कोदण्डाचा टणत्कार: Page 8 of 71

आहे. चांद्रश्रेणी सोडून या लोकांची वस्ती पुढे काय देशात उर्फ अयोध्या प्रांतात झाली, कोकणचे रहिवाशी जसे कोकणस्थ व देशावरचे देशस्थ तसेच काय देशाचे रहिवासी ते कायस्थ, हा सरळ अर्थ आहे. कोकणस्थ ब्राह्मण पुण्यांत राहू लागल्यामुळे त्यांना ‘पुणेकर’ हेही नाव लागू झाले आहे. (पूना ब्रॅमिन्स), म्हणजे ते कोकणस्थ नव्हते की काय ? त्याचप्रमाणे प्रभू लोक चांद्रश्रेणी सोडून काय देशांत आल्यावर ‘कायस्थ’ बनले, तरी ते ‘चांद्रश्रेणीय’ का राहू नयेत ? सारांश, चांद्रश्रेणीय कायस्थ हे दोन शब्द प्रभू लोकांच्या वसाहतीदर्शक स्थलवाचक शब्द आहेत. आतां राहिला ‘प्रभू’ शब्द, ‘प्रभू’ शब्दांत राजेपणा किंवा राज्यकर्तृत्व आहे आणि ते सिद्ध करणारे ऐतिहासीक पुरावे रगड आहेत. ते यथाक्रम पुढे येतीलच, कायस्थ प्रभू ही एक पोलीटिकल ट्राईब-राजकारणपटू जाती आहे. ती चातुर्वर्ण्याच्या किंवा चतुर्वर्गाच्या कोणत्या दालनांत शोभते हे ठरविण्याचा अधिकार कोणालाच नाही. * (* “.....अशा स्थितीत कायस्थप्रभूंच्याच क्षत्रियत्वासंबंधाने हा आक्षेप आणणे, आणि त्याला चित्पावनंसारख्या संशयित व वादग्रस्त उत्पत्ति असलेल्या आणि त्यामुळेच यांची राजकीय उन्नति होईपर्यंत इतर ब्राह्मण वर्गांनी कमी दर्जाच्या मानलेल्या – पोटब्राह्मण जातीने महत्त्व देणे, बरेच चमत्कारिक दिसते.” टणत्कार परीक्षण. वि. ज्ञा. विस्तार पृ. १५६ एप्रिल १९१९) श्री. माधवराव लेले, बी. ए. बी. एस. सी.) या जातीने कलम-समशेरीचा प्रभाव अत्यंत स्पृहणीय सव्यसाचीत्वाने आजपर्यंत गाजवून हिंदु समाजांत योग्य तो दर्जा पटकविलाच आहे. तो दर्जा कवडीमोल ठरविण्याच्या कामी राजवाड्यांचा वेदोक्त-पुरणोक्त, समंत्रक अमंत्रक किंवा अनुलोम-प्रतिलोम वाद फुकट आहे, कायस्थ प्रभू क्षत्रिय की शूद्र, शुद्ध रक्ताचे की अकरमासे हे ठरविण्याचा अधिकार ब्राह्मणांना व या चित्पावनांना दिला कोणी ? आजचे कायस्थ प्रभू स्वयंनिर्णयी आहेत, त्यांच्यापुढे राजवाडे किंवा भारत-इतिहास-संशोधक मंडळ कोणत्या झाडाचा पाला ? विद्वान असाल तर स्वतःच्या घरी दहाच्या ऐवजी पन्नास भाकरी खा. कायस्थांच्या किंवा कोणाहि इतर जातीच्या कुचाळ्या करण्याची तुम्हाला जरूरी नाही. ज्या ज्या क्षेत्रांत कायस्थांशी दोन हात करण्याची तुम्हांला खुमखूम असेल, तेथे तेथे खुशाल दाना दुष्मन प्रमाणे येऊन उभे रहा. आम्ही कायस्थ प्रभू तुम्हालाचसे काय, तुमच्या सर्व वंशजांनाहि पुरून उरू. यहुदी तर यहुदी आणि प्रत्येक खटल्यात वादी ! अव्यापारेषु व्यापार करण्यात राजवाडे आणि त्यांचे मंडळ यांनी मिळविलेला लौकीक आता तरी अखिल महाराष्ट्राच्या पूर्ण माहितीचा झालेला आहे. संशोधनाच्या सबबीवर एक जीर्ण पातडें छापतात काय, त्यावर मल्लीनाथी करतात काय आणि प्रत्यक्ष मजकुराचे क्षेत्र सोडून, कायस्थ प्रभूंच्या सर्वच इतिहासावर एखाद्या माथेफिरूप्रमाणे भरंसाट आग पाखडतात काय ! विशेष आश्चर्याची स्पष्ट हीच की राजवाड्यासारख्या एककल्ली माणसाने काहीहि भरमंसाट पिसाट खरडले तरी मंडळासारखी जबाबदार संस्था ते बिनदिक्कत छापून प्रसिद्ध करते. या पुस्तकाची १ ली आवृत्ति निघून ६ वर्षे झाली. इतक्या वर्षांनी जरी कोणी राजवाड्यांचा मूळ निबंध वाचला, तरी त्यातल्या बेजबाबदार विचारसरणीची, कायस्थ ज्ञातीवर झुगारलेल्या अपमानास्पद क्षुद्र विधानांची व बिनबुडाच्या भयंकर आरोपांची नांगी त्याला पूर्वीपेक्षांहि अधिक तीव्रतेने दंश केल्याशिवाय राहणार नाही. आजचे कायस्थ समंत्रक अमंत्रक पुण्याहवाचनावर किंवा वेदोक्त पुराणोक्तावर रुसले नाहीत. त्यांना त्यांची फुटक्या कवडीचीहि किंमत वाटत नाही. या बहुमोल मालाची वखार मंडळाला खुशाला आमरण बहाल असो. परंतु धर्माधिकारांची चर्चा करतां करतां राजवाड्यांनी म्हणजेच मंडळाने इतिहासदृष्ट्या कायस्थ प्रभू समाजावर जे घाणेरडे आरोप करण्याचे धाडस केले आहे, त्याला कायमचे सणसणीत प्रत्युत्तर देऊन, मंडळाचा पाजीपणा जनतेच्या व सरकारच्या नजरेला आणून देणे आमचे कर्तव्य आहे. पिसाळलेले कुत्रे एकाला चावले की पुढे शेकडो जणांना डसल्याशिवाय रहात नाही. त्याची कवडी फोडून त्याला मोक्षच द्यावा लागतो. धर्मदीपाची लावणी लावता लावता कायस्थांच्या सर्व इतिहासाला काळे फासण्याचे कारण राजवाडे देतात की, ‘‘वाद (?) वरवर उपचार करून मिटण्यासारखा नाही. त्यांच्या मुळाशीच हात घातला पाहिजे’’ गोष्ट खरी. आजपर्यंत भिक्षुकशाहीने प्रत्येक ब्राह्मणेतर