कोदण्डाचा टणत्कार: Page 5 of 71

बिनमोल शोधांचे वाण राजवाड्यांच्या पदरांत टाकतील ते नीट समजेल. चित्पावनांना कसे बसे ‘क्षितिपावन’ बनविणे, ही मयत पेशवाई नोकरशाहीची अपुरी राहिलेली इच्छा श्री. राजवाडे किंवा त्यांचे भगत पूर्ण करतील तरच शतसांवत्सरिक श्राद्धाचे पिंड परलोकवासी पेशव्यांना रुचतील व पचतील, कायस्थ प्रभूंच्या मुळाशी हात घालून काय फायदा ? दुस-याची कुचेष्टा केल्याशिवाय आपली प्रतिष्ठा वाढत नाही, एवढ्याच उद्देशाने त्यांनी आपल्या दिव्य समाजशास्त्राच्या भट्टीत कायस्थ प्रभूंचा उपलब्ध इतिहास जाळण्याचा उपक्रम केला असेल तर त्यांनी खुशाल आपला हा क्रम आणखीही असाच पुढे चालू ठेवावा.

कायस्थ प्रभूंचा कोणताहि इतिहास त्यांच्या भट्टीच्या पचनी पडण्याइतका कमकुवत किंवा निःसत्व झालेला नाही. पोथींचे पुराण सातारी गळाठ्यात राजवाड्यांना जी पोथी सापडली तिची लांबी, रुंदी, पृष्ठसंख्या वगैरे माहिती मंडळाच्या रिवाजानुसार देताना अशी विधाने केली आहेत – १) एकंदर पाने ५० पैकी २८ पासन ५० पर्यंत कसरीनी पोखरून टाकलेली आहेत. २) छत्रपतींच्या ग्रंथालयांत न्यायाधीश व पंडितराव या पोथींचा उपयोग करीत. (कशावरून ? राजवाडे म्हणतात म्हणून) ३) कायस्थांचे धर्म, आचार, संस्कार शिवाजीच्या काळी बाळाजी आवजीच्या संमतीने गागाभट्टाने ठरवून दिले, ते या पोथीत आहेत. (राजवाड्यांच्या तर्काप्रमाणे स्वतःच्या जातीला नीच शूद्रत्वाची सनद गागाभट्टाकडून घेणारा बाळाजी तरी पागल असला पाहिजे किंवा हा विद्यमान तार्कीक गंजड असला पाहिजे, या शिवाय तिसरे अनुमानच निघत नाही.) तेव्हां आता कायस्थांच्या आचारासंबंधाने संशयाला व वादाला बिलकूल अवकाश राहिलेला नाही. ‘‘हा अखेर निर्णय राजवाड्यांनी एखाद्या शालजोड्या धर्ममार्तंडाच्या अवसानांत झोकून दिला आहे. अर्ध्या अधिक कसरीने खाऊन फस्त केलेले हे राजवाडी पातडे म्हणजे काय ? तर शिवराजप्रशस्ति व कायस्थ धर्मदीप. केवढा अचाट हा शोध ! जणू काय मोठा दुष्प्राप्य वेदच हुडकून काढला ? कायस्थधर्मदीप हा ग्रंथ सन १८७२ सालीच मुंबईच्या ‘जगदीश्वर’ शिळाप्रेसांत छापून प्रसिद्ध झाला होता, त्याच्या हजारो प्रति भटांच्या घरोघरी अजूनहि सापडतात. एवढ्यासाठी सातारी गळाठ्यांचा उकीरडाच फुंकण्याचे काही प्रयोजन नव्हते. किंवा पूर्व हा ग्रंथ प्रसिद्ध झाला तेव्हा कायस्थ प्रभूंच्या सामाजीक व धार्मिक अधिकारांबद्दल कोणी शहाण्याने एवढे चित्पावनी आकांड तांडवहि केले नव्हते. परंतु इतिहासाचे संशोधन करणारा बृहस्पति काय तो मीच आणि मी छापून प्रसिद्ध केल्याशिवाय जुन्या गळाठ्यांना जीर्णोद्धार किंवा धार्मिक वादविवादांचा अखेर निर्णय कधि लागणेच शक्य नाही. हीच ज्यांची घमेंड, त्यांनी इतर ठिकाणी कोणकोणते जुने पुराणे ग्रंथ छापून प्रसिद्ध होत आहेत किंवा झाले आहेत याची पर्वा का करावी ? ‘कायस्थ धर्मदीप’ हे नावच पाहून राजवाडे समाधीसुखांत गाढ झाले. शिवकालापासून ब्राह्मणांना पुरून उरणा-या आणि भटी पेशव्यांच्याहि चित्पावनी काव्याला वरचेवर फूटबॉली टाचा हाणणा-या कायस्थप्रभूंचा एकदा झणझणीत पाणउतारा करण्याची त्यांच्या आंगात विलक्षण शिरशिरी भरली. कायस्थांचे वाटोळे होण्याचा प्रत्येक प्रसंग म्हणजे पुणेरी चित्पावनांना अझूनहि पुत्रजन्मोत्सव वाटत असतो ! अर्थात या विशिष्ट ग्रहांची कावीळ फुटलेल्या राजवाड्यांच्या डोळ्यांना – ‘‘आदौ अस्मिन्ग्रंथे संकरज कायस्थानां धर्मकर्माण्युच्यन्ते । चित्रगुप्तचांद्रसेनीय कायस्थयोश्च धर्मकर्माणि कायस्थप्रदीप ग्रंथे वक्ष्यामि ।।’’ (अर्थ – प्रथमतः या (कायस्थ धर्मदीप) ग्रंथात संकरज कायस्थांच्या धर्मकर्मांचे कथन करितो. पुढे ‘कायस्थ प्रदीप’ नामक ग्रंथात चित्रगुप्त आणि चांद्रसेनीय कायस्थांची धर्मकर्मादि यांचे वर्णन देईन) हा स्पष्ट स्पष्ट असलेला उल्लेख दिसेल कशाला ? जो ग्रंथ वास्तवीक मूळ संकरज कायस्थांकरितां लिहिलेला, तो दिला भिरकावून या शहाण्या समाजशास्त्राने चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंच्या मुस्कटावर ! इतिहास संशोधनाच्या किंवा समाजशास्त्राच्या दृष्टीने हे किती नीचपणाचे धाडस आहे, याचा निःपक्षपाती सज्जनांनीच विचार करावा. कायस्थ धर्मादीपची छापील प्रत सन १८७२ साली आणि कायस्थ धर्मादीपाची अस्सल प्रत सन १८८८ सालीच उपलब्ध झालेली आहे. कायस्थ-प्रभूंचे म्हणणे की गागाभट्टाने आमच्याकरितां प्रदीप लिहिला. पण येथे सुद्धा गागाभट्टाचा हलकपटणा सिद्ध होत आहे. ब्राह्मणेतरांच्या धर्माचरणांचा बरा वाईट निर्णय ब्राह्णणांनीच दिला पाहिजे. ही जी मानसिक गुलामगिरी अखिल