हिंदू धर्माचे दिव्य: Page 3 of 30

व बोलणारे सत्त्वशील इतिहासभक्त आहेत, इतकेंच सांगून त्यांचा अन्तरात्मा ग्रंथांतच पहावा, असे म्हणावयाचे. ग्रंथ वाचीत असतां वाचकांना असें आढळेल कीं, अनेक भावनामय असा कोणी जीव आपल्याशीं बोलत आहे. तोच खरा तेजस्वी ग्रंथकार, ग्रंथकाराचे नाव किंवा ग्रंथकाराचे छायाचित्र हें ग्रंथकाराचें खरें स्वरूप नव्हे. रा. केशवराव ठाकरे ह्यांची तपश्चर्या मोठी दिसते. त्यांच्या भाषेसारखी जिवन्त भाषा वाचण्याचे प्रसंग थोडेच येतात.

प्रस्तुतचा ओजस्वी लेख वाचून माझ्याप्रमाणेच वाचकांसही वाटेल. मुलांनी व मुलींनी वाचावयाचे इतिहासग्रंथ जर अशा भाषेत लिहिले जातील तर इतिहासविषयाचें शिक्षण मनोरम व परिणामकारक होईल! हिन्दुधर्माला इतिहास आहे हें फार थोड्यांच्याच लक्षांत येतें. पुराणमतवाद असा आहे की, आम्ही अनादि कालापासून आहों तसेच आहों. प्रस्तुतचा लेख वाचीत असतां वाचकांना नवी दृष्टी येईल व ते नव्या दृष्टीने हिन्दुधर्माकडे पहावयास सिद्ध होतील. ग्रंथ, सिद्धान्त, आणि लोकसंग्रह असे तीन ओघ हिन्दुधर्माच्या इतिहासात आहे. ग्रंथ अनेक, ते एकाच दिवशीं प्रगट झाले नाहींत; सिद्धान्त हे एकाचीं अनेक रूपें, पण तीं प्रगट झालीं भिन्न भिन्न काळीं. हिन्दुलोक हे अनेक शतकांच्या हे अनेक शतकांच्या संग्रहाने झाले आहेत हे तीनही ओघ अनेक शतकें वहात आले आहेत. हिंदु धर्माचें दिव्य पण तिस-या ओघाला उच्चनीचता इतिहासांत फार आलेली दिसते. हिंदुजन ग्रंथांना जपतात; ते कांहींसे सिद्धांन्ताना जपतात. पण ते लोक संग्रहाचा विचार करीत नाहींत. लोकसंग्रहाच्या बाजूचा ओघ जर सुकून वाळून गेला तर दुसरे दोन असून नसून सारखेच. हा जो नवा मिशनरी भाव शिकावयाचा आहे त्याचे चार चांगले धडे केशवरावजींचा हा ग्रंथ शिकवील. `अनेक प्राणघातक दिव्यातून आज हिंदुधर्म पार पडलेला आहे’ (पृष्ठ ६) आताचा प्रसंग कठीण आहे. हा ग्रंथ वाचून हिंदुजनांच्या चित्ताला काहीसा सावधपणा येईल, असा मला भरवसा आहे. हिंदुस्थानातील मुसलमान म्हणविणा-या आमच्या देशबांधवांच्या संस्कृतीचा आत्मा आर्य आहे (पृष्ठे १८-१९) तसा आज असंख्य कुस्तीजनांच्या संस्कृतीचा आत्माही आर्य आहे. आम्ही हिंदुजनांनी दोघांनाही `या’ म्हणावे अशी भावना या ग्रंथाच्या वाचनाने जागृत होईल. समर्थांचे– पतित करावे पावन । हे वचन वाचून हिंदुजन लोकसंग्रहाचा विचार करू लागले तर त्याचे पुण्य केशवरावजींना लागेल.

हिंदुधर्माची दशा अशी कां, तो सोने असून मातीसारखा कां झाला आहे. याचे उत्तर इतिहास देईल (पृष्ठ ३०) हा भाग वाचीत असतां माझ्याप्रमाणेच वाचकांना थोडे थांबून विचार करावासा वाटेल. किती हिंदु मुसलमान होऊन मोठे राज्यकर्ते झाले तो इतिहास पृष्ठ ५० यावर वाचून लोकसंग्रहाच्या बाजूने विचार करण्याची बुद्धी हिंदुजनांना होईल व केशवरावजींची लेखणी यशस्वी होईल. प्रस्तुत ग्रंथाची भाषा जशी ओजस्वी तशी ती कलात्मक व भावोद्दीपक आहे, हे वाचकांनी पृष्ठे ६० ते ६५ वाचून स्वतःच्याच अनुभवाने पहावे. शिवबा ! जी. शिवबा, यात तू इतका गोंधळून का गेलास? हिंदु धर्माचें दिव्य आई काय करू? निंबाळकरांना प्रायश्चित्त देऊन हिंदु करून घे. असे विचार अनेक आयानीं अनेक मातांनी, अनेक जिजाबाईनी बोलून दाखवावे, व अनेक निंबाळकरांना पावन करून हिंदुधर्मात घ्यावे, असे त्यांनी आपल्या पुत्रांना सांगावे. इतकी विचार क्रांति प्रस्तुतच्या लेखासारखे लेख घडवून आणतील. हे पुण्यकार्य करण्यास रा. केशवराव ठाकरे पुष्कळ वर्षे जगोत श्रीकृष्णांचा आशीर्वाद असो. हा ग्रंथ वाचून लोकजागृति होवो. गजानन भास्कर वैद्य मुंबई, ऑक्टोबर २०, १९१९ ।। जय जय रघुवीर समर्थ ।। हिंदु धर्माचें दिव्य नवीन मन्वंतराचा उदय झाला आहे. जगांतील सर्व राष्ट्रांप्रमाणेच आमच्या प्या-या भरतखंडात नवजीवनाचे राष्ट्रीय तेज आसेतु हिमाचल नवीन पिढीच्या अंतःकरणात उसळ्या मारू लागले आहे. गेली दोन हजार वर्षे मेंढराप्रमाणे एकमार्गी संकुचित पुराणप्रियतेच्याच अभिमानात गर्क असलेली हिंदी जनता इंग्रजी विद्या-वाघिणीचे दूध पिऊन पिऊन आज केवळ वाघाचीच डुरकणी नव्हे, तर हिंदुस्थानच्या भवितव्यतेच्या आकाशात दणदणाट उडविणा-या प्रतिरोधाच्या मेघांच्या गर्जनांना आपल्या सिंहवत गर्जनांची उलट सलामी देण्यास तयार