वाचकांचे पार्लमेण्ट: Page 73 of 74

पिढीच्या मनाला आयतखाऊपणाची कीड लागत गेली, तर त्याबद्दल बोंबलायचे कोणाच्या नावाने\ शब्दकोड्यांचा काही संभावीत वृत्तपत्रानी चालविलेला जुगार मुंबई सरकारला न दिसण्याजितके आंधळे ते खास नाही. पण जसा माणसाला स्वार्थ, तसा तो सरकारलाहि आहेच आहे. शटू कोड्यांच्या व्यापारांत जसा त्या वृत्तपत्रांच्या मालकांचा खिसा गडगंज भरतो, तसा कराच्या रुपाने सरकारच्या तिजोरीलाहि धन लाभ होतो. एकीकडे लोकांच्या नीतिमत्तेच्या सुधारणेच्या बढाया मारायच्या आणि दुसरीककडे शब्दकोड्यांसारखे जुगार सर्रास चालू द्यायचे, असा हो साट्यालोट्याचा धंदा आहे. स.- आजचे बहुसंख्य तरुण तरुणी चित्रपटसृष्टीकडे कां आकर्षिले जात आहेतॽ ज.- तेथे काही आकर्षण असते म्हणून. साधा प्रश्न आहे हा. स.- वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असलेल्या राशिभविष्यांपासून लोकांच्या मनांवर काय परिणाम होतातॽ ज.- ते खुळे होतात. हासुद्धा एक दैवाशी जुगार खेळण्याचाच घाणेरडा फंद आहे. तुर्कस्तानच्या आतातुर्क केगालपाशाने ज्योतिष्याला सबंध तुर्कस्तानात कायदेशीर बंदी घातल्यापासून, तेथल्या जनतेला माणुसकीचा प्रकाश दिसत असतो. देव आणि दैव मानवी समाजाचे दोन महारोग आहेत. एम. के. पाटील, भादली बु।। स.- पांडुरंग हा हिंदुधर्मीय देव नसून तो बौद्धीय आहे, असे डॉ. आंबेडकर म्हणतात. खरे कायॽ ज.- हा काही नवीन शोध नाही. त्या मुर्तीच्या घडणीवरून हा सिद्धान्त अनेकांनी काढलेला आहे. हिंदु काय किंवा बौद्ध काय, तो एक घडीव धोंडा आहे आणि लक्षावधि धोंडे त्याचे देवपण माजवीत आहेत. स.- डॉ. आंबेडकरांनी बौद्धधर्म स्वीकारण्यात अस्पृश्यांचा काय फायदाॽ ज.- फायदा असो वा नसो, ज्या हिंदु धर्मात अस्पृश्यांच्या शेकडो पिढ्या गेल्या, तो हिंदुधर्म नादान, बेमाणुसकीचा आणि राक्षसी आहे हे तरी जगाला ओरडून सांगता येईल ना\ तेच त्यांना करायचे आहे आणि ते त्यांनी अगत्य करावे. सोमा चावदस चौधरी, कांडवेल, ता. रावेर. स.- दुहीमुळे कंस यादव रजपूत घराणी लयाला गेली, तरीहि कुटुंबात समाजात दुही कां माजतेॽ ज.- द्रोह द्वेष दुही दुर्गुण असले तरी इतर सदगुणांबरोबरच ते प्रत्येक प्राण्यात असणारच. अगदी सत्वगुणी माणूस अथवा समाज असूच शकत नाही. जीवनधारणेसाठी सात्विक गुणाबरोबरच काम क्रोध लोभ मोहादि विकारांचीहि आवश्यकता असतेच. स.- तमाशात अश्लिलता असते म्हणतात तर राजेरजवाडे तमाशाना आश्रय नि प्रोत्साहन कां देत होतेॽ ज.- कुत्र्याला आधी वेडा ठरवायचा नि मग गोळी घालायची, अशी इंग्रेजीत एक म्हण आहे. तोच प्रकार तमाशाच्या बाबतीत सध्याच्या स्वदेशी लोकशाही सरकारने चालवला आहे. करून करून भागलेल्या आणि काँग्रेजी शिक्क्याने देवपुजेला लागलेल्या ब-याचशा रसहीन (प्युरिटेनिक) गब्रूनी हे अश्लीलतेचे थोतांड फार गाजवलेले आहे. तमाशाच्या सुधारणेसाठी कमिटी नेमली. त्याचे अध्यक्ष कोणॽ तर म्हणे कट्टर बालब्रह्मचारी महामहोपाध्याय दत्तोपंत पोतदार! अश्लीलता नाही कोठेॽ माणसाचा जन्मच मुळी अश्लीलतेच्या पोटी. साध्या भाषणातही चारपाच अश्लील शब्द सहज येतात. त्यांचा शब्दशः अर्थ घेऊ म्हटले तर टाकळी फुटायची. श्रृंगाराचे वावडे असणारांना शील अश्लीलतेचे कोडे उमगणार कशानेॽ स.- तुकाराम येशू फुले गांधी इत्यादि जनसेवक संत महात्म्यांवर अखेर दुष्टांच्या हातूनच मरण कां यावे\ ज.- तसल्या मरणातच त्यांचे माहात्म्य असते. मुरलीधर तुका महाजन भादली बु।। स.- नाटक हा समाजाचा आरसा कसाॽ ज.- पाहिल्या शिवाय कळणार कसाॽ स.- लव्हाळ्या (प्रेमाळू) कादंब-या लिहिणारे लेखक स्वतःच्या अनुभवाची चित्रे रंगवतात, का पैशासाठी तसे लिहितातॽ ज.- मी कादंबरीकार नसल्यामुळे, त्या लोकांच्या आतल्या बाहेरच्या भानगडी समजू शकत नाही. स.- बुरख्याची पद्धत योग्य आहे कायॽ ज.- काही बायकांचे चेहरेमोहोरे पाहिले म्हणजे त्यांनी बुरखा घेतलेलाच बरा, असे वाटू लागते. जगन्नाथ नामदेव चौधरी मु. भादली बु.।। स.- समोर धान्य दिसत असूनहि महाराष्ट्रात दुष्काळ कां भासत असावाॽ ज.- दुष्काळॽ महाराष्ट्रातॽ आजॽ कोणी सांगितलेॽ काही खेड्यात निमदुष्काळी परिस्थिति असली तरी त्यांना पोटभर पोसण्या इतकी हिंमत भारतताने आज कमावलेली आहे डोळ्यांवरचा निराशावादी चष्मा दूर करा राव. स.- स्वतंत्र बुद्धीची नि विचारांची