वाचकांचे पार्लमेण्ट: Page 8 of 74

विद्वान डाक्टराकडेच आपल्या केसीं नेल्या पाहिजेत. आत्माराम उखर्डू खंगार, लोहारी बु।। स०- यच्चायावत एकूणेक ---- समान संपत्तीचा वाटेकरी होऊ शकेल काय? परिणाम काय होईल? ज०- अशक्य समजा, अशक्य शक्य झालेच तर मानवी जीवनात काही अर्थच उरणार नाही. घनजी रावजी पाटील, लोहारी बु।। स०- हल्लीच्या परिस्थितीत (काही ---- का होई ना) कोठे कोणी गुलाम आहेत का? असल्यास ते कोणते? ज०- हिंदुस्थानातले सगळे नाक्षर आणि अल्पशिक्षित लोक आहेत. शारिरीक गुलामगिरीपेक्षा मानसिक गुलामगिरी फार भयंकर. स०- इंग्रेजी नि हिन्दी या दोहोंपैकी अधिक हितकर शिक्षण कोणत्या भाषेचे? ज०- अलबत इंग्रजी भाषेचे. इंग्रेजीच्या तुलनेने हिंदी दर्यामे ---- आहे. इंग्रेजीमुळें मनुष्य सर्व जगातल्या आधुनिक ज्ञानाचा आस्वाद घेऊ शकतो. इंग्रेजीला वगळून केवळ हिंदीच – मंडळी थोड्याच दिवसांत डबक्यातले बेडुंक बनतील. मुखत्यारसिंग देवसिंग पाटील, सारगांव ता. जामनेर. ‘सावधता’ प्रकरण हा शब्द चुकीचा आहे. ‘------’ असा तो हवा. इशारतीचे बोलता नये, जि० ओवीचा अर्थ स्पष्ट--- आणखी स्पष्ट तो काय करायचा? मनोहर उर्फ लक्ष्मण सपकाळे, सावदा. स०- सोशालिस्टांना दारुबंदी कां नको? ज०- सोशालिस्टानाच कशाला? कोणालाहि विचारवंतांना ----- नको. दारूबंदीच्या कायदेबाजीमुळे दारूचे व्यसन --- पूर्वी पीत नव्हते ते पीत आहेत. हातभट्टीच्या घरगुती दारूगाळणीला ऊत आला आहे. ही परिस्थिती बरी, का पूर्वीची बरी, हा विचार हितचिन्तकांना बेचैन करीत आहे. शिवाय, अनेकमुखी गुन्हेगारीला चेव चढला आहे. त्याचे मूळहि या मूर्खपणाच्या दारूबंदीतच आहे. स०- वाटेल त्याने राष्ट्रध्वज मोटारीवर किंवा कोठेंही वापरू नयें – सरकारी दण्डक असता, पु.--. चे एक पुढारी काँग्रेसवाले ---- वापरून प्रचार करीत होते. त्यांना कोणी हटक्ता दटक्ता नाहीं काय? ज०- काँग्रेसवाल्यांना सगळे खून माफ आहेत. स. पु. मोहिते, कोल्हापूर. स०- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर ------ काढणार असलेल्या बोलपटाविषयी आपला अंदाज काय आहे? ज०- मोठा गडबडाट झाला का पाऊस हमखास पडणार हा वाडवडलांचा इषारा लक्षात ठेवावा. भालजींच्या नियोजित बालपटात असे काही दिसणार नाही. तुकारामाला पाठवलेल्या आहेराची आणि दासाच्या राजकारणी शिकवणीची ---- कथा त्यात येणार---- नवीन इतिहास संशोधनाचे सिद्धांत भालजी आपल्या बोलपटात --- तर त्यांचा बोलपट ------------- ठरणार नाही, हे न समजण्याइतके भालजी महाशय बिनडोके नाहीत. ------ऐतिहासिक बोलपट काढण्याचा --- अजून इकडे उगवलेला नाही. मुरलीधर रोघो वायकोळे, फैजपूर. स०- काँग्रेसशिवाय इतर कोणत्याहि पक्षाला सरकार चालविण्याची ताकद नाही, या काँग्रेसवाद्यांच्या विधानात कितपत सत्य आहे? --- पक्षातले लोक तरूण म्हणून अनुभवशून्य, हा त्यांचा दावा खरा आहे--- ज०- काँग्रेसपार्टीच्या ---शिवाय सरकार चालवायला इतर ---- नसतील, तर धिःकार असो आमच्या त्या स्वातंत्र्याला स्वराज्याचा ------- शहामतीला! जर्मनीत नाझी पक्षाचे एकपार्टी सरकार --- करण्यासाठी हिटलरने असलाच दावा जर्मन जनतेपुढे मांडला होता. --- भविष्य काँग्रेसपार्टीच्या नव्या एकमुखी सरकारच्या कपाळी लिहिलेले – सगळ्यांच्या प्रत्ययाला येणार आहे. धोंडू तूकाराम पाटील, म्हसावद. स०- काँग्रेस सरकारने दारूबंदी केल्यामुळे नवरे आता --- बायकांना मारीत नाहीत? या काकासाहेब गाडगीळांच्या ---- घ्यायचा? दारूबंदी नाही त्या प्रांतात दारूडे नवरे बायकांना मारीत ---- असेच काकांना सुचवायचे असेल? ज०- काँग्रेसवाद्यांच्या तोंडातून काय बाहेर पडेल, याचा गावगटारानाहि --- लागणार नाही, मग बिचा-या मानवाची कथा काय? मोकाट ---- काँग्रेस पार्टीने आजवर जनतेच्या पदरात काय टाकले? --राम मोतीराम पाटील, भादली बु. स०- --- काळी भरपूर पैशाशिवाय सुख असणार नाही, असे --- पैसे मिळण्याची गुरुकिल्ली कोणती? ज०- आपण सुखाची व्याख्या काय केली आहे? पैशाच्या मुबलक --- डोलारा उभा असता, तर सारे श्रीमंतही सुखासाठी कशाला ---- सुख वगैरे शब्द नुसते शब्द आहेत. स०- या कलियुगात माणसाचे आयुष्य कमी झाले काय? या युगातला अवतार कोणता नि तो कितवा? ज०- कलियुगाचा आरंभ होऊन अवघी पाच वर्ष झाली. आयुष्य कमी