महामायेचे थैमान: Page 6 of 12

आहे. परंतु राज वैभवी क्षेत्रांत या गोष्टीला कसलेही महत्त्व नाही. खालसांतल्या लोकांना आज राजवैभवाची कसलीच कल्पना नसल्यामुळे, एखाद्या महाराजाच्या पायांत रत्नजडित चढाव पाहताच ‘संपत्तीचा हा शुद्ध सत्यानास’ वाटून संतापाने घेरीहि येईल. राजेलोक जेवायला बसले की ताटांत वाढलेल्या अनेक उंची पक्वान्नांना नुसता स्पर्श करुन उठतात, तर दरदोज सांजसकाळ भुदपाकखान्याचा शेंकडों रुपयांचा खर्च त्यांना ‘फाजील उधळपट्टी‘ हि वाटणे अगदी साहजिक आहे. गव्हर्नर व्हाइसरायादि आंग्रेजी देवांचा थाट तर याहिपेक्षा शतपट लाखी लखाखीचा असतो. राजे गव्हर्नर व्हइसरायच आंबटवरण भात खाऊन खादी पांघरु लागले तर सामान्य प्रजा आणि राज्यकर्त्यात भेद तो काय राहिल? सारांश, लाखी जवाहिराच्या ढिगांत चमकणारी मुमताज सर्व सामान्य माणसांना मोठी चटकचांदणी दिसली, तरी होळकरांच्या राजवैभवी क्षेत्रात त्यांच्या दिमतीला असलेल्या शेकडो परिजनांच्या मानाने ‘दर्यामें खसखस’ इतकेच महत्त्व फार झाले तर तिला मिळेल. मुमताज जात्या स्त्री असल्यामुळे स्त्री दाक्षिण्याची खरी खोटी घमेंड मारणा-या पुरुषांना तिची बाजू घेऊन होळकर सरकारची यथास्थित नालस्ती करताना, या महामायेच्या उलट्या काळजाचे विस्मरण झाले नसते तरच मोठे आश्चर्य वाटते. पत्नि असो वा रखेली असो, तिच्याविषयी एक प्रकारचा आपलेपणाचा विश्वास परिचयाने परिणत होत असतो, हा विश्वास पति किंवा पत्नि अथवा यजमान आणि रखेली यांपैकी कोणीहि एकाने दुखावला तर त्याचे पर्यवसान पुष्कळ वेळा सुडांत होते. कोणत्याहि सेव्यसेवक भावनेत हाच प्रकार असतो. शिवाजीच्या अमदानीत प्याद्याचा फर्जी झालेला हिरोजी फर्जद संभाजीशी लवमाल बेइमान होताच त्याला संभाजीने चिपळूणाहून पकडून आणून ताडकन् हत्तीच्या पायाखाली चिरडून ठार केला. मुमताज हि एक क्षुद्र कलावंतीणीची पोर. कलावंतिणी राजदरबारांत ठेवण्याचा प्रघात होळकरांनीच नवीन पाडला असे नाही. दरबारांतल्या निवडक कलावंतिणीनी आजपर्यंत शेकडो राजांचा रखेलीपणाहि पटकवल्याची उदाहरणें आहेत. होळकरांचा आश्रय न मिळतां तर ही चटकचांदणी मुमताज दैवाची परासीमा गांठली तरी गावभवानीपेक्षां अधिक महत्त्वास चढली नसती. होळकरांचा आश्रय मुमताजला इतका अपूर्व वाटला की हा कायमचा टिकतो कसा याची तिला चिंता उत्पन्न झाली व मिळाले आहे तेवढे घबाड घेऊन पसार व्हावे, इकडे तिचे लक्ष लागले. या निमित्ताने या उलट्या काळजाच्या महामायेने केलेले उपद्याप व गुप्त कट कधी तरी मुद्दयापुराव्यानिशी जगापुढे येतीलच येतील, अशी आम्हाला खात्री आहे. स्वदेशी राज्यांत अजूनहि अनेक कच्च्या पक्क्या गुणांची बूज राखली जाते. त्याप्रमाणें मुमताज होळकरी आश्रयांत ‘कमलाबाईसाहेब‘ बनली. परंतु दैववशात् हाती लागलेले लाखों रुपयांच्या जवाहिराचे धबाड पचविण्यासाठी तिने अनेक युक्त्या प्रयुक्त्या लढवून, अखेर ती होळकरांच्या अन्नाशी बेइमान झाली व त्यांना दगा देऊन पळाली. विश्वासाचा घात केला, दिलेल्या मानाची मान कापली आणि आपला निसर्गसिद्ध बाजारबसवेपणा सिद्ध केला. इंग्लंडांत सर हरिसिंग यांना कारस्थानी लोकांच्या जाळ्यांत पक़डून लाखों रुपये उपटण्याचा कट रचणारी हलकट रंडी रॉबीनसन आणि ही पाताळयंत्री मुमताज या दोघी एकाच सूत्रगोत्राच्या अवलादी आहेत. रॉबिनकन केसमध्ये सर हरिसिंग यांचा काही दोष कोरुन उकरुन काढलाच तर हाच म्हणता येईल की त्यांनी मिसेस रॉबिनसनला रखेली ठेवली. होळकरांचीहि एवढीच चूक की चेह-यामोह-याने मोहक दिसणारी ही छटेल मुमताज रखेली ठेवून दिली. यापेक्षा अधीक काय आहे? रखेल्या ठेवूं नयेत, हे तत्त्व चांगले खरे. पण कोणी ठेवल्याच तर त्या रखेलीने विश्वासघात करावा हे तरी माणुसकीला किती शोभते? रखेल्या ठेवण्याची पद्धत अजूनहि पुष्कळ रूढ आहे. बेळगांव धारवाड कर्नाटक गोमांतक इकडे तर ‘रांड ठेवणे’ हे सभ्यपणांत मोडते. नवीन विचारांच्या प्रगतीमुळे हा सभ्यपणा कोणी पूर्वीप्रमाणे फारसा बोलून दाखवीत नसले तरी ही रुढी आहे तशीच बिनअटकाव चालू आहे. इकडे मुंबई पुणे प्रांतात हा व्यवहार नाना प्रकारच्या सोंगाढोंगाखाली चालू आहेच. रंडीबाज लोक ब-याच लघळ लांब जीभाचे असल्यामुळे कोणी आक्षेप घेताच ते नाकाला जीभा लाऊन मोकळे होतात, एवढेच सारांश, रखेल-बाजी ही कोणत्या ना कोणत्या रुपांत सर्व