हिंदू धर्माचे दिव्य: Page 15 of 30

हिंदू बनलेले, परंतु लोकलज्जेस्तव क्रिस्ती राहिलेले सुप्रसिद्ध विद्वान ख्रिस्ती पंडित मॉन्यर विल्यम्सने तर अशी चोख जबानी दिलेली आहे (पहा Introduction, pxxvii, Indian Wisdom) की, `या हिंदु धर्माचे स्वरूप अनंतवेषी आहे आणि यातील तत्त्वाची व्यापकता तर अद्वितीय आहे. (Multiform character and singular expansibility of the Hindu religious creed.) या वैदिक धर्मात इतर सर्व धर्मांतली तत्त्वे खच्चून भरलेली असून, ती मानवजातीतील हरएक प्रकारच्या मनोवृत्तीला रूचतील आमि पचतील अशीच आहेत. यात अद्वैतवाद, द्वैतवाद, ऐकेश्वरी, अनेकेश्वरी, फार काय नास्तिक मतसुद्धा झाडून सा-या मताचा बेमालून पुरस्कार करण्यात आलेला आहे.’ असा हा सर्वव्यापी हिंदुधर्म एकेश्वरी इस्लाम दिव्यातून पार पडतांना इतका बेजार कां झाला? आणि पिता पुत्र पवित्र आत्माच्या त्रिदळी तत्त्वाचा पुकारा करणा-या ख्रिस्ती धर्मापुढे हात का टेकू म्हणतो? *(* मागे एकदा मुंबई सुप्रसिद्ध नागरीक पुढारी सर मंगळदास नथुभाई K.S.I. यांना ख्रिस्ति होण्याचा एका पाद्री दलालाने यत्न चालविला असता शेटजी म्हणाले, ``अरे, आम्हा हिंदु लोकांना ख्रिस्ती होण्याची काही जरूर नाही आम्ही स्वभावताच ख्रिश्चन आहोत. तुमच्या बाप्तिस्माने अधिक काय होणार? पण बाबा ईश्वराने मोठी खैर केली की, तुम्हा इंग्रजांवर ख्रिस्ति धर्माच्या दीक्षेचा चाप पडला; नाही तर हा वेळ पावेतो तुम्ही सा-या जगाची हाडेहाडे की रे काढली असतीत.’’ (But I think god that you English were converted to Christianity, or you world by this time have eaten up the world to the bone.)) हा कोहिनूर काय गोवळकोंड्याच्या आईच्या श्रीमंतीची अब्रु घेणार? झाडावरच्या फळाच्या आघाताने काय बूळ झाडच कोसळून पडणार? नाही. असे, पूर्वी कधी झाले नाही. आणि पुढे होणेहि शक्य नाही, अशी इतिहास ठासून ग्वाही देतो मग हिंदुंचे आणि त्यांच्या सनातन हिंदुधर्माचे आज नाक खाली का? पूर्वी सा-या जगाला भारी झालेले हिंदु आज कोठे आहेत? का, हिंदुधर्माने आपल्या सर्वस्वाचे साम्राज्य पारलौकिक तत्त्वज्ञानातच कोंदणातल्या हि-याप्रमाणे मर्यादित केल्यामुळे तो आणि त्याचे अनुयायी ऐहिक बाबतीत नामर्द ठरले? काय, झाले तरी काय की इस्लामाची छातीठोक मुसंडी आणि क्रिस्त्यांची कावेबाज खुरमुंडी येताच हिंदुधर्मीयांना `दे माय धरणी ठाय’ होऊन जावे, त्यांचा राष्ट्रीय दर्जा वितळून जावा, त्यांना मानवी समाजात शेवटच्या नंबरावर बसणे प्राप्त व्हावे आणि गुलामगिरी पलीकडे त्यांना तरणोपायहि उरू नये? ही अशी क्रांति कशाने झाली? याचे उत्तरहि इतिहास देईल आमचा सनातन हिंदुधर्म आणि त्या धर्माचे प्रचारक यांचा पूर्वीपासून आतांपर्यंतचा इतिहास पाहिला, तर आमच्या हातात चिंतामणी असून आम्ही त्याचा नीट उपयोग केला नाही, असे म्हणणे प्राप्त होते. हिंदुधर्म हा सर्व आर्य मानवकुळाचा अत्यंत प्राचीन मूळधर्म असून, पूर्वी याच धर्माचे अनुयायी असलेले आर्यलोक आज सा-या जगभर पसरलेले आहेत. हे आर्यलोक इराणात गेले, तेथे त्यांनी झोरास्टरी धर्मशाखेला वाठविली. भूमध्य समुद्राच्या किना-यावरील प्रदेशांत त्यांनी वस्ती केली, तेव्हा तेथेहि ग्रीस आणि रोम या राष्ट्रांच्या प्राणप्रतिष्ठेबरोबरच हिंदु धर्माच्या नवीन आवृत्तीचे राष्ट्रीय धर्मपंथ स्थापन करून, लॅटिन भाषा बोलणा-या मानवांचा उद्धार केला. याच आर्यकुळीच्या वंशजांनी आपला विस्तार सा-या युरोपभर करून, जेथें जेथें ते गेले तेथे तेथे त्यांनी आपल्या प्राचीन हिंदुधर्मातील स्वातंत्र्याची कधीहि न मरणारी आवड आणि परिणत स्वराज्यवादाची तत्त्वे यांचा प्रसार केला. स्वीडन-नॉर्वे, इंग्लंड, जर्मनी आणि स्लाव लोकांचे प्रदेश येथेही याच आर्यलोकांमधील खेडवळांनी आपापल्या सर्व आर्यसंस्कृतीचा प्रसार केला. परंतु येथे एक गोष्ट मुख्यत्वेकरून लक्षात ठेवली पाहिजे की, अत्यंत प्राचीन काळी एकाच सनातन वैदिक धर्माचे अनुयायी असणा-या या आर्यकुळीच्या लेकरांनी सा-या जगभर जरी आर्यसंस्कृतीचा जबरदस्त फैलावा केला, तथापि त्यांनी प्रत्यक्ष आर्यधर्माला मात्र तिकडे नेले नाही. प्रत्यक्ष आर्यधर्म किंवा सनातन वैदिक धर्म जरी त्यांनी पुढे आपल्या आचरणांत आणला नाही, तरी त्यांनी वसाहतीच्या देशकालवर्तमानाप्रमाणे जो जो धर्मपंथ अस्तित्वांत आणला