हिंदू धर्माचे दिव्य: Page 7 of 30

आणि अल्पावकाशात त्याच्या धर्मानुयायांची झालेली भरभराट इत्यादि गोष्टी इतक्या चमत्कारपूर्ण आहेत की मानवी अंतःकरणाला आश्चर्याने थक्क करून सोडणारी यासारखी दुसरी हकीकत जगाच्या उपलब्ध इतिहासात दुसरी मिळणे शक्य नाही. एकट्या महंमदाच्या कर्तबगारीशिवाय बाहेरची कोणत्याहि प्रकारची चेतना किंवा कसलीहि मदत नसताना, केवळ ८० वर्षांच्या अवधीत सिंधूनदापासून पोर्तुगालपर्यंत आणि अरबी समुद्रापासून व्होल्गानदीपर्यंत एका एरबी दरिद्री कुटुंबातील मनुष्याने आपल्या नवीन धर्ममताचा प्रसार एकजात करण्यास समर्थ व्हावे, हा `न भूतो न भविष्यति’ असा चमत्कार कोणाच्या अंतःकरणात कौतुकाच्या ऊर्मी उठविणार नाही? स्वधर्माभिमानाच्या आवेशात महंमदानुयायी खुशाल वाटेल तर म्हणतो की इस्लाम धर्माच्या या तीव्रतम प्रसाराच्या मुळाशी महंमदाने आत्मचिंतनातून निर्माण केलेल्या `एको देवः’ या मुख्य तत्त्वाची प्रेरणा होती; परंतु धार्मिक भावनेच्या क्षेत्राबाहेर किंचित येऊन ऐतिहासिक आधाराच्या दुर्बिणीतून पाहू लागतांच हा निर्णय मूलतः चूक आहे, असेच दृष्टीस पडेल. `देव एक* आहे’ या सनातन तत्त्वाचा कर्णा ख्रिस्ती शकाच्या पूर्वी कमीतकमी आठ हजार वर्षे सनातन वैदिक धर्मानेच फुंकलेला आहे. (* ``…The creed of the man who is said to possess the true Veda is singularly simple. He believes in the unity of all beings. In other words, that there is but one real Being in the universe, which Being also constitutes the universe… This one Being is thought of as the Great Universal Spirit.’’ - Indian Wisdom – p. 36) सदेव सोम्येदमग्र आसीदेकमेवाद्वितीयम् । तद्वैक आहुरसदेवमग्र आसीदेकमेवाद्वितीयम् तम्मात्सतः सज्जायत ।।१।। छान्दोग्योपनिषद् अ. ६ खं. २ `एकमेवाद्वितीयम्’चे सनातन तत्त्व प्रथम ज्या उपनिषदांनी प्रगट केले त्यांचा काळ पाहिला (क्रि. श. पू. ५०० वर्षे) की यहुदी इस्लाम ख्रिस्ती इत्यादि धर्माच्या प्रचारकांनी अगदी अलीकडे त्याची मोठ्या चाणाक्षपणानें नक्कल करून आपापल्या धर्ममतांच्या द्वारे त्याची महती वाढविण्याचाचस्तुत्य उपक्रम केला असे म्हणणे प्राप्त होते. शहाजहान बादशहाचा पुत्र दाराशेखो यांनी जेव्हा उपनिषदांची पर्शियन भाषेत भाषांतरे करविली तेव्हाहि याच मताचा त्याने पुरस्कार केल्याचे इतिहासात नमूद आहे. हिंदुंच्या ज्या सनातन वैदिक धर्माने अत्यंत प्राचीन काळापासून मानवी सृष्टीच्या उच्च नीच प्रवृत्तीला पोषक अशा निरनिराळ्या सोईस्कर तत्त्वांचा मुबलक भरणा करून, क्रमाक्रमाने-आत्मसंस्कृतीच्या परिणतीच्या पायरीपायरीने – अखेर निर्गुण निराकार `एको देवः’ च्या सनातन सत्य तत्त्वाची खरीखुरी बिनचुक ओळख पटविण्याइतकी धोरणी उदारमनस्कता प्रगट केली; ज्या हिंदुधर्माने `नेचर-वर्शिप’ – निसर्गपूजनापासून तो तहत `एकमेवाद्वितीयम्’ पर्यंतच्या ईश्वरप्राप्तीच्या सर्व साधनांचा आपल्या तत्त्वपरिषदेत बिनतोड संग्रह केला, तोच हिंदुधर्म त्यातल्या अवघ्या एकाच तत्त्वाचा पुरस्कार करणा-या एखाद्या कालच्या नवीन धर्मपंथापुढे हां हां म्हणता चिरडून हतबल होईल, हे विधान सर्वसाधारण बुद्धीलासुद्धा कधी पटावयाचे नाही. इस्लाम धर्माचा अत्यंत अल्पावकाशांत इतका जबरदस्त फैलाव होण्यास निव्वळ धर्मतत्त्वापेक्षा महंमदाची आडाखेबाज धोरणी व्यावहारिक दृष्टी किंवा ज्याला आपण अलिकडच्या मनूंत `डिप्लोमसी’ असे म्हणतो. तीच विशेषतः कारणीभूत कशी झाली व ही डिप्लोमसी ६ व्या शतकांतील हिंदुधर्माच्या संकुचित मनोवृत्तीत्या प्रवर्तकांत अज्जीबात –हास पावलेली आढळल्यामुळेच महंमदाच्या चांदता-याचा सर्वग्रासी शह हिंदूंच्या स्वस्तिकाला बिनचूकमर्मी कसा लागला, हे पाहण्यासाठी इस्लाम धर्माच्या उत्पत्तिप्रसाराचा इतिहास आपणास प्रथम थोडक्यांत पाहिला पाहिजे. महंमद ज्या अरबसमाजात आहे. अवतीर्ण झाला. ते अरब लोक पूर्वी कट्टे मूर्तिपूजक होते. मक्का येथील सुप्रसिद्ध काबाच्या मंदिरांतील ३६० निरनिराळया मूर्तींची ते भक्तिभावाने पूजा अर्चा करीत असत. अरबस्तानाच्या सर्व भागांतून येथे मोठी यात्रा भरत असे. या अरबी लोकांशिवाय मूर्तिपूजकाचे अनेक दुसरे पंथ अरबस्थानात होतेच कित्येक अरब तिबेटांतील लामांच्या बौद्ध धर्माचे अनुयायी होते, तर पुष्कळांनी क्रिस्ती धर्माची दीक्षा घेऊन त्याचाहि थोडाबहुत प्रसार करता आपल्या देशबांधवात केलेला होता. फार काय पण ज्या एकेश्वरी मताचा पुरस्कार व प्रसार करण्याकरिता महंमदाचा मार्ग अवतार झाला असे त्याचे अनुयायी मानतात; ते एकेश्वरी मत, रोमन लोकांच्या छळांमुळे