काळाचा काळ: Page 10 of 40

आलाय. कर्णपाल – तर काय चटदिशी तूं म्हातारी होशील, दासीची कुत्री बनशील, बाईचा बुवा होशील, काय होईल तरी काय? चंचला – माणूस जसजसं म्हातारं होत जातं, तसतसे त्याला तरुणपणाचे रंगढंग करण्याची तलफ जास्त येते. शोभतो का या वयात हा चारगटपणा? कर्णपाल – न शोभायला काय झालं? तारुण्याच्या घिसाडघाईत थातूरमातूर उरकलेले रंगढंग, प्रौढ वयाच्या अनुभवी अवसानात यथासांग वठवता येतात.? चंचला – वय गेली तरी नजर.... कर्णपाल – अजून जशीच्या तशी कायम आहे. आम्ही तुमच्याकडं निरखून कळवळ्यानं पाहती, पण राण्डेच्यानी, तुम्ही आमच्या डोळ्याला डोळासुद्धा मिळवीत नाही. बायकांच्या जातीला तरी असला अरसिकपणा शोभत नाही..... बरं ते जाऊ दे.... राजकुमाराची काही बातमी समजली आहे का तुला? चंचला – राजकुमाराची बातमी? राजकुमार कोण? बनबीर महाराजांना कधि झाला राजकुमार? तो तर विधूर. कर्णपाल – अग चंवढाळ सटवे, मला बनवतेस काय तू? राजकुमार उदयसिंहाची तुला काहीच माहिती नाही म्हणतेस? चंचला – उदयसिंह? सा-या रजपुतान्याभर सिंह, सिंग, पाल, बीर न् वीर बोकाळले आहेत. त्यांच्या उठाठेवी आम्हा बटकींना काय करायच्या? दिल्या दामाची न् सांगितल्या कामाची आम्ही माणसं. आम्हाला काय चाटायचं ते सिंह न् सिंग. आजीचा, आज कन्दाहारी अनार मदिरेच्या कोठाराच्या किल्ल्या हाती आल्या आहेत म्हणून मेजवानीच्या आधीच नैवेद्य केलेला दिसतो. (जाते.) कर्णपाल – (स्व.) या मिरकीच्या दासी मोठ्या फिरकीच्या असतात. कसा मला हिनं वरच्यावर उडवला हो. खोल विहिरीचं पाणी काढता येईल, पण तरुणींच्या मनाच्या बोकलावर नसुतं डोकावण्याची पंचाईत. (जातो.) अंक दुसरा ] [ प्रवेश २ रा स्थळ, स्थिति नि पात्रे : एकलिंगेश्वराच्या गाभा-यात कमल हात जोडून अश्रू ढाळीत आहे. बनबीर तिला हाका मारीत येतो. बनबीर – कमलदेवी, कमलदेवी, कमल..... कुठं गेली ही एकटीच. कमल – (गाभा-यातून बाहेर येत) कोण? बाबा? ही मी इथं आहे. बनबीर – (तिच्या डोळ्यांत आसवे पाहून) कमल, सा-या चितोडगडावर आनंदोत्सव चालू असता, तुझ्या डोळ्यांना पाणी? हव्या त्या वेळी आसवं गाळणं, हा तुझ्या करमणुकीचा खेळ तर नाही ना होऊन बसला? कमल – अश्रूंचा खेळ कधी कुणी खेळतं का बाबा? बनबीर – मग हा तुझा मूर्खपणा तरी होत असला पाहिजे. तुला माझं वाढतं ऐश्वर्य पाहवत नाही का? कमल – बाबा बाबा बाबा, किती अघोरी कल्पना केलीत ही. या कमलच्या मनाची अखेर हीच का पारख केलीत? बनबीर – मग तुझे डोळे पाण्यानी कां भरले आहेत? कमल – आनंदाचा दंहिवर आणि करुणेचा गहिवर, मनाच्या पाझरणीतूनं झिरपू लागला, म्हणजे या कमळाच्या पाकळ्या अशाच डबडबतात. बनबीर – आता तूं आनंदाच्या दंहिवरात आहेस, का....... कमल – करुणेच्या गंहिवरात आहे बाबा. राणी रूपमतीच्या वतीनं आपल्यापाशी मला एक याचना करायची आहे. बनबीर – श्रीमंतांच्या लाडक्या पोरी असल्याच भानगडी खेळवीत असतात. रूपमतीच्या वतीनं याचना. बहुतकरून ती आमच्या इच्छेचा मानभंग करणारीच असणार. बोला बोला, काय तुमची याचना आहे ती. कमल – परमारांशी घोर संग्राम करून आपण विजयी झाल्यामुळं, राणीच्या मनात आपल्याविषयी भयकंर धास्ती उत्पन्न झाली आहे. बनबीर – तशी ती दिल्लीपति हुमायुनाला नि त्याचा प्रतिस्पर्धी शेरशहालाहि झाली आहे. राणी रूपमतीला तसल्या धास्तीचा संबंध काय? कमल – बाबा, राणीच्या भावनांची आपल्याला नीटशी कल्पना नाही. आपण त्या पतिव्रतेच्या पाणिदानाचा आग्रह धरल्यामुळं, त्या अनाथ गायीनं कोणत्या दैवाची करुणा भाकावी? मेवाडच्या परमेश्वरानंच तिची लाज राखावी, म्हणून आपली ही लाडकी लेक आपले पाय धरीत आहे. बाबा, राणीच्या पुनर्विवाहाचा आपला हट्ट सोडून द्या. बनबीर – नाही, ते आम्हाला नाही खपणार. आमच्या इच्छेला नकार? कृतांत काळाची छाती नाही. कमल, परमारांच्या मोहिमेमुळं चितोड सोडून आम्हाला बाहेर जावं लागलं नसतं, तर रूपमतीच्या हेकेखोर नकाराला भीक न घालता,