निवडक प्रबोधन: Page 26 of 26

& drawers of water ) असल्या हमालीपेक्षा मुळीच अधिक नाही. या अवस्थेचा प्रतिकार करण्याइतके कणखर पाठकण्याचे मेंबर कोण कोण आहेत हे सवकरच दिसून येईल. ही अवस्था रँग्लर महाजनी यांना, लाईफ मेंबरांच्या आपल्या बॉडीचा जर काही अभिमान असता तर, खात्रीने टाळता आली असती. माझ्या सहकारी मित्रांच्या निवडणुकीशिवाय मी प्रिन्सिपॉल होऊच इच्छित नाही, इतका स्वाभिमान जर त्यांनी दाखविला असता तर फेर-निवडणुकीत त्यांच्या सहकारी मित्रांनी त्यांना एकमताने खास निवडून आणले असते, परंतु ज्या लाईफमेंबरपैकी ते एक सन्मान मेंबर आहेत त्यांच्या बॉडीला सर्वधिकारच्युतीची हमाली लाभत असता, गव्ह.बॉडी शिलेदारी मतांने आपण प्रिन्सिपॉलशिपवर आरुढ होणे, याना रँ. महाजनीनी विवेकापेक्षा अविवेकाकडेच आपले गणिती प्राविण्य घसरु दिले, याचे आम्हाला फार वाईट वाटते. विशेष दु:खाची गोष्ट म्हटली म्हणजे सोसायटीच्या पन्नास वर्षाच्या ज्युबिलीच्यां प्रंसगी अशा प्रकाराचा खेदजनक खेळखंडोबा सोसायटीच्या कारभारात उंडावा आणि ज्या लाइफमेंबर्सनी आपल्या हाडाची काडे करुन फर्ग्युसन कॉलेजच्या प्रगणाला कौतुकास्पद नदनवनाची स्थिति आणली त्याच्या अधिकारांचे शुद्ध हमालींत पर्यवसान व्हावे ! डे. ए. सोसायटीत आणि फर्ग्युसन कॉलेजात माजलेल्या सावलागोंधळाबद्दल तपशीलवार स्फोट करणारी लेखमालां पुढील अंकापासून सुरू होणार असल्यामुळे आजची ही सलामी येथेच पुरे !