निवडक प्रबोधन: Page 10 of 26

तुंबडी कशी भरता येणार? पण इतकाही पोच हिंदीराजांच्या किंवा लोकांच्या टाळक्यांत चुकूनसुद्धा उगवला नाही. बरे, बुद्धिमत्ता, शारीरिक शौर्य आणि धडाडी, यात तरी कोणी हिंदी कमजोर होता? तसेहि नव्हे. पण या त्यांच्या शिलकी भांडवलाचा क्रिस्ती बनियांनी निराळ्याच मार्गाने फायदा करून घेतला. त्यांनी हिंदी लोकाना सुधारलेल्या युरोपियन पद्धतीचे लष्करी शिक्षण देऊन, त्यांच्या फलटणी नोकरीस ठेवल्या. हिंदी लोकांवरच हिंदी फलटणींची चढाई चढवून, हिंदुस्थानातल्या रियासतींचा धुव्वा उडविण्याचा क्रिस्ती बनियांचा हा कावा, गो-या टोळभैरवांच्या पुढारपणाखाली स्वराज्यसंपादनाचे डोंबारी खेळ खेळणा-या सध्याच्या भेकड हिंदू मुसलमानांनी, विचार करण्याइतका मेंदू डोक्यात असेल तर, अगत्य विचारात घ्यावा. कलकत्ता रिव्यू (Vol. VII सन १८४७ पृ. २२६) मधील एका लेखांत गो-या क्रिस्ती बनियांच्या हिंदी उचापतींना पांढ-या मुंग्यांच्या पोखरणीची उपमा देऊन, शेवटी असा निष्कर्ष काढला आहे की ‘After all, however, there can be no question that in our early connection with India, there was much, from the contemplation of which, the moralist will shirk, and the Christian protest against, with abhorrence.’ [भावार्थ – आमच्या सुरुवातीच्या हिंदी उचापतींच्या भानगडी अशाच प्रकारच्या होत्या की त्यांची नुसती कल्पना केली तर नीतिमंतांना शिसारी येईल आणि खरा ख्रिश्चन त्यांचा त्वेषाने निषेधच करील] त्याचप्रमाणे विल्यम हॉविट (William Howitt, ‘The English in India’)ने सुद्धा या मुद्यावर खालील स्पष्टोद्गाराने स्वच्छ प्रकाश पाडला आहेः- ‘‘In such colours does the modern philosophy of conquest and diplomacy disguise the worst transactions between one state and another, that it is not for plain men very readily to penetrate to the naked enormity beneath……. The mode by which the East Indian Company has possessed itself of Hindustan, as the most revoking and un-Christian that can possibly be conceived….. if ever there was one system more Machiavelian-more appropriative of the show of justice where the basest injustice was attempted more cold, cruel, haughty and unrelenting than another, it is the system by which the government of the different states if India has been wrested from the hands of their respective princes and collected into the grasp of the British power…… Whenever we talk to other nations of British faith and integrity, they may well point to India in derisive scorns……. The system which, for more than a century, was steadily at work to strip the native princes of their dominions, and that too under the most sacred pleas of right and expediency, is a system of torture more exquisite than regal or spiritual tyranny ever before discovered; such as the world has nothing similar to show.’’ [भावार्थ - ‘‘देश जिंकण्याचे आणि दगलबाजीचे अर्वाचीन शास्त्र मोठे चमत्कारिक आहे. दोन राज्यांत होणा-या अनेक घाणेरड्या व्यवहारांवर भडक रंगाचे पांघरूण घालण्यात या शास्त्राच्या हिकमती इतक्या पाताळयंत्री असतात, की साध्या माणसाला त्यांचा ठावठिकाणा कधीच मगत नाही. विशेषतः हिंदुस्थान बळकावण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या दगलबाज्या इतक्या संतापदायक आणि क्रिस्ती धर्माच्या तोंडाला काळे फासणा-या आहेत की त्याची कल्पनाच होणे शक्य नाही. उलट्या काळजाचा, क्रूरपणाचा, हट्टी आणि बेगुमान अशा भयंकर अन्यायांवर न्यायीपणाचा जाडजूड सफेदा चढविणारी एकादी दगलबाजी जगात जर कोठे पाहावयाची असेल, तर हिंदुस्थानातल्या सर्व हिंदी राजांच्या रियासती गिळंकृत करून बसलेल्या ब्रिटीश सत्तेकडे खुशाल बोट दाखवावे....... जेव्हा विश्वास आणि इमानाच्या बाबातीत आम्ही दुस-या राष्ट्रांपुढे पुराणे झोडतो, तेव्हा त्यांनी तिटका-याने हिंदुस्थानाकडे बोट दाखवून, ‘येथे तुमच्या पायाखाली काय जळत आहे?’ असा प्रश्न केल्यास, त्याला आम्ही काय उत्तर देणार?...... देशी