निवडक प्रबोधन: Page 4 of 26

भावना, एक ध्येय, सर्वांत उत्पन्न करणे हे कार्य करावयाचे आहे. मधल्या स्मृतिकालातील किंवा पुराणकालातील भूमिका सो़डून वैदिक आर्य काय म्हणत याचा विचार केला पाहिजे. आजचा आपला स्वभाव आपणास बदलला पाहिजे. वेदकालीन आर्य जयस्वी वृत्तीचे होते. सहिष्णु नव्हते. मला काय त्याचे? व त्याला काय माझे? हे बदलले पाहिजे. ते यशस्वी नसते तर आज जगभर इजिप्त, मेक्सिको, अमेरिका येथे जे संस्कृतीचे अवशेष सापडतात ते दिसले नसते. पूर्वीचे आर्य संकुचित वृत्तीचे नव्हते. यासाठी आपणास आपला स्वभाव बदलला पाहिजे. तुम्ही आम्ही ‘बुद्धाळलेले’ हिंदु आहोत; तेव्हा पुन्हा वैदिक आर्यांचे संस्कृतीवर आपणांस आरूढ व्हायला पाहिजे. नांदा आणि नांदू द्या. ह्याचे उलट स्वभाव बनला पाहिजे. तो न बदलल्यास तुम्ही जयिष्णु होणार नाही. स्वभाव का बदलावा? दुसरे आपलेपणावर आक्रमण करीत आहेत. रोज सारखे लोक ख्रिश्चियन होत आहेत, मुसलमान होत आहेत. दुस-याचा संबंध नव्हता तोपर्यंत ठीक होते. ज्यांचे तुमच्यावर राज्य आहे ही पाश्चात्य संस्कृती तुम्हाला गुलाम करील किंवा नाहीसे करील. कपट, क्रौर्य, बेइमान आणि रक्तपिपासा ही मुसलमानांची संस्कृती आहे. अशा स्वभावाचे लोकांशी आपली गाठ आहे. आणि आम्ही सत्य म्हणजे सत्य, प्रेम म्हणजे प्रेम असे आहोत. अशा स्थितीत आपण जगू काय? यासाठी स्वभाव बदलला पाहिजे.’’ - अगदी खरी गोष्ट बोललात, शास्त्रीबुवा. सगळे हिंदुस्थान या बदलाच्या मुशीतच आहे आणि ते झपाट्याने बदलतही आहे. पण भटांच्या भिक्षुकी मनोवृत्तीचे काय? ब्राह्मण-संघटनेच्या खटपटी तुमच्या या विचारांच्या वळणानेच चालल्या आहेत काय? भटेतरांपेक्षा आपल्या जातभाई भटांवरच या शिफारशीचा प्रयोग विशेष अट्टहासाने कराल, तर फार बरे होईल.

(७) सरकार इकडे लक्ष देईल काय? क्षात्रवृत्तीचे लोक मत्स्याहार आणि मांसाहार अपवाद, निषिद्ध, वर्ज्य किंवा ‘अभक्ष्य’ मुळीच मानीत नाहीत ससा, हरीण, रानडुक्कर इत्यादी पशुंची शिकार करणे हा क्षत्रियांचा धर्मच आहे. पण तेवढ्याने असल्या वृत्तीचे लोक जीवदयेच्या तत्त्वाला पारखे असतात, असे फक्त जैन, भट भाट्यांनी हवे तर खुशाल मानावे. ढेकूण-संरक्षणापर्यंत पाचकळलेल्या जीवदयेच्या भट भाट्यांच्या कल्पना अगदी नादानपणाच्या आहेत क्षत्रियांच्या शिकारीला किंवा बोकडकंदुरीला अमानुषपणाचा दोष देणारांच्या लक्षात ‘एक वार, केला ठार’ हे शिकारी क्षात्रसूत्र मुळीच येत नाही, येणे शक्य नाही. गोळीने जनावर जखमी होऊन पडताच, शिकारी ताबडतोब सुरीने त्याची मान धडापासून वेगळी करून, त्याच्या वेदना बंद करतो. कसायीखान्यातसुद्धा कोणताही पशू हालहाल करून ठार मारण्याचा कसायाला सक्त प्रतिबंध असतो. सुरीच्या एकाच फटक्यात त्याने पशुवध केला पाहिजे असा कडक कायदा सर्वत्र आहे. हालहाल करून पशुवध करणारांना ‘क्रुएल्टी टु एनिमल्स’ कायद्याखाली ताबडतोब शिक्षा होते; मग तो आरोपी धंद्याने कसायी असो वा शिकारी असो. भटलोक निवृत्तमांसतेची, अहिंसेची आणि भूतदयेची लंबीचौडी पुराणे झोडतात, पण यज्ञयागाच्या वैदिकी सबबीखाली तीर्थप्रसाद म्हणून सहकुटुंब सहपरिवार मटणाचा फडशा तर उडवितात, पण बलिदानासाठी आणलेल्या जिवंत बोकडांची मुस्कटे आवळून, त्यांना लाथा बुक्क्यांनी तुडवून बुकलून ठार मारतात. राक्षसी भूतदयेच्या भुताटकीचा हा प्रकार क्षत्रिय वर्गाकडून घडणेच शक्य नाही.

सन १९२२ साली किंजवडेकर शास्त्री नावाच्या एका भटाने पुण्यास चातुर्मास याग करून, धडाडलेल्या यज्ञात जिवंत बोकडाची आहुती दिली. या त्यांच्या थोर धार्मिकपणाबद्दल, श्रृंगेरी मठाच्या श्रीन्यायपंचानन स्वामींच्या खास देखरेखीखाली, नरसोपंत केळकरादि सुशिक्षित ब्राह्ण पुढा-यांनी, शास्त्रीबुवांना महावस्त्र अर्पण करून त्यांचा मोठा गौरव केला. (पहा ज्ञानप्रकाश ११-४-१९२२) आता नुकतीच ‘‘धारवाड येथील काही ब्राह्मणांस मेषयज्ञाची हुक्की नकतीच आली व पाऊस पडावा म्हणून त्यांनी २५ बोकड बुकलून मारले! या यज्ञकर्त्यांत खादी धारण करणारे अत्याचारी देशभक्तही सामील झाले होते. व हे सगळे निर्दय लोक त्या बोकडांचे पाय बांधून, मुष्टिप्रहारांनी त्यांचा वध करीत असता, त्यांच्या घरच्या स्त्रिया आणि मुली तो नयनमनोहर देखावा मोठ्या कौतुकाने डोळे भरून पहात होत्या! हर, हर! धारवाडच्या ब्राह्मणांचा दयाधर्म नष्ट झालाच, पण त्यांच्या