हिंदू धर्माचे दिव्य

प्रबोधनकार तसे हिंदुत्ववादी. पण त्यांनी हिंदु धर्माची परखड चिकित्सा केली. यातून बहुजनवादी हिंदुत्वाचा एक वेगळाच विचार समाजासमोर आला. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे हे भाषांतर.  

 

प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय खंड चौथा

हिंदुत्व प्रथमावृत्ती (पुनर्मुद्रण) नोव्हेंबर, २०००

प्रकाशक- सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

१७२, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग, नायगाव, दादर, मुंबई – ४०० ०१४.

प्रकाशकाधीन मुखपृष्ठ प्रबोधचंद्र सावंत मुद्रक : व्यवस्थापक शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई – ४०० ००४.

मूल्य : रुपये १०५ प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय खंड चौथा हिंदुत्व संपादक मंडळ श्री. द. मा. मिरासदार, अध्यक्ष श्रीमती नीला उपाध्ये, उपाध्यक्ष श्री. पंढरीनाथ सावंत, निमंत्रक प्रा. शेषराव मोरे श्री. अर्जुन डांगळे श्री. दि. र. भालेराव डॉ. मा. गो. माळी अनुक्रमणिका पृष्ठ मंडळाच्या अध्यक्षांचे निवेदन (सात) हिंदुधर्माचे दिव्य आणि संस्कृतींचा संग्राम (नऊ) हिंदु जनांचा -हास आणि अधःपात ८१ देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे १८३ निवेदन प्रबोधनकार कै. केशव सीताराम ठाकरे यांचे समग्र साहित्य खंडरूपाने प्रसिद्ध करण्याचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ठरविले होते. त्या योजनेनुसार पहिले तीन खंड यापूर्वीच प्रसिद्ध झाले. आज हा चौथा खंड `हिंदुत्व’ या शीर्षकाने प्रसिद्ध करताना मंडळास आनंद होत आहे. प्रबोधनकार ठाकरे हे हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म यांचे जाज्वल्य अभिमानी होते. पण त्यांचा हा अभिमान पूर्णपणे डोळस होता. हिंदू समाजातील अनेक दुष्ट रूढी, अंधश्रद्धा यांचे ते कडवे टीकाकार होते. समाजसुधारणा होऊन हा समाज पूर्ववत सामर्थ्यशाली आणि वैभवसंपन्न व्हावयाचा असेल तर आपल्या धार्मिक कल्पना आणि परंपरागत रूढी यात अगदी मूलभूत बदल झाले पाहिजेत असे त्यांचे स्पष्ट मत होते आणि त्यांनी ते मिर्भीडपणे वेळोवेळी मांडले. ते भिक्षुकशाहीचे कडवे विरोधक होते आणि अत्यंत कठोर आणि रोखठोक शब्दात या भिक्षुकशाहीवर त्यांनी वेळोवेळी कोरडे ओढले. प्रस्तुतच्या या चौथ्या खंडात एकूण तीन भाग आहेत. पहिल्या भागात (हिंदु धर्माचे दिव्य आणि संस्कृतीचा संग्राम) आजच्या हिंदू धर्माची अवगत अवस्था आणि त्याची कारणे यांचा त्यानी ऊहापोह केला आहे. तसेच मुसलमानी आक्रमणानंतरची या देशाची हीनदीन, पौरुषहीन अवस्था कशी प्रकट झाली याचेही विश्लेषण त्यांनी मोठ्या पोटतिडकीने केले आहे. ज्या भाषेत हा दुःखदायक इतिहास त्यांनी सांगितला आहे ती भाषा अनेक ठिकाणी उपहासगर्भ तर आहेच, पण त्याचबरोबर तेजस्वी आणि हिंदू समाजाच्या पौरुषाला आवाहन करणारी आहे. त्यातून आजच्या या दुःस्थितीचे शल्य त्यांना अंतःकर खोलवर कसे बोचत होते, याचेही दर्शन घडते.

दुसरा भाग ``हिंदुजनांचा –हास आणि अधःपात’’ या शीर्षकाने प्रसिद्ध झाला आहे. बॅरिस्टर एस. सी. मुखर्जी या विद्वान ग्रंथकाराने मूळ इंग्रजीत लिहिलेला ``The Decline snd Fall of The Gindoos’’ हा प्रबंध १९१९ मध्ये प्रथम प्रसिद्ध झाला. या प्रबंधाचा खूपच गाजावाजा झाला. भारतमहर्षी जॉ. सर पी. सी. रॉय यांनी हा प्रबंध म्हणजे ``भरतखंडाच्या पुनरुज्जीवनाचा विशेष संदेश’’ या शब्दात त्याचा गौरव केला. सुधारणावादी प्रबोधनकारांच्या तो वाचनात आल्यावर त्यांना तो इतका आवडला की त्याचा मराठीत अनुवाद झालाच पाहिजे असे त्यांना वाटले आणि १९२६ मध्ये त्यांनी हा अनुवाद प्रसिद्ध केला. बॅ. मुखर्जींनी वेदपूर्व काळापासून तो थेट मुसलमानांच्या स्वा-यापर्यंत भारतीय इतिहासाची चिकित्सक छाननी करून हिंदु जनांच्या -हासाची आणि अधःपाताची मीमांसा केली आहे. ``जातीभेदाचा पुरस्कार करणारी सामाजिक क्षेत्रातली भिक्षुकशाही म्हणजे हिंदुस्थानला जडलेली व्याधीच होय.’’ हा प्रफुलचंद रॉय यांचा रोखठोक अभिप्रायच या ग्रंथाच्या वाचनाने सर्वत्र प्रत्ययास येत आहे असे प्रबोधनकारांना वाटते. अशा या परिस्थितीत या हिंदू भारताच्या आत्मोद्धाराचा मार्ग कसा चोखाळावा हे या प्रबंधाच्या वाचन-मनन-निदिध्यासाने सर्वांना कळावे, ही प्रबोधनकारांची तळमळ आहे. ``देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळें’’ हे छोटेसे पुस्तक याच काळात प्रसिद्ध झाले. आपल्या समाजात `देऊळ’ या संस्थेची निर्मिती