हिंदू धर्माचे दिव्य: Page 9 of 30

प्रांतावर हल्ले करण्यास महंमदाच्या फौजा भडाभड रवाना होऊ लागल्या. लुटीचा मुबलक पैसा मिळू लागल्यामुळे त्यांया अनुयायांची संख्या कल्पनातीत वाढून त्यांच्यांत नवधर्माचे वारे बेफाम शिरले आणि धर्माच्या नावावर एक प्रकारचे नवीन राज्य स्थापन होऊन अखेर धर्मोपदेशक महंमद राजा बनला आतापर्यंत कोणत्याहि धर्माच्या कोणत्याहि प्रवर्तकाला जे कार्य – अर्थात विस्तृत धर्मप्रासाराचे कार्य – निव्वळ जिभेच्या टकळीने साध्य करता आले नाही, तेच कार्य महंमदाने तलवारीच्या पात्याच्या धमकीवर तेव्हाच घडवून आणले. परंतु नुसत्या तलवारीने इस्लाम धर्माची वृद्धि झाली असे नव्हे, तर इस्लामाच्या शिकवणीने मुसलमानांस तलवार गाजविण्याचे सामर्थ्य आले. त्यांची बुद्धिमत्ता विलक्षण तीव्र केली, हेहि विशेष लक्षात ठेवले पाहिजे. ज्या मक्केने त्याला इ.स.६२२ मध्ये हद्दपार केले, त्याच मक्का शहरावर इ.स.६३० साली महंमद आपल्या दहा हजार लष्करी अनुयायांसह चढाई करून आला. शहाराचा पाडाव करून काबाच्या मंदिरांतील मूर्तीचा विध्वंस करून आपल्या इस्लाम धर्माचा तेथे प्रचार चालू केला. अशा रीतीने लोकोत्तर पराक्रम गाजवून धर्म आणि राजकारण यांच्या संयोगाने रानटी अरबांचे एक मोठे सुविद्य व बलाढ्य राष्ट्र बनविणारा पैगंबर महंमद आपल्या इस्लाम धर्माचे अमर स्मारक मागे ठेवून सन ६३२ त शांत झाला. त्याच्या मत्यूनंतर केवळ ८० वर्षांच्या अवधीत त्याच्या अरब अनुयायांनी नुसते आरबस्तानच नव्हे, तर इराण, सिरिया, पश्चिम तुर्कस्तान, सिंध, इजिप्त आणि स्पेनचा दक्षिण भाग काबीज करून त्यावर आपली इस्लामी सत्ता प्रस्थापित केली. ते जेथे जेथे मुलूख काबीज करीत गेले, तेथल्या लोकांना तलवारीच्या पात्याच्या जोरावर आपल्या धर्मात खेचून घेतले, किंवा जेथे तलवारीची सक्ति आणि उपदेशाची युक्ति फोल ठरली तेथे जबरदस्त खंडणीच्या ठणठणीत दंडवसुलीवर त्या त्या लोकांची मृत्यूपासून मुक्ति केली. हिंदुस्थानात इस्लाम धर्माचा प्रचार कसा झाला आणि त्याच्या प्रवर्तकांच्या हालचालीचा हिंदुधर्मावर आणि हिंदु राज्यांवर काय परिणाम झाला, हे पाहण्यापूर्वी महंमदाच्या इस्लामी धर्माचा व्यावहारिकपणा आपण पृथक्करणासाठी घेतला पाहिजे. महंमदाने आपल्या धर्मप्रसाराच्या मिशनमध्ये जो एक प्रकारचा व्यावहारिकपणा (business tactics) बेमालूम रीतीने मिश्र केला; त्यावरूनच त्याच्या अचाट बुद्धीमत्तेची आणि तीक्ष्ण धोरणीपणाची खरीखुरी साक्ष पटते. महंमदाचा मुख्य हेतू हा होता की, जगातील निरनिराळ्या धर्मपंथांना अजीबात नष्ट करून त्यांना एक धर्म द्यावा आणि आपल्या स्वदेशबांधवास एक नीति आणि कायदा यांनी सुबुद्ध करून त्यांच्या भाग्योदयाची गुरूकिल्ली त्यांच्या हाती द्यावी. सर्वत्र ऐक्य, एका भगवांताचे भजन आणि अनेक धार्मिक बंडांची सोंगे ढोंगे यांचा नायनाट अशा त्रिदळी ध्येयाचा महंमदाचा हेतू होता. इतर धर्मप्रचारकांप्रमाणे तो जर नुसता उच्चतम धर्मरहस्याचे पोवाडे विश्वबंधुत्वाच्या ढोलकीवर गात बसला असता. तर हा त्याचा हेतू इतका सफल होता ना परंतु महंमदाच्या संबंधाने विशेष कुतूहल उत्पन्न करणारी गोष्ट म्हणजे त्याचा व्यावहारिकणा हा होय. या व्यावहारिकपणानेच त्याच्या हातून शुद्ध धर्मोपदेशाचे तुणतुणे हिसकावून घेऊन त्याला तरवार दिली. या व्यावहारिकपणानेच त्याच्या नवधर्माला असंख्य अनुयायी मिळून, त्या सर्वांना आपल्या आत्मोद्धाराचा मार्ग सापडला. महंमदाच्या अवतारापूर्वी रोमच्या बादशहाने क्रिस्ती धर्म स्वीकारला होता. त्यातहि पुनः अनेक पंथांची खिचडी आणि त्या खिचडीमुळे तंट्याभांडणांची गचडी हरहमेश चालूच होती. जुन्या यहुदी धर्मांतहि अनेक घोटाळे होतेच. या सर्व भानगडी मिटवून एका धर्माच्या छत्राखाली सर्वांचे ऐक्य घडवून आणण्याचे पुण्यकार्य करणारा एकटा महंमदच होय. ईश्वराच्या कार्यासाठी युद्धात जय मिळवावे, नाही तर त्याची थोरवी स्थापन करण्यासाठी आपले प्राण खर्ची घालावे, या उदात्त उपदेशाने महंमदाच्या अनुयायांत एक प्रकारच्या मर्दुमकीचा संचार झाला अरबस्तानातील लोकांची सामाजिक, राजकीय, औद्योगिक, शैक्षणिक आणि धार्मिक परिस्थिती अत्यंत निराशाजनक व भिकार असल्यामुळे, इस्लामी धर्माची दीक्षा घेताच पूर्वीच्या रानटी, बेशिस्त आणि अक्कलमंद अरब वीरांस, महंमदाच्या व्यावहारिकपणाच्या प्रत्यक्ष शिक्षणाने, आपले सर्व ऐहिक मनोरथ सहज त्याला प्राप्त करून घेता आले, आपखुशीने किंवा बळजबरीने वाटेल त्याला मुसलमानी धर्मांत येण्याचा राजमार्ग* खुला झाल्यामुळे इस्लाम धर्माच्या प्रसाराबरोबरच