हिंदू धर्माचे दिव्य: Page 11 of 30

आहे. मुसलमानी धर्मात सर्व वर्णांचे, सर्व जातींतले आणि सर्व राष्ट्रांतले लोक आहेत. त्यांना स्वधर्माचा मोठा योग्य अभिमान आहे. रानोमाळ भटकणा-या रानटी धनगरांना इस्लामाने राज्यपदास कसे चढविले, हजारों वर्षांच्या अंधःकारातून त्यांना बाहेर कसे आणले आणि धर्म व राजकारण यांच्या जोडगोळीने त्यांना सारे जग पादाक्रांत करण्याचे सामर्थ्य कसे दिले, याचा इतिहास नीट पाहिला की समर्थ रमादासांनी कंठशोष करकरून आपला महाराष्ट्रधर्म वाढवावा असा हा टाहो महाराष्ट्राच्या कानीकपाळी फोडला, त्याचा रहस्यार्थ अधिक विशद करून सांगण्याची आवश्यकता राहणार नाही. इस्लामी धर्मात अनेक दोष असूनसुद्धां त्याची एवढी मोठी भरभराट कशी झाली, याचे उत्तर त्या धर्माचा व्यावहारिक बाबींकडे असणारा धोरणी कल देऊ शकतो. वाटेल तिकडे भटकावे, वाटेल ते खावे प्यावे, त्यांस आपल्या धर्मात ओढून आणावे, परजातीच्या व परधर्मियांच्या स्त्रियांचा स्वीकार करून स्वधर्मी लोकांची संख्या वाढवावी. इत्यादी व्यावहारिक महत्त्वाचे अनेक प्रकार इस्लामी धर्माच्या इतिहासांत जागोजाग आढळतात. आज हिंदुस्थानातील मुसलमान समाजाचा पूर्वेतिहास पाहिला तर त्यांची सारी लोकसंख्या येथीलच लोकांनी धर्मांतर केल्यामुळे व बीजसंकराने झालेली आहे. अर्थात हिंदुस्थानातील मुसलमान म्हणविणा-या आमच्या देशबांधवांच्या संस्कृतीचा आत्मा आर्य आहे तुराणी नव्हे. या एकाच गोष्टीवरून मुसलमानी धर्माच्या सर्वव्यापक क्षेत्राचा विशालपणा उत्कृष्टपणे सिद्ध होतो. सर्व प्रकारच्या लोकांस आपल्या धर्मात ओढून घेऊन, धर्माच्या नावाखाली त्या सर्वांची एक जात किंवा संघ तयार करण्याचा अद्भुत गुण इस्लाम धर्मानेच शिकवावा. `आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा’ ही शब्दयोजना समर्थांनी का केली, याचे खरे रहस्य हिंदुधर्माचा इतर धर्मांशी आलेल्या संबंधाचा तुलनात्मक अभ्यास केल्याने खचित उमगण्यासारखे आहे. `महाराष्ट्र धर्म राखावा’ अशी भाषा न वापरता `महाराष्ट्र धर्म वाढवावा’ अशी शब्दयोजना ज्याअर्थी ठासून केलेली आहे, त्याअर्थी धर्मांतरामुळे हिंदुंच्या राष्ट्रीय संघसक्तीवर झालेला, होत असलेला आणि होणारा भयंकर आघात त्या महापुरुषाच्या उदार आणि धोरणी काळजाचे पाणी पाणी करीत असेल! एक जाती दोन जाती पावला । तो कैसा म्हणावा भला ।। तुम्हां सकळांस कोप आला । तरी क्षमा केली पाहिजे ।। खुषीने किंवा नाखुषीने, सद्धर्म किवा आपद्धर्म म्हणून, लोभाने किंवा शुद्ध मूर्खपणाने धर्मांतर केलेल्या व्यक्तींना परधर्मात मोक्षाचा खरा वा खोटा मार्ग सापडो वा न सापडो, मूळधर्मापेक्षा एकाच गोलांटी उडीत जगदीश्वराचे सगुण किंवा निर्गुण सिंहासन पटकविता येणे शक्य असो वा नसो, त्यामुळे हिंदु धर्मीयांच्या संघशक्तीचा -हास होऊन, त्यांच्या राष्ट्रीय प्रपंचावरहि असहनीय वज्राघात होत आहे, हा हृदयभेदी देखावा पाहून समर्थांसारखा महा राष्ट्रपुरुषाचे अंतःकरण कळवळल्यामुळेच त्यांनी आपल्या अंतस्थ वेदनांच्या संवेदना मात्र दासबोधात ठिकठिकाणी मोठ्या उमाळ्याने व्यक्त करून ठेवल्या आहेत. `देवमात्र उच्छेदिला । जित्यापरिस मृत्यू भला । आपुला स्वधर्म बुडविला । ऐंसे समजावें ।।’ काय, यापेक्षा समर्थांनी आणखी काय हांका आरोळ्या माराव्या? त्यांनी यापेक्षा अधिक स्पष्टोक्ति ती काय वापरावी? अरे मूर्खांनो, आहात कोठे? करता काय? तुमचे भाऊ, तुमच्या बहिणी, तुमच्यातील कर्तबगार लोक, तुमचे कारागीर, तुमचे पंडित, तुमचे मुत्सद्दी, तुमचे शेतकरी, तुमचे सर्वस्व आज धर्मांतर करून भराभर बाहेर चालले; तुमच्या संघशक्तीला कीड लागली. तुमच्या धर्मांच्या घशाशी बेपर्वाईचा कफ दाटून तो घाबरा झाला आहे; भक्तांचा राजरोस क्षय झाल्यामुळे हिंदुधर्माने डोळे पांढरे केले आहेत; आणि कशाच्या मारता नुसत्या स्वराज्याच्या गप्पा? तुमच्या स्वधर्मातून तुमच्याच देशबांधवांचा एकेक इसम परधर्मात जाऊन आज तुमचा हिंदुसमाज वाळवीने पोखरलेल्या बड्या वाशाप्रमाणे कमकुवत आणि कुचका नासका होऊन राहिला असता, तुमची संघशक्ती लंजुर झाली असता, तुम्ही कशाच्या धमकीवर स्वराज्याची अपेक्षा करता? तुमचेच देशबांधव, तुमचेच धर्मबांधव परक्या धर्माचे अनुयायी बनून, त्या दत्तक धर्माच्या अभिमानाने प्रेरीत होऊन तुमच्या घरातील सारी बरीवाईट कर्मे त्या परक्यांना समजावून देत आहेत, आणि परकी धर्माचे भाडोत्री विरळ कवच वर पांघरून तुमच्याच विरुद्ध प्रत्यक्ष युद्ध करण्यास अगर आतून कारस्थानी सूत्रे चालविण्यास हजारोनी तयार