निवडक प्रबोधन: Page 3 of 26

चित्रांतील चेहरा स्त्रीसारखा असून वयोमानही २-२२ वर्षांचे दिसते. चित्रांत हनुवटीवर नाकाच्या डाव्या बाजूवर टिकली गोंदली असून कपाळावर चंद्रकोरीसह टिकली गोंदली आहे. राणीसाहेबांना चित्रकाराने प्रत्यक्ष पाहिले असल्याशिवाय इतक्या बारीक खाणाखुणा चित्रांत येणे शक्य नाही. चित्र उभे असून साडीचा पदर खांद्यावरूने घेऊन कमरेस खोविला आहे. कमरेवर जरतारी शेल्याचा कमरपट्टा आहे.

कमरेच्या बाजूस तरवार म्यानासह असून कमरपट्यांत तमंचा खोवलेला आहे. डाव्या हातात ढाल असून उजव्या हातांत म्यानासह पट्टा आहे. पट्ट्याचा हात मारण्याच्या पवित्र्यांत उभारलेला आहे. गळ्यात मोत्यांची सरी असून कानात मोत्यांचीच कर्णभूषणे आहेत. डोक्यास बुंदेलखंडी पद्धतीचा रुमाल एका कडेवर बांधलेला आहे व उजवीकडील केशकलाप थोडा उघडा आहे. मांड्यापर्यंतचाच भाग चित्रात असल्यामुळे पायासंबंधाने वर्णन देता येत नाही. चित्रकाराने हे चित्र रंगविण्यात आपले अप्रतिम कौशल्य खर्च केले आहे. हे वीरश्रीयुक्त ध्यान पाहून राणी लक्ष्मीबाईस ‘झांशीची संग्राम देवता’ हे नाव सार्थ वाटते. श्री. चिंतामणराव तांबे यांचेकडेस जाऊन नागपुरकर इतिहासप्रेमी गृहस्थांनी या रंगीत चित्राचे एकवार अवश्य दर्शन घ्यावे. ग्वाल्हेरच्या साहित्य संमेलनाच्या वेळेस राणी लक्ष्मीबाईचा घोडा ज्या छोट्या ओढ्याशी अडला होता तो ओढा आणि शेवटी चकमक होऊन लढता लढता ज्या ठिकाणी वार लागून घोड्यावरून त्या खाली आल्या आणि शेवटी जेथे गवताच्या गंजीत त्यांचा देह अग्निसात झाला, ते स्थळ आम्हास पाहण्याचा योग आला. त्याच स्थळी असलेल्या राणी लक्ष्मीबाईंच्या समाधीवरील पादुकांवर पुष्पमाळा अर्पण करून वंदन करण्याचे पुण्य आम्हासा लाभले.

हल्ली त्यास्थळी राणीसाहेबांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे घाटत आहे, असे ऐकतो. राणीसाहेबांचा जन्म काशीस जेथे झाला ती जागा हल्ली बैराग्यांच्या आखाड्यात सामील आहे. ब्रह्मावर्तात जेथे त्यांच्या बाळपणाचा काळ गेला तो मोरोपंत तांब्याचा वाडा हल्ली एका क्षेत्रोपाध्याकडे आहे. तेथे अथवा राणी लक्ष्मीबाईंच्या अतुल पराक्रमाची प्रथम ज्योत जेथे प्रज्वलित झाली त्या झांशीच्या किल्ल्यातील राजवाड्यात राणीसाहेबांचे स्मारक करणे अवश्य आहे. तथापि ज्या ठिकाणी लढता लढता लाणीसाहेब धारातीर्थी पडल्या त्या ठिकाणी अश्वारूढ पुतळा उभा करण्यापेक्षा आणखी मूर्तिमंत दुसरे कोणते स्मारक करणार? परमेश्वरकृपेने असा योग आल्यास या प्रस्तुत रंगीत चित्राबरहुकूम पुतळा करणे हे ब-याच अंशी सत्यास धरून होईल. कारण या चित्रास राणीसाहेबांच्या प्रत्यक्ष जिव्हाळ्याच्या नातलगांनी मान्यता दिली आहे. या चित्राचा ब्लॉक महाराष्ट्रात अथवा अन्यत्र लवकरच प्रसिद्ध होण्याचा योग येईल.’’ - श्री. चिंतामणराव तांबे यांनी या चित्राचा प्रोसस ब्लॉक करून तो लवकरच सर्व इंग्रेजी मराठी नियतकालिकांतून प्रसिद्ध करावा आणि देवीच्या दर्शनाची जनतेची तहान शांत करावी.

(६) प्रकृती आणि संस्कृती बदलली पाहिजे मुंबईच्या ‘नवी मौज’ साप्ताहिकात (९-१२-२९) श्री. महादेवशास्त्री दिवेकर यांची एक लेखमाला चालू आहे. श्री. दिवेकरांचा लेखन-व्याख्यान-व्यवसाय अलीकडे अखंड चालू असतो. शास्त्रीबुवा विचारवंत असल्यामुळे, त्यांच्या विचारांत चांगली विविधता व नवीनपणाही असतो. पण त्यातही शुक्लपक्ष व कृष्णपक्ष अशी ठरावीक भरती ओहोटी असल्यामुळे, विचारग्रहणाच्या वेळी बरीच सावधगिरी बाळगावी लागते. एखादे वेळी शास्त्रीबुवा असा दणदणीत नवमतवाद प्रतिपादन करतात की सारी सुधारकचमू आश्चर्याने उत्फुल्लनयन होते; तोच दुस-या घटकेला शास्त्रीबुवा इतके घाणेरडे भिक्षुकी गरळ ओकू लागतात की या प्राण्याला, सर पी. सी. रॉय महर्षीच्या उद्गाराप्रमाणे, पासिफिक महासागरात नेऊन जलसमाधी द्यावीशी वाटते. प्रबोधन फक्त चांगल्या विवेकी उद्गारांचा भोक्ता आणि चहाता असल्यामुळे, शास्त्रीबुवांचे मननीय विचार येथे उद्धृत करीत आहोत. भरतखंडात अहिंसावाजी बौद्धमताचे प्राबल्य वाढून, भूतदयेच्या भुताटकीचा नंगा नाच सुरू झाल्यामुळे, शास्त्रीबुवा बिनचूक निदान करतात की सर्वत्र ‘‘प्रतिकारशून्यता आली. आणि या सर्व दोषांमुळे मुसलमानांची डोक्यावर स्वारी झाली. मुसलमानाशी प्रतिकार करण्यासाठी शीख, मराठे, रजपूत यांनी उचल केली. परंतु संस्कृतीप्रसाराचे कार्य पुढे कोणास करिता आले नाही. ते खंडित कार्य आज करणे म्हणजेच हिंदुसंघटन होय. संस्कृतीस पोचले ते उच्च झाले संस्कृती पोचली नाही, ते अस्पृश्य अगर दुसरे कोणी झाले.

आपणास एक