निवडक प्रबोधन: Page 2 of 26

धंदा करतात. त्यांचाही बक-यामेंढरांशी कापण्यासंबंधाने संबंध येतो. मग त्यांनाही धनगर समाजात का घेऊ नये, शंका अगदीच वावगी दिसत नाही. जेजुरी परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत कृष्णराव बारगळ हे तर एकदा म्हणाले की, खाटीक लोक हे पूर्ण हिंदूच नाहीत. हे सरकारच्या रेकॉर्डवरून सिद्ध होते. पण आमच्याप्रमाणे जे सुधारक मताचे लोक असतील ते कालमान परिस्थित्यनुरूप धंद्यावरून कोणास उच्च नीच मानणार नाहीत पण या धनगर होऊ पाहाणा-या क्षत्रियमराठ्यांनी अखिल धनगर समाजाचे हिताकरिता कधी काळी कामगिरी केली आहे काय? शिक्षण परिषद भरविण्याचा कधी प्रयत्न केला आहे काय? फक्त इंदौरचे पितापुत्र महाराजांच्या परदेशाला जाण्यायेण्याच्या वेळा गाठून मुजरे करण्यापलीकडे यातील काही व्यक्तींना दुसरे कर्तव्यच दिसत नाही. हिंदुस्थानातील सर्वच जातीच्या स्त्रीपुरुषांना पसंत वाटणारे ‘शारदाबिल’ यांना नापसंत आहे.!’ - केवळ स्वजातिवर्चस्वाच्या गुप्त धोरणाने ब्राह्मणेतर चळवळ चालविणा-या मराठा पुढा-यांची स्वार्थी पापे मराठेतर अनेक जातींना कशी जाणवू लागली आहेत, याचा हा एक मासला आहे.

(४) वृत्तपत्र-संपादनाची परीक्षा पाहिजे. २७ नोव्हेंबर १९२९च्या इंडियन डेली मेलच्या अंकात श्री. लालभाई डी. ढोलकिया यांनी ‘‘आधुनिक जीवनात वार्तिक-शास्त्राचे (जरनॅलिझमचे) स्थान’’ या मथळ्याखाली एक छोटासा छानदार लेख लिहिला आहे. त्यात ‘‘वार्तिक-शास्त्राच्या शाळा’’ या मथळ्याखाली ते म्हणतात, ‘‘जगातल्या बहुतेक देशांत वार्तिक शास्त्र शिकविण्याच्या शाळा उघडलेल्या आहेत. इंग्लड, जर्मनी, फ्रान्स आणि इटली देशांत अगणित विद्यार्थी या उपयुक्त आणि प्रतिष्ठित धंद्याचे शिक्षण घेऊन तरबेज झाले आहेत. अमेरिकेत अजमासे हजार विद्यार्थी एका वेळी या शास्त्राचे शिक्षण घेत असतात, असे कळते. हिंदुस्थान सगळ्याच बाबतीत मागासलेले; अर्थात् वार्तिकशस्त्रात विद्यार्थी शिकवून तयार करण्याच्या प्रयत्नाला येथे कोणी मनापासून हातच घातलेला नाही. एखाद्या वृत्तपत्राच्या कचेरीत जी काही थातरमातर माहिती मिळेल, तेवढ्यावरच हिंदी संपादक बनत असतो.

एखादी ठरावीक कसोटीची परीक्षा पास झाल्याशिवाय वकिलीचा आणि इतर (डॉक्टर, इंजिनियर, प्लंबर, वायरमनसारखा) धंदा कोणालाही करता यावयाचा नाही, असा सरकारी कायद्याचा दंडक आहे. वृत्तपत्राच्या संपादकीय धंद्याबद्दल असाच कसोटीच्या परीक्षेचा दंडक सरकारने आता अंमलात आणणे प्राप्त आहे. यासाठी सरकारने एक जरनॅलिस्टिक स्कूल काढून, त्यात वार्तिक-शास्त्र-शिक्षणाचा कोर्स शिकविण्याची व्यवस्था ठेवावी. या कोर्सच्या परीक्षेत योग्य कसोटीने पास झाल्याशिवाय कोणालाही – अशिक्षित आणि अर्धशिक्षित नवथरांना तर नाहीच नाही – कसल्याही नियतकालिकाचे संपादक होण्याचा कायद्याने प्रतिबंध झाला पाहिजे. असे काही निश्चित कसोटीचे बंधारण घातले गेले, तरच लोकांच्या भलभत्या भावना चिथावणा-या खोडसाळ आणि घाणेरड्या वृत्तपत्री धांगडधिंग्याला बराच पायबंद बसून, हिंदी जरनॅलिझम (वार्तिक-शास्त्र) सुधारलेल्या इतर राष्ट्रांतील जरनॅलिझमच्या इभ्रतदार पंक्तीला बसण्याच्या लायकीचे बनेल.’’ - उभ्या हिंदुस्थानात प्रागतिक म्हणून मिरविणा-या मुंबई सरकारने श्री. ढोलकिया यांच्या सूचनेचा अगत्य विचार करावा, अशी आमचीही प्रार्थना आहे. सध्या म-हाठी वृत्तपत्रांच्या संपादकीय क्षेत्रात आचारी, पाणक्ये, भिक्षुक, कम्पाझिटर, पानपट्टीवाले, आवळेल तेलवाले, रिकामटेकड्ये श्रीमंत आणि बेकारी कलमकसायांच्या खरर्डेघाशीवर साप्ताहिके सजविणारे शिखंडी, इत्यादी नालायक लोकांची जी गोचिडभरती झाली आहे, ती शक्य त्या कडक उपयांनी बंद पाडल्याशिवाय, म-हाठी वृत्तपत्रांचा दर्जा कधीच इभ्रतदार ठरणार नाही. मुंबई सरकार या सूचनेकडे लक्ष देईल काय?

(५) रणशूर राणी लक्ष्मीबाईंचे अस्सल चित्र. ८।१२।२९ च्या ‘महाराष्ट्र’ (नागपूर) साप्ताहिकात श्री. यशवंत खुशाल देशपांडे यांनी झांशीच्या चिरंजीव संग्रामदेवतेच्या जन्मदिनानिमित्त एक उत्तम माहितीचा लेख लिहिला आहे. त्यात राणीच्या अस्सल चित्राबद्दल तपशील देऊन, तिच्या अखिल भारतीय स्मारकाबद्दल सूचना केल्या आहेत, त्या अशा - ‘‘राणी लक्ष्माबाईंची अनेकांनी अनेक चित्रे प्रकाशित केली आहेत. पण ती सारी खरी नाहीत; काल्पनिक आहेत. राणीसाहेबांना समोर बसवून एका तत्कालीन प्रसिद्ध हिंदी चित्रकाराने तीन चित्रे काढली होती. पण झांशीच्या बिजनामधील लुटीत ती नाहीशी झाली. अद्यापि त्या चित्रांचा पत्ता नाही. प्रस्तुतचे रंगीत चित्र इंदुरास अडगळीत पडलेले मिळाले. राणी लक्ष्मीबाईंचे डोळे पाणीदार होते. इतर चित्रांतील चेहरा पुरुषी थाटाचा आहे. पण या