 साली लंडन येथे स्थापन केली. तिचा विस्तार जगभर झाला आहे आणि सर्व जगात आज 20 लाखाच्या वर बालवीर तिच्या निशाणाखाली लोकहिताची अनेक कामे करीत असतात. स.- संक्रांत नेमकी जानेवारीच्या 14 तारखेलाच कां येते ॽ त्या दिवशी तीळगूळ कां वाटतात ॽ ज.- टिळक पंचांग निघाल्यापासून 14 जानेवारीला संक्रांत येते, असा नेम राहिला नाही. लोक मात्र 14 जानेवारी पाळतात. स्वदेशी पंचांगांपेक्षा विलायती खगोलशास्त्रज्ञांचे --- बिनचूक असतात म्हणून, पंचांगवाले आपल्या ग्रह--- जुळवाजुळव तशी करून घेत असल्यास नकळे मला ---- अवगत नाही. तीळगूळ कां वाटतातॽ वाटून तर पहा --- होईल. स.- जगातील पहिली परिचारिका कोण ॽ ज.- फ्लोरेन्स नाइटिंगेल. नामदेव लक्ष्मण चवथे, भोजे. पो. पिंपळगांव (हरेश--- स.- स्वर्ग मोक्ष पुण्य यांबद्दल लोकांना जसा --- चिकटा असतो, तसा शेजा-याशी वागताना कां नसतोॽ ज.- स्वर्गात मोफत दारू मिळते, शेजारी कोय देणारॽ स.- इतराना सदाचाराची पुराणे सांगणारे संत महंत --- तसे कां वागत नाहीतॽ ज.- तो त्यांचा एक व्यापार असतो. हलवायाला --- दुकानातली पेढा बर्फी गोड लागत नाही. ती इतरांसाठी --- स.- उठल्यासुटल्या संस्कृतीची पुराणे झोडणारे लोक आजकाल बरेच दिसतात. त्यांच्या संस्कृतीने बहुजन समाजांचा --- फायदा होणार आहेॽ ज.- बहुजन समाज त्यांच्या भजनी लागलेला राहील. --- बनणार गाढवे आणि संस्कृतीवाले त्यांचे स्वार. विल्हाळे पो. वरणगांव येथील शेतकरी. .... पत्रावर कोणीतरी सही करणे जरूर असते. तुमची ---- नीट लिहून बातमीदाराकडे पाठवा. विश्वासराव त्र्यंबकराव पाटील, गणपूर. स.- कीर्तनाला रंग येतो तो वक्तृत्वामुळे का ---- भावनेमुळे ॽ ज.- दोहोचीहि छान फोडणी पडली तर. स.- जगात खरा धर्म कोणताॽ ज.- ज्याच्या त्याच्या पोटाचा. विठोबा खोटा. पोटोबा --- वासुदेव एस. राणे. रुइखेडे, पो. ऄदलाबाद स.- लग्नामध्ये ज्वारीचे दाणे पिवळे करून वधुवर फेकतात, कशासाठीॽ ज.- लेका, शुद्धीवर आहेस नाॽ कसली धोंड गळ्यात बांधून घेत आहेस ते समजत आहे नाॽ अशी सूचना देण्यासाठी असेल. स.- साक्षरता प्रसारासाठी रात्रीच्या शाळा काढल्या---- काही ठिकाणी अडाणी निरक्षर येतच नाहीत. त्यांचे मन वळवण्यासाठी काय करावेॽ ज.- हेहि ज्याला अवगत नसेल, त्याने त्या प्रसाराच्या फंदातच पडू नये.