हिंदू धर्माचे दिव्य: Page 8 of 30

उत्तर सीरियातून दक्षिण अरबस्तानांत पळून आलेल्या यहुदी लोकांनी या अरबात बरेच प्रचलित केले होते. यावरूनच इस्लामी धर्म म्हणजे यहुदी आणि क्रिस्ती धर्माची नवीन सुधारलेली आवृत्ती असे म्हणतात ते काही खोटे नाही. महंमद पैगंबर या लोकोत्तर महापुरुषाचे कूळ किंवा मूळ साधूंच्या आणि नदीच्या कुळामुळाप्रमाणे शोधीत बसण्यांत हांशील नाही. त्याची वृत्ति पहिल्यापासूनच चिंतनमग्न आणि शोधक असे. वयाच्या २५ व्या वर्षी सिरिया प्रांतांत त्याला येशू क्रिस्ताच्या धर्मांची काही माहिती झाली. परंतु त्यातील पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रयीचा घोटाळा काही त्याला मानवला नाही. आणि अखेरीस `देव एकच आहे’ हे तत्त्व त्याने आपले निश्चित ध्येय ठरवून एका नवीन धर्माचा प्रसार करण्याचा उपक्रम केला. नवीन मतप्रतिपादकांचा छळ न झाल्याचा दाखला जगाच्या इतिहासात नाही; मग महंमदच या नियमाला अपवाद कसा होईल? मक्केतील काबाच्या मंदिराचे धार्मिक रखवालदार खुरेश लोक यांनी त्याचा अत्यंत छळ केला; म्हणून त्याने इ.स. ६२२ मध्ये मदिनेस प्रयाण केले. तेथे त्याच्या अनुयायांची संख्या वाढली. तेथे त्याने एकेश्वर मताचा पुरस्कार करण्यासाठी `मशिद उल्नबी’ बांधली. परंतु जसजसे त्याला अधिकाधिक अनुयायी मिळू लागले तसतसा त्यांचा व खुद्द महंमदाचा खुरेश लोक अधिकाधिक छळ करू लागले. त्यावेळी महंमदाने जी युक्ति लढविली तीवरून त्याचा आत्यंतिक धोरणीपणा व्यक्त होतो. या युक्तीतच त्याच्या सा-या चरित्राचे बीज आणि डिप्लोमसीचे वर्म सापडते. एरवी, नुसत्या मुक्तीच्या किंवा पारलौकिक ऐश्वर्याच्या काल्पनिक गप्पावजा आश्वासनांवर एखाद्या नव्या किंवा जुन्या धर्माचा इतका अल्पावकाशात एवढा अतिविस्तृत प्रसार होणे कधीहि शक्य नाही. नुसत्या प्रेषितांच्या किंवा पैगंबरांच्या व्याख्यानांनी पारलौकिक सुखाच्या आशेने चैतन्यपूर्ण होऊन जाण्याइतकी जर ही मानवी दुनिया ग्रहणक्षम (susceptible) बनलेली असती, तर प्रेषितांना आणि पैगंबरांना जन्मश्रेणींच्या चक्रावर फिरवून व्याख्याने देवविण्याची देवालाहि जरूर पडली नसती. मानव प्राणी कितीही विचारक्षम आणि सुशिक्षित झाले असले तरी त्याची मने जशी ऐहिक लभ्यांशाच्या गड्ड्याकडे चटकन वळतील. तशी ती पारलौकीक पारमेश्वरी ऐश्वर्याच्या नुसत्या कोरड्या गप्पांनी एकदम हुरळून जाऊन काही अद्वितीय क्रांति किंवा अद्भुत पराक्रम करावयास उद्युक्त होतील, हे शक्यच दिसत नाही. मग अरबलोक तर उघड उघड रानटीच होते. महंमदाच्या इस्लाम धर्माची मोहनी त्यांच्यावर पडली, त्यांना ईश्वरप्राप्तीचा खरा मार्ग सापडल्यामुळे ते आनंदाने बेहोष झाले आणि म्हणून इस्लाम धर्माचा प्रसार वावटळीच्या वा-याप्रमाणे सर्व आशियाखंडभर करण्याचे त्यांना सामर्थ्य आले, या विधानाची सयुक्तिकता केव्हाही कोणाला पटणार नाही. आतापर्यंत महंमद नुसता शांतमार्गी नवधर्मप्रसारक होता. त्याच्या प्रयत्नांच्या मानाने त्याला मिळालेले अनुयायी फारसे नव्हते आणि त्याचा छळही बराच होत होता. म्हणून त्याने आपली शुद्ध धार्मिक अशी प्रेषित-वृत्ति चटकन बाजूला ठेवली आणि एखाद्या साध्या प्रपंची महत्त्वाकांक्षी मनुष्याप्रमाणे एक ईश्वरी हुकुमाचा जाहीरनामा जाहीर केला. त्यात त्याने असा स्पष्ट खुलासा केला की, ``यापुढे मी सांगतो हा धर्म जे ऐकणार नाहीत, त्यास तरवारीने जिंकावे. लढाईत यश आल्यास शत्रूंची धनदौलत आपणांस मिळेल. बरे, मृत्यूच आला तर महत्पुण्य लागून स्वर्गाचा दरवाजा आपणास खुला होईल.’’ या जाहीरनाम्यामुळे महंमदाचा आजपर्यंतचा शांततेचा धार्मिक बाणा जाऊन त्याचे पर्यवसान खाडकन शुद्ध लौकिकी अशा लष्करी बाण्यात झाले. कालचा मोक्षदाता महंमद आज राज्ये कमविणारा शूर योद्धा बनला. लष्करी बाण्याचा अशा रीतीने पुकारा होताच रानटी अरबांना आयताच चेव आला. राज्यपदप्राप्तीची आशा, लुटीचा लोभ, कीर्तीची आकांक्षा आणि एवढे सगळे केल्यावर अखेर स्वर्गीय सौख्याची गॅरन्टी यामुळे हां हां म्हणता महंमदाभोवती त्याच्या इस्लामी धर्माची दीक्षा घेतलेले लष्करी बाण्याचे हजारो लोक आपापल्या शस्त्रास्त्रांसह भराभर जमा झाले. लष्करी सामर्थ्य प्राप्त होताच नवधर्मप्रसाराकरितां तुंबल युद्धे होऊ लागली आणि महंमद विजयी होत गेला. लढाईत मिळालेली लूट सर्वांनी सारखी वाटून घ्यावी असा आणखी एक ईश्वरी जाहीरनामा प्रसिद्ध करून त्याने आपल्या अनुयायांची भक्ति संपादन केली. नंतर मदिनेतून शेजारच्या